
>>> द्रष्टा रिता कळमणकर
सुमारे 8 टन (8000 किलो) वजनाच्या क्रेगचे समोरून आणि तेही खाली बसून फोटो काढणे हा ध्यास घेऊन आफ्रिकेत पोहोचले आणि 2025 च्या अखेरीस हा योग सार्थ ठरला.
केनियामधील अॅम्बेसोली हा परिसर आफ्रिकन हत्तींचं माहेरघर, नंदनवन आहे. क्रेग नावाचा अपभ्रंश होऊन कधीकधी ग्रेग नावाने सुप्रसिद्ध असलेला हत्ती हा खरं तर caring the super tuskr म्हणून ओळखला जातो. प्रचंड आकाराचा व जमिनीला स्पर्श करतील असे लांबलचक सुळे असलेला हा हत्ती वन्य जीव छायाचित्रकारांचं विशेष आकर्षण आहे. क्रेगसारखे हत्ती आता खूप दुर्मिळ होत चालले आहेत. सुमारे 8 टन (8000 किलो) वजनाच्या क्रेगचे समोरून आणि तेही खाली बसून फोटो काढणे हा ध्यास घेऊन आफ्रिकेत पोहोचले होते. 31 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी क्रेगचे मनसोक्त फोटो काढले.
जगभरात गाजलेला नावाजलेला हा हत्ती माझ्यापासून अवघ्या पाच फुटांवर होता; परंतु 3 जानेवारी 2026 रोजी या महाकाय प्राण्याने देह ठेवला. अख्खं जग हळहळलं. मी क्रेगचे शेवटचे फोटो काढणारी छायाचित्रकार ठरले. इथे क्रेगचे फोटो तर आहेतच सोबत इतरही कृष्णधवल फोटो शेअर करत आहे. प्रसिद्ध छायाचित्रकार अँसेल अॅडम्स, डायन अर्बस आणि अल्फ्रेड स्टिगलिट्झ यांसारख्या छायाचित्रकारांनी कृष्णधवल फोटोग्राफीला कलेचा दर्जा मिळवून दिला.
ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी ही केवळ रंग नसणे नव्हे, तर रंग नसतानाही चित्र कसे प्रभावीपणे मांडता येते, याचे एक उत्कृष्ट कलात्मक माध्यम आहे. ब्लॅक अँड व्हाईट (कृष्णधवल) फोटोग्राफी म्हणजे रंगांऐवजी काळा, पांढरा आणि राखाडी रंगांच्या छटा वापरून फोटो काढणे किंवा बनवणे, जे दृश्याला एक कालातीत आणि कलात्मक रूप देते, ज्यामुळे प्रकाश, सावली, पोत आणि भावनांवर अधिक लक्ष केंद्रित होते. यामुळे रंगांचा गोंधळ टाळून प्रतिमेचा मूळ गाभा समोर येतो आणि तो अधिक प्रभावी वाटतो. जेव्हा दृश्यातील भावना महत्त्वाची असते, जेव्हा प्रकाश सावलीचा खेळ प्रभावीपणे दाखवायचा असतो तेव्हा फोटोग्राफीला पर्याय नाही. फोटो कृष्णधवल ठेवायचा आहे हे फोटो काढतानाच ठरवले तर त्यात योग्य ते बदल करता येतात.
फोटो काढण्याअगोदरच ती प्रतिमा आपल्या नजरेसमोर हवी. तरच ती उत्कृष्ट बनते. सदरचे फोटो नेहमीपेक्षा वेगळा विचार करून काढले आहेत. हत्तीचे फोटो हे गाडीतून मोनोपाडखाली सोडून त्दै aहुत ने घेतले आहेत. दूर क्षितिजावरची जिराफ मेटिंग पेअर अतिशय ड्रमॅटिक अवकाशाच्या पार्श्वभूमीवर टिपली आहे. काही फोटो प्रसिद्ध किलीमांजरोच्या पार्श्वभूमीवर काढले आहेत.
[email protected]








