Parbhani Accident: कीर्तनाहून येताना भयंकर अपघात, ३ वारकर्यांचा जागीच मृत्यू, दत्ता महाराज मुडेकरांचं निधन
Saam TV January 11, 2026 07:45 AM

विशाल शिंदे, परभणी

Three Warkaris killed while returning from kirtan : कीर्तनाहून घराकडे येताना मराठवाड्यातील परभणीत भयंकर अपघात झाला. यामध्ये तीन वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झालाय. दत्ता महाराज मुडेकर , माऊली महाराज कदम , प्रसाद महाराज कदम याचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर मराठवाड्यातील वारकरी संप्रदायावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. अपघाताची पोलिसांनी नोंद केली असून तपास सुरू आहे.

परभणी जिंतूर मार्गावर कार आणि मोटारसायकलचा आज पहाटे अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात 3 वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. परभणी जिंतूर महामार्गावर असलेल्या झरी गावाजवळ मोटारसायकल आणि कारचा अपघात झाला. दत्ता महाराज, माऊली महाराज आणि प्रसाद महाराज हे क्रीर्तनाहून घराकडे जात होते. त्यावेळी काळाने घाला घातला. तिन्ही महाराज गावोगावी जाऊन किर्तन अन् प्रवचन देत होते. पण किर्तनाहून घरी येताना काळाने घाला घातला.

मयत वारकऱ्यांची नावे -

हभप. माऊली दिगंबरराव कदम (३०), (रा. बोर्डी ता. जिंतूर),

हभप. प्रसादराव कदम (४५, रा. बोर्डी ता. जिंतूर),

हभप. दत्ता माणिकराव कऱ्हाळे (३०, रा. मुडा, ता. जिंतूर)

Mumbai Fire : घरातील फ्रीजचा अचानक स्फोट, ३ जणांचा जिवंत जळून मृत्यू, मुंबईतील भयानक घटना

हभप. माऊली कदम, हभप. प्रसादराव कदम आणि हभप. दत्ता कराळे हे तिघे परभणीतील पिंपळामधील कीर्तनसाठी गेले होते. गावातील कीर्तन आटोपल्यानंतर आपल्या घराकडे निघाले होते. मध्यरात्री एक ते दोन वाजताच्या सुमारास तिघेही दुचाकीने परभणी- जिंतूर मार्गाने बोर्डी गावाकडे निघाले होते. झरीगावाजवळच्या लोअर दुधना डाव्या कालव्याच्या जवळ येतात काळाने घाला घातला. महाराजांच्या दुचाकीला कारने जोरात धडक दिली. यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले.

धक्कादायक! भाजप नेता स्टेजवर चढताना धाडकन तोंडावर आपटला, व्हिडिओ व्हायरल

मध्यरात्री अपघाताची माहिती मिळतच पोलिसांनी झरी गावात धाव घेतली. शंकर हाके यांनी तात्काळ या अपघातात तिघांनाही जवळच्या रूग्णालयात दाखल केले. पण उपचारावेळी तिघांचा मृत्यू झाला. अपघातात वारकऱ्यांचे निधन झाल्याची माहिती कळताच बोर्डी गावावर शोककळा पसरली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय.

Public Holiday : पुढच्या गुरूवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी, शाळा-सरकारी कार्यालये राहणार बंद
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.