16759
साईनामाच्या जयघोषाने
बांदा परिसर चैतन्यमय
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १० ः गोमंत साई सेवक वारकरी समिती व श्री राष्ट्रोळी साई मंदिर, सांगोर्डा (बार्देश, गोवा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गोवा ते क्षेत्र शिर्डी पालखी पदयात्रा सोहळ्याचा शुभारंभ गुरुवारी (ता. ८) सायंकाळी करण्यात आला. ही पालखी पदयात्रा शुक्रवारी (ता. ९) बांदा शहरात दाखल झाली.
यावेळी साईभक्त बाप्पा केसरकर संस्थापित साई मठात श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या वतीने पदयात्रेचे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. गेली नऊ वर्षे अखंडपणे सुरू असलेली ही पालखी पदयात्रा २३ जानेवारीपर्यंत शिर्डी येथे पोहोचणार आहे. या पदयात्रेत १७० साईभक्त सहभागी झाले आहेत. स्वागत समारंभप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर, उपाध्यक्ष रवींद्र मालवणकर, खजिनदार राजेश कारेकर, विश्वस्त साईराज साळगावकर, साईशकुमार केसरकर, प्रीतम हरमलकर, निखिल मयेकर, बंड्या हरमलकर, दर्शना केसरकर, श्रेया केसरकर, प्रिया केसरकर, सल्लागार अच्युत पिळणकर, ज्येष्ठ भजनकर्मी गिरी महाजन, सतीश नाटेकर, मंगलदास साळगावकर, विजय कासार, विघ्नेश गवस, साईश तोरसकर, ज्ञानेश्वर येडवे, ऋषी हरमलकर आदी उपस्थित होते. सतीश नाटेकर यांनी साईसेवक वारकऱ्यांचे स्वागत केले. साईपादुकांची पूजा साईशकुमार केसरकर यांनी केली. राकेश केसरकर, रवींद्र मालवणकर यांना सन्मानित करण्यात आले. संपूर्ण परिसरात साईनामाच्या जयघोषाने भक्तिरसाने परिसर चैतन्यमय झाला.