राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. ठाण्यातील एका खोट्या गुन्ह्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना गोवण्याचा प्रयत्न झाल्याचा अहवाल समोर आला आहे. मीरा भाईंदरच्या एका प्रकरणात फडणवीस आणि शिंदेंना त्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंनी दबाव आणला असल्याचा चौकशी अहवालात खुलासा झाला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात हा प्रयत्न झाला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते होते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
फडणवीस व एकनाथ शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्नमाजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. राज्याच्या निवृत्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी निवृत्तीच्या पाच दिवस आधी सरकारकडे याबाबतचा अहवाल सोपवला आहे . या अहवालात माजी पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस उपयुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि एसीपी सरदार पाटील या तिघांवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस विशेष तपास पथकाने केली आहे. त्यामुळे आता पोलिस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
संजय पांडे यांच्यावर कुणाचा दबाव होता? शेलार यांचा सवालया प्रकरणावर बोलताना भाजपचे नेते आशिष शेलार म्हणाले की, ‘जो प्रकार समोर आला तो तपास यंत्रणांनी आणला. संजय पांडे यांच्यावर कुणाचा दबाव होता? आदेश कोणी दिला? त्यावेळी मुख्यमंत्री गृहमंत्री कोण होतं? देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना तुरुंगात टाकन्यासाठी हे केलं. भोळी सुरत दिलं के खोटे अशी प्रतिमा उद्धव ठाकरे तुमची. याचं पाप भोगावं लागेल. पोलिसांच्या मागे पोलीस अशी परिस्थिती उद्धव ठाकरे यांच्या काळात सुरू होती.
फडणवीस व शिंदेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी खोटी कागदपत्रे तयार केली – साटमभाजपचे नेते अमित साटम यांनी म्हटले की, ‘2019 ते 2022 काळात उद्धव मामू मुख्यमंत्री असताना अराजकतेच वातावरण या महाराष्ट्रात माजवलं गेलं होतं. विरोधकांना जेलमध्ये टाकणं, जे आपल्या विरुद्ध बोलतात त्यांच्यावर केसेस करणं, पोलिसांकडून मर्डर करून घेणं, हल्ले करणे अशा प्रकारची राजवट आपण बघितली. त्याचाच एक जिवंत उदाहरण महाराष्ट्र जनतेच्या समोर आल आहे. संपूर्ण न्यायव्यवस्थेला जुगारून दबाव आणून आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा नोंदविण्याकरता खोटे कागदपत्र , चित्रफित तयार करण्याचं काम संजय पांडे यांनी केलं. हे आज उघडकीस आलं आहे. महाराष्ट्राच्या डीजीपी यांनी आम्ही पत्र लिहिलेल आहे. या पत्रात संपूर्ण कहाणी दिलेली आहे. संजय पांडे यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची सूचना सुद्धा या पत्रात केली आहे.’