Gold Silver Price Falls : सोने ३ हजार तर चांदी तब्बल ९ हजारांनी उतरली; शेअर बाजारात मोठी खळबळ
esakal January 09, 2026 09:45 AM

Gold Silver Rate Today : नव्या वर्षात सोने आणि चांदीच्या दरवाढ वेगाने होत आहे. चांदीचा आज प्रतिकिलोचा दर २ लाख ५० हजार रुपयांवर आणि सोन्याचा प्रतितोळा दर १ लाख ३८ हजार रुपयांवर पोहोचला आहे. जागतिक मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत असल्याने आणि औद्योगिक क्षेत्रात चांदीचा वापर वाढत असल्याने त्यांच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान मागच्या मंगळवारी चांदीच्या दराने नवा उच्चांक गाठत २ लाख ५९ हजारांची उसळी घेतली होती.

जागतिक पातळीवरील राजकीय आणि आर्थिक स्थिती स्थिर होत नसल्याने सोने, चांदीची दरवाढ होत असल्याचे सराफ व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे. नव्या वर्षाच्या सुरूवातीच्या पहिल्या आठवड्यात चांदीने झेप घेत २ लाख ५९ हजार इतका दर गाठला होता. मागच्या २४ तासांत पुन्हा हा दर कमी होत २ लाख ५० हजारांवर आला आहे. दरम्यान काल एका दिवसात चांदी तब्बल ९ हजारांनी उतरली आहे.

सोन्याच्या दरातही अशीच स्थिती निर्माण झाली आहे. ५ जानेवारी २०२६ रोजी सोने १ लाख ३६ हजारांच्या आसपास दर होता तो अचानक ६ जानेवारीला १ लाख ४१ हजारांवर जाऊन थांबला. परंतु काल अचानक सोन्याच्या दरानेही ३ हजारांची निचांकी पातळी गाठत १ लाख ३८ हजारांवर स्थीर राहिला आहे. हा सोन्याचा २४ कॅरेटचा दर असून यामध्ये जीएसटी अधिकी होऊ शकते.

चांदी केवळ एक मौल्यवान धातूच नाही, तर औद्योगिक आणि ऊर्जा संक्रमणातील एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे भारताने आयात केलेल्या तयार चांदीवरील अवलंबित्व कमी करून आणि आयातीचे स्रोत वैविध्यपूर्ण करून, तिच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हने (जीटीआरआय) म्हटले आहे.

Gold Rate Today : नवीन वर्षात सलग तिसऱ्या दिवशी सोनं-चांदी महाग! सर्वसामान्यांना झटका, गुंतवणूकदार खुश; आजचे ताजे भाव पाहा

भारताने चांदीचा आपल्या खनिज व स्वच्छ ऊर्जा धोरणामध्ये समावेश केला पाहिजे. आयात केलेल्या तयार चांदीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी देशांतर्गत शुद्धीकरण आणि पुनर्वापर क्षमतेला प्रोत्साहन देणे आणि आयातीचे स्रोत वैविध्यपूर्ण करणे आवश्यक आहे.

- अजय श्रीवास्तव, संस्थापक, जीटीआरआय

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.