बजेट 2026 : केंद्रीय अर्थसंकल्प 2026 सादर होण्यासाठी फारसा वेळ शिल्लक नाही. सर्वसामान्यांपासून ते व्यापारी समुदायापर्यंत सर्वांनाच अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. दरवर्षी, सरकार अर्थसंकल्पाद्वारे आगामी आर्थिक वर्षाच्या आर्थिक गरजा आणि प्राधान्यक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. देशाच्या गरजांनुसार दरवर्षी त्यात सुधारणा केल्या जातात. सर्वांच्या नजरा आता अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे आहेत. 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान, आजपर्यंतच्या देशाच्या इतिहासातील सर्वात लांब अर्थसंकल्पीय भाषण कोणी दिले आणि ते किती लांब याबाबतची माहिती तुम्हाला आहे का?
देशाच्या अर्थसंकल्पीय इतिहासातील सर्वात लांब अर्थसंकल्पीय भाषण सध्याच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केले होते. 2020 मध्ये त्यांनी संसदेत अंदाजे 2 तास 42 मिनिटे अर्थसंकल्पीय भाषण दिले होते. जे आतापर्यंतचे सर्वात लांब भाषण मानले जाते. हा विक्रम प्रस्थापित करताना, त्यांनी 2019 च्या अर्थसंकल्पीय भाषणाचा स्वतःचाच विक्रम मोडला, जो 2 तास 17 मिनिटे चालला. दोन वर्षांची तुलना केली तर, अलिकडच्या काळात त्यांची भाषणे खूपच लहान झाली आहेत. त्यांनी 2024 चा अंतरिम अर्थसंकल्प केवळ 56 मिनिटांत पूर्ण केला, जो त्यांच्या कार्यकाळातील सर्वात लहान भाषण होता. 2025 चे त्यांचे अर्थसंकल्पीय भाषण अंदाजे 1 तास 17 मिनिटे होते.
जर अर्थसंकल्पीय भाषण शब्दांच्या संख्येने मोजले तर हा विक्रम 1991 चा आहे. तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी संसदेत अंदाजे 18 हजार 650 शब्दांचे अर्थसंकल्पीय भाषण दिले. हे आतापर्यंतचे सर्वात लांब भाषण मानले जाते. दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक भाषण अरुण जेटली यांनी सादर केले होते. 2018 चे अर्थसंकल्पीय भाषण आहे, जे अंदाजे 18 हजार 604 शब्दांचे होते.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षेतखाली कॅबिनेट कमिटी ऑन पार्लमेंटरी अफेअर्सनं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखांना मंजुरी दिली आहे. संसदेच्या कॅलेंडरनुसार वित्त मंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी 2026 ला म्हणजेच रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सादर करतील. अलीकडच्या काळात रविवारी अर्थसंकल्प सादर करण्याची पहिलीच वेळ आहे. सूत्रांच्या माहितीनुसार संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं होईल. त्याच्या पुढच्याच दिवशी म्हणजे 29 जानेवारीला आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर केला जाईल. ज्यातून अर्थसंकल्पापूर्वी देशाच्या आर्थिक स्थिचीचं चित्र समोर मांडलं जाईल. यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात आयोजित केलं जाणार आहे. पहिल्या टप्प्यात कामकाज 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत कामकाज सुरु राहील.त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील कामकाज 9 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान असेल.
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा