वैचारिक मतभेद असले, तरी मुंबईत मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणाऱ्या ठाकरे बंधूंची महापालिकेत सत्ता यावी, त्यांना पाठिंबा असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलं. राज्यात इतर महापालिकेत काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या, राजू शेट्टींनी मुंबईत मराठी महापौर असावा, असं म्हणत ठाकरेंना पाठिंबा दिला.
Shirdi Crime : तरुणाचे अपहरण करून हत्या, मृतदेह टायर अन् डिझेलच्या सहाय्याने जाळलाशिर्डीतील तरुणाचे अपहरण करून त्याची हत्या करत मृतदेह टायर आणि डिझेलच्या सहाय्याने जाळून टाकल्याची धक्काद्यक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सराईत गुन्हेगार दिपक पोकळे, प्रवीण वाघमारे आणि त्यांच्या साथीरांच्या अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत.
Nashik Update : नांदुर्डीत दारूची बाटली आडवी करण्यासाठी मतदाननाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदुर्डी गावात दारूबंदीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. एकूण 4 हजार 406 मतदारांपैकी 1 हजार 955 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून, मतदानाची टक्केवारी 44.37 इतकी नोंदविण्यात आली. या मतदानात दारूबंदीच्या समर्थनार्थ म्हणजेच दारूची बाटली आडवी करावी या पर्यायासाठी तब्बल 1 हजार 790 मतदारांनी मतदान केले, तर दारूची बाटली उभी ठेवावी या विरोधी पर्यायासाठी 81 मतदारांनी मतदान केले. दरम्यान, 83 मते बाद ठरली आहेत.
Sangali Politics : सांगली महापालिकेच्या मैदानात सहा पती-पत्नी उमेदवार...सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तब्बल सहा दाम्पत्य निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष, एकनाथ शिंदे शिवसेना, काँग्रेस, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि अपक्ष, म्हणून पती-पत्नी निवडणूक लढवत आहेत. पॅनल पद्धतीने निवडणूक होत असून चौघा उमेदवारांच्या पॅनलमध्ये पती-पत्नी उमेदवारीच्या रिंगणात उतरले आहेत.
Kalyan Crime : अवैधरित्या पिस्तूल बाळगणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्याकल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू, नये म्हणून पोलिस सज्ज आहेत. कल्याण कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नेतीवली परिसरात अवैधरित्या पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. करण जितू निशाद (वय 21) डोंबिवली पूर्व, असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
BJP Politics : चंद्रपुरातील भाजपच्या पहिल्या सभेला सुधीर मुनगंटीवार यांची अनुपस्थितीभाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आज आयोजित पहिल्याच जाहीर सभेला ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांची अनुपस्थिती. चार जानेवारीला मुख्यमंत्री फडणवीस यांचा रोड शो झाला. त्यावेळी रथावर हजर असलेले मुनगंटीवार आज पहिल्याच जाहीर सभेला उपस्थित नसल्याने भाजपमधील गटबाजी पुन्हा समोर आल्याची दिसते आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आजच्या सभेने चंद्रपुरात जाहीर सभांना सुरुवात झाली. मात्र या पहिल्याच सभेला मुनगंटीवारांची अनुपस्थिती कार्यकर्त्यांना खटकणारी ठरली. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, 'माझ्या सभांना त्यांनी येणे, हे अपेक्षित नाही. ते आमचे नेते आहेत. त्यांच्या वेगळ्या सभा होणार आहेत.'
Mahaytui : भिवंडीतील महायुतीच्या विजय संकल्प सभेतून शिवसेनेच्या उमेदवारांचे फोटो गायबमहापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही विजयी संकल्प सभा असल्याने या ठिकाणी फक्त भाजपच्या उमेदवारांच्या बॅनरवर फोटो लागले. महायुतीमधील एकनाथ शिंदे शिवसेनेच्या एकाही उमेदवारांचे फोटो न लागण्याने चर्चेला उधाण आलं आहे.
Laxman Hake : महापालिका निवडणुकीतून ओबीसी हद्दपार; लक्ष्मण हाकेंचा भाजपवर आरोपभाजपसह सर्व पक्षांनी महापालिकेतून ओबीसी हद्दपार केलेला आहे. ओबीसीच्या नेतृत्वाची भ्रूणहत्या या निवडणुकांमध्ये झाल्याचा गंभीर आरोप ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केला आहे. भाजपच्या खांद्यावर विश्वासाने ओबीसीने मान ठेवली. परंतु त्यांनी सुद्धा ओबीसी संपवलेला आहे. आमचे नेतृत्व संपवण्यात ते यशस्वी झाले आहेत. मात्र आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये योग्य तो धडा, त्यांना शिकवला जाईल, असा इशारा हाके यांनी दिला आहे.
Raigad Politics : तटकरेंनी केलेला डान्स म्हणजे निर्लज्जपणा; आमदार महेंद्र थोरवेंची टीकाखोपोली इथल्या मंगेश काळोखे हत्या प्रकरणावर एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली. मुरुड इथं तटकरेंनी मैं हू डॉन डान्स केला. तटकरेंनी केलेला हा डान्स म्हणजे निर्लज्जपणा आहे. असा डान्स करुन तटकरे यांनी रायगड, महाराष्ट्राचा डॉन मी असल्याचा म्हटलं आहे. सत्तेतील वरिष्ठांचा मला पाठबळ असल्याचं तटकरेंना दाखवायचं होत, असा आरोप थोरवे यांनी केला आहे.
Sanjay Raut : भाजपा आणि एमआयएमच्या युतीवरून संजय राऊत यांचा हल्लाबोलसंजय राऊत यांनी भाजपला 'दूतोंडी गांडूळ' असे संबोधत त्यांच्या राजकारणावर घणाघात केला आहे. मीरा भाईंदरमध्ये भाजपने एमआयएमला पाठिंबा दिल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. तिथे 'फडणवीस आणि ओवेसी भाई-भाई' असल्याचे चित्र दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे
पुण्यात अजित दादांचा भव्या रोड शोमहानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात अजित पवारांचा भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आले होते.
latur Band : रवींद्र चव्हाणांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर, आज लातूर बंदची हाकस्वर्गीय विलासराव देशमुख यांच्य आठवणी लातूर शहरातून शंभर टक्के पुसल्या जातील ,अस विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं होतं. दरम्यान त्यांच्या या विधानानंतर आज लातूर बंदची हाक देण्यात आली आहे, तर विलासरावांचे मूळ गाव असणाऱ्या बाभळगाव मध्ये देखील सकाळपासनं कडकडीत बंद पाळण्यात आलाय.
hidayat Patel : काँग्रेस नेते हिदायत पटेल यांचा अंत्यविधीला काँग्रेसप्रदेश अध्यक्ष उपस्थित राहणारपूर्व वैमन्यस्यातून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर मंगळवारी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी पटेल यांचा आज पहाटे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यविधीला काँग्रेसप्रदेश अध्यक्ष उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
काँग्रेस नेते हिदायत पटेल यांचा मृत्यूअकोटमधील मोहाळा येथे जुन्या वादातून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर मंगळवारी दुपारी सुमारे दीड वाजता धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी पटेल यांचा आज पहाटे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
महिला निवडणूक अधिकाऱ्यावर कारवाई होणारराजकीय हेतूने महिला निवडणूक अधिकाऱ्याने मनसे उमेदवारा अर्ज बाद केल्याची तक्रार मनसे नेते अविनाश जाधव यांनी निवडणूक आयुक्तांकडे केली होती. मंगळवारी ठाणे पालिका आयुक्त आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडेही लेखी तक्रार सादर करण्यात आली आहे. यावेळी पालिका आयुक्तांनी , पुढील २४ तासांत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. चौकशी करून त्याच कालावधीत नवीन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल, असे आश्वासन दिल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाची अंबादास दानवेंना नोटीसमाजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यांना निवडणूक आयोगाने नोटीस दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीत ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासाठी धमकीचे फोन केल्याचा आरोप दानवेंनी घाटी हॉस्पिटलचे डीन डॉक्टर शिवाजी सुक्रे यांच्यावर आरोप केले होते. त आयोगाने या प्रकरणी डॉ. सुक्रे आणि दानवे यांना नोटीस बजावली आहे. यावर आता शुक्रे आणि दानवे खुलासा करणार आहेत.