Lauren Bell powerplay bowling against Mumbai Indians : महिला प्रीमिअर लीग २०२६ ला आजपासून सुरुवात झाली. गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध माजी विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात हा सामना होत आहे. स्मृती मानधनाने ( Smriti Mandhana) नाणेफेक करून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हरमनप्रीत कौरच्या मुंबई इंडियन्सला सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला. संघातील प्रमुख खेळाडू हॅली मॅथ्यू ( Hayley Mathews ) हिला आजारपणामुळे सामन्याला मुकावे लागले. RCB कडून सहा खेळाडू पदार्पण करत आहेत.
लॉरेन बेलने पहिले षटक निर्धाव टाकून RCBला चांगली सुरुवात करून दिली, परंतु लिन्सी स्मिथच्या दुसऱ्या षटकात १० धावा काढण्यात MIच्या गुनलान कमालिनीला यश आले. पण, लॉरेन बेलच्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. अचूक टप्पा अन् चेंडूचा वळवण्याच्या तिच्या कलेने मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना हैराण केले. तिने तिच्या पहिल्या दोन षटकांत ११ चेंडू निर्धाव फेकले आणि फक्त १ धावा दिली. तिसऱ्या षटकात तिने मुंबई इंडियन्सला धक्का दिला. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांवर दडपण निर्माण करून तिने RCB ला पहिले यश मिळवून दिले.
MI vs RCB WPL 2026 : जॅकलिनचा डान्स, हनी सिंगचा धमाका; हवा केली ‘त्या’ तरुणीने! कोण आहे Harnaaz Kaur Sandhu?एमेलिया केर पाचव्या षटकात ४ धावांवर ( १५ चेंडू) झेलबाद झाली. त्यानंतर सातव्या षटकात रिचा घोषने चतुराई दाखवताना नॅट शिव्हर ब्रंटला ( ४) यष्टीचीत करून मुंबईला ३५ धावांवर दुसरा धक्का दिला. बेलने तिचा पहिला स्पेल ३-१-७-१ असा पूर्ण केला.
who is Laurel Bell?लॉरेन केटी बेल ही इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघातील जलदगती गोलंदाज आहे. ती २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व करतेय आणि आतापर्यंत ५ कसोटी, ३१ वन डे व ३६ ट्वेंटी-२० सामन्यांत तिने एकूण १०२ विकेट्स घेतल्या आहेत.
RCB चा संघ - स्मृती मानधना, ग्रेस हॅरीस, डी हेमलथा, रिचा घोष, राधा यादव, नॅडीने डे क्लेर्क, अरुंद्धती रेड्डी, श्रेयांका पाटील, प्रेमा रावत, लिन्सी स्मिथ, लॉरेन बेल
MI चा संघ - हरमनप्रीत कौर, जी कमालिनी, नॅट शिव्हर ब्रंट, एमेलिया केर, अमनजोत कौर, निकोला केरी, पूनम खेमनार, शबनिम इस्मैल, संस्कृती गुप्ता,एस सजना, सैका इशाक.