मुलगा नाही माझा मित्र होता… माझं आयुष्य होता…, मुलाच्या निधनाने कोलमडला गडगंज श्रीमंत उद्योजक
Tv9 Marathi January 09, 2026 04:45 PM

मुलाला गमावण्याचं दुःख कोणताच बाप सहन करु शकत नाही. वडिलांच्या आधी मुलाने जगाचा निरोप घेतला, त्यापेक्षा मोठा धक्का वडिलांना असूच शकत नाही. ज्या मुलाला बोट धरुन चालायला शिकवलं आज त्याच मुलाची अंत्ययात्रा वडिलांना काढावी लागत असेल तर, यापेक्षा अधिक खंत कोणतीच असू शकत नाही. वडिलांचं नाव मोठं करण्याचं ज्या मुलाने वचन दिलं होतं आज त्याच मुलाने काहीही न सांगता शेवटचा श्वास घेतला… आता मुलाच्या निधनानंतर वडील पूर्णपणे कोलमडले आहेत.

प्रसिद्ध उद्योगपती अनिल अग्रवाल यांनाही हेच दुःख होत आहे आणि संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. त्यांचा मुलगा अग्निवेश यांचं बुधवारी वयाच्या 49 व्या वर्षी निधन झाले. अनिल अग्रवाल यांनी स्वतः मुलाच्या निधनाची दुःखद बातमी शेअर केली.

अनिल अग्रवाल लिहितात, ‘एका मिडल क्लाल बिहारी कुटुंबात अग्नीचा जन्म झालेला. आईचा लाडला अग्नि लहानपणी प्रचंड मस्तीखोर आणि चंचल होता… कायम हसत असायचा… मित्रांचा तर जीव होता माझा अग्नि… बहीण प्रिया हिच्यासाठी देखील कायम प्रोटेक्टिव्ह असायचा…’

‘अग्निवेश ज्या कोणाला भेटायचा त्यांना आपलंस करुन घ्यायचा… तो फक्त माझा मुलगा नव्हता… माझा मित्र होता… माझी शान होता… माझं संपूर्ण जग होता… आता तर खूप काही करायचं बाकी होतं. तुला संपूर्ण आयुष्य जगायचं होतं… किती स्वप्न होते… सर्वकाही अपूर्ण सोडून गेलास… तुझ्याशिवाय आता आयुष्य कसं जाईल बेटा…’

‘अग्निवेश आणि माझं एक स्वप्न होतं. हिंदुस्तानला आत्मनिर्भर करणं… तो कायम बोलायचा… बाबा आपल्या भारतात काय नाहीये…? देशातील एकही मूल उपाशी राहू नये, एकही मूल निरक्षर राहू नये, प्रत्येक महिला स्वतःच्या पायावर उभी राहावी आणि सर्व तरुणांना रोजगार मिळावा अशी आमची मनापासून इच्छा आहे.’

अनिल अग्रवाल म्हणतात की आता ते आणि त्यांची पत्नी किरण फक्त असा विचार करत आहेत की, “आमचा मुलगा गेला. पण वेदांतामध्ये काम करणारे सर्व लोक अग्निवेश आहेत. ते सर्व आमचे मुले आणि मुली आहेत.”

अनिल अग्रवाल यांच्या एकून संपत्ती किती?

भंगार विक्रेता म्हणून आपला प्रवास सुरू करणारे अनिल अग्रवाल आज भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. फोर्ब्स (Forbes) च्या ताज्या रिपोर्टनुसार, अनिल अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबाची संपत्ती जवळपास 4.2 अब्ज डॉरल म्हणजे जवळपास 35 हजार कोटी रुपये आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.