Why Rishabh Pant is not playing IND vs NZ 1st ODI? भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या वन डे मालिकेला ११ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. वडोदरात होणाऱ्या या सामन्यातून रोहित शर्मा व विराट कोहली पुन्हा एकदा निळ्या जर्सीत दिसणार आहे. ही मालिका २०२७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, कारण त्या स्पर्धेपर्यंत भारताला १८ वन डे सामने खेळायला मिळणार आहे. त्यामुळेच संघ व्यवस्थापन आतापासून संघबांधणीवर भर देणार आहे. त्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळतेय, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
रोहित, विराट हे सीनियर खेळाडू संघात असल्याने त्यांचे प्लेइंग इलेव्हनमध्ये असणे निश्चित आहे. कर्णधार शुभमन गिल आणि उप कर्णधार श्रेयस अय्यर पुनरागमन करणार असल्याने तेही ११ मध्ये असतीलच. पण, उर्वरित ७ जागांसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. रोहित व शुभमन ही जोडी सलामीला निश्चित असल्याने यशस्वी जैस्वालला अंतिम ११ मध्ये स्थान मिळणे अवघड आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत शतक झळकावले असले तरी शुभमनच्या पुनरागमनाने त्याला संघाबाहेर बसावे लागेल.
IND vs NZ ODI : रो-को पुन्हा अॅक्शन मोडमध्ये दिसणार; भारतीय संघ वाचा कधी, कुठे खेळणार; Live Telecast डिटेल्सत्यानंतर श्रेयस मधल्या फळीत आहेतच.. रिषभ पंतही बऱ्याच दिवसांनी वन डे संघात परतला आहे, परंतु केएल राहुल संघात असताना त्यालाही संधी मिळू शकत नाही. KL Rahul यष्टिरक्षक-फलंदाजीची जबाबदारी सक्षमपणे पार पाडतोय. विराटमुळे मधली फळी अधिक सक्षम होतेय.. तो सध्या चांगल्या फॉर्मात आहे.
हार्दिक पांड्याला वन डे संघात स्थान मिळालेले नाही आणि अक्षर पटेलही न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी निवडलेल्या संघाचा सदस्य नाही. त्यामुळे वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळेल. त्याच्यासोबतीला रवींद्र जडेजा आहेच. कुलदीप यादव हा तिसरा फिरकीपटू पर्याय संघात दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. जलदगती गोलंदाजांमध्ये मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग व मोहम्मद सिराज यांचे खेळणे निश्चित आहे.
MI vs RCB WPL: 0,0,0,0,0,0,0,0,0,0,1,0! १२ चेंडूंत ११ निर्धाव! lauren bell ने दिला मुंबई इंडियन्सला जबर घाव; विकेटही घेतली अन्...भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, अर्शदीप सिंग.
भारत: शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर (उप-कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसीद कृष्णा, कुलदीप यादव, रिषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जडेजा.