16753
‘अंगारिका महिमा’ने गाजला
केंद्रशाळेचा वार्षिक सोहळा
वेंगुर्लेत विविध कलाविष्कारांचे कौतुक
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १० ः केंद्रशाळा वेंगुर्ले क्र. १ च्या विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात झाले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या एकाहून एक अशा वैयक्तिक आणि समूहनृत्यांनी रसिकांना खिळवून ठेवले. ‘अंगारिका महिमा’ या दशावतारी नाटकाने पुराणाची माहिती करून दिली.
शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम शाळेच्या मैदानावर झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर, उपाध्यक्ष सेजल रजपूत, सदस्य देवेंद्र वेंगुर्लेकर, ॲड. संदीप परब, प्रथमेश गुरव यांच्या उपस्थितीत झाला. सांस्कृतिक कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थितीत दर्शवित मुलांचे कौतुक केले. या कार्यक्रमाची सांगता ‘अंगारिका महिमा’ या पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोगाने झाली. यात तनिष मेस्त्री, विघ्नेश पवार, वेदांत नाईक, गुरुदेव दामले, सान्वी रजपूत, सोहम कदम, वेद वेंगुर्लेकर, समर्थ गिरप, योगिराज पुराणिक यांनी भूमिका साकारल्या. या नाट्यप्रयोगासाठी कौशल नातू, कुशल दामले, धीरज घाडी, प्रथमेश लियमे यांची रंगभूषा, तर सुभाष कांदळकर (हार्मोनिअम), अथर्व मैस्त्री (पखवाज) आणि प्रथमेश लिमये (तालरक्षक) यांची संगीत साथ लाभली. प्रथमेश गुरव, अजित दामले, कौशल नातू, महादेव मेस्त्री आदींचे सहकार्य लाभले.