ऊर्से, ता.१० : ग्रामपंचायत परंदवडी यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेला ‘सॅनिटरी पॅड मशिन व गावात स्वच्छता ‘कीट’चे वाटप करण्यात आले.
शालेय जीवनासापसूनच मुलींना आरोग्य व स्वच्छता याची जाणीव व्हावी, मासिक पाळी दरम्यान असणारी मुलींची अनुपस्थिती कमी व्हावी, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिकांनी सांगितले. गावात स्वच्छतेसाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत, ज्यात स्वच्छता ‘किट’ वाटप आणि जागृती यांचा समावेश आहे. या उपक्रमात ग्रामपंचायत, सामाजिक संस्था आणि नागरिकांचा सहभाग होता. गावातील घरांची नोंद असणाऱ्या व कर भरणाऱ्या सर्व कुटुंबांना ‘कीट’चे वाटप करण्यात आले असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले.
उपक्रमाचा उद्देश:
• गावातील कचरा व्यवस्थापन सुधारणे.
• जलजन्य आजार (उदा. कॉलरा, अतिसार) रोखणे.
• पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता राखणे.
• आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करणे.