अमेरिकेचे संरक्षण बजेट 50 टक्के वाढणार, या तीन देशात टेन्शन, भारताचे स्थान काय ? सर्वात जास्त खर्च कुठे ?
GH News January 08, 2026 07:12 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या देशाचे संरक्षण बजेटमध्ये भरमसाठ वाढ केली आहे. अमेरिकेची योजना संरक्षण बजेट ५० टक्के वाढवून १.५ ट्रीलियन डॉलर करण्याची आहे. हा निर्णय यासाठी महत्वाचा आहे कारण अमेरिका आधीच जगातला संरक्षण खर्चावर जास्त पैसा करणार देश आहे. या घोषणेनंतर भारतातही संरक्षण बजेटवर चर्चा सुरु झाली आहे.  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे लक्ष ग्रीन लँडवर (Greenland ) आहे., कोलंबिया (Colombia ) मेक्सिको (  Mexico) या देशांनाही देखील यामुळे धडकी भरली आहे.

अलिकडे आलेल्या आकडेवारीनुसार अमेरिका आणि भारताच्या संरक्षण बजेटमध्यू खूपच अंतर आहे. अमेरिकेच्या संरक्षण बजेटच्या तुलनेत अमेरिकेचे संरक्षण बजेट अनेक पटींनी जास्त आहे. परंतू भारतही स्वत:च्या संरक्षण बजेटवर जादा पैसा खर्च करत आला आहे. ही तुलना दोन्ही देशांची सैन्य क्षमता आणि धोरणात्मक प्राधान्य समजण्यास मदत होईल.

किती आहे अमेरिकेचे संरक्षण बजेट

आर्थिक वर्षे २०२५ साठी अमेरिकेचे संरक्षण बजेट सुमारे ८५० अब्ज अमेरिकन डॉलर ठेवण्यात आले आहे. हे बजेट अमेरिकेच्या सरंक्षण विभागाने प्रस्तावित केले आहे. या खर्चातून सैन्य दल, नाविक दल आणि वायू दल आणि स्पेस फोर्सच्या गरजांची पुर्तता केली जाणार आहे. यात नवीन तंत्रज्ञानाची शस्रास्रे आणि सैन्यांच्या खर्चाचा अंतर्भाव आहे. अमेरिका जगातला संरक्षणावर सर्वात जास्त खर्च करणारा देश आहे.

भारताचे स्थान काय ?

भारताचे आर्थिक वर्षे २०२५-२६ साठी संरक्षण बजेट ६.८१ लाख कोटी रुपये ठेवले आहे. डॉलरमध्ये विचार करता ते सुमारे ७८ ते ७९ अमेरिकन डॉलरच्या आसपास आहे. हे बजेट गेल्या वर्षाच्या तुलनेत ९.५ टक्के जास्त आहे.यात सैन्यदल, नाविक दल, वायूदल आणि पेन्शनचा खर्चाचा समावेश आहे. भारताचा आशियात सर्वाधिक सैन्य खर्च करणाऱ्या देशात समावेश आहे.

अमेरिका आणि भारताच्या संरक्षण बजेटची तुलना

जर दोन्ही देशांची तुलना करायची झाली तर अमेरिकेचे संरक्षण बजेट भारताच्या तुलनेत १० पट जादा आहे. अमेरिकेचा फोकस जागतिक सैन्य तैनातीवर असतो. तर भारताच्या संरक्षण बजेट मुख्य रुपाने संरक्षण आणि क्षेत्रीय धोक्यांवर केंद्रीत आहेत. संरक्षण बजेटमधील हे अंतर दोन्ही देशांची भूमिका आणि जबाबदारी दाखवत आहेत.

अमेरिका कशावर जास्त खर्च करते.

अमेरिका त्यांच्या संरक्षण बजेटचा मोठा हिस्सा अत्याधुनिक शस्रास्रे आणि संशोधनावर खर्च करते. यात फायटर जेट, मिसाईल , डिफेन्स सिस्टीम आणि नौदलाच्या नौकांचा समावेश आहे. या शिवाय अमेरिकेचे सैन्य जगातील अनेक देशात तैनात असते. यामुळे देखील अमेरिकेच्या बजेटमध्ये ऑपरेशनल खर्च देखील जास्त असतो.

भारताचे प्राध्यान्य काय आहे ?

भारत आपल्या संरक्षण बजेटच्या वापर अत्याधुनिकीकरण आणि स्वदेश उत्पादनावर करत आहे. मेक इन इंडिया अंतर्गत संरक्षण बजेटला प्रोत्साहन देण्यात येत आहे. सीमेवर तैनाती आणि सैनिकांची गरज यावर देखील लक्ष दिले जात आहे. भारताचे लक्ष्य मर्यादिक संसाघानात प्रभावी आणि मजबूत संरक्षण तंत्रज्ञान विकसित करण्याकडे आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.