Cabinet Expansion : फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, शिंदेंसेनेच्या नेत्याच्या त्या दाव्याने खळबळ
Saam TV January 12, 2026 02:45 PM

Maharashtra Cabinet Expansion Update : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होण्याचे संकेत मिळाले आहेत. माजी मंत्री आणि शिंदेसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत दिले आहे. जालन्यामध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचारात बोलताना सत्तार यांनी खोतकर वर्षभरात मंत्री होतील, अशी भविष्यवाणी वर्तवली आहे. अर्जुन खोतकर यांचा एक वर्षाचा वनवास अजून बाकी आहे, एक वर्षानंतर जालन्यावरून शपथविधीसाठी लोकांना मुंबईला बोलावलं जाईल, असे ते म्हणाले. अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? याची चर्चा जोरात सुरू झाली.

शिवसेना आमदार अर्जुन खोतकर एका वर्षानंतर कॅबिनेट मंत्री होणार : अब्दुल सत्तार

शिवसेना आमदार अर्जुन खोतकर एका वर्षानंतर कॅबिनेट मंत्री होणार असल्याची भविष्यवाणी आमदार अब्दुल सत्तार यांनी जालन्यात एका प्रचार सभेत वर्तवली आहे. अर्जुन खोतकर यांचा एक वर्षाचा वनवास अजून बाकी आहे, एक वर्षानंतर जालन्यावरून शपथविधीसाठी लोकांना मुंबईला बोलावलं जाईल. अर्जुन खोतकर यांना थांबवणं एवढं साधं काम नाही, असं देखील त्यांनी म्हटलं. शनिवारी जालन्यात शिवसेनाउमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत अब्दुल सत्तार यांनी ही भविष्यवाणी वर्तवली आहे. त्यामुळे एक वर्षानंतर पुन्हा मंत्रिमंडळात बदल होणार असल्याचे संकेत अब्दुल सत्तार यांनी दिलेत.

ZP Election : जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडणार, कोर्टातून आली मोठी अपडेट जालन्यात काँग्रेस ही भाजपची बी टीम - अर्जुन खोतकर

जालना महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. जालन्यात काँग्रेस भाजपची बी टीम असल्याचा आरोप शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी प्रचार सभेत केलाय. भाजप नेते आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी काही उमेदवार काँग्रेसमधून उभे केल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी गोरंट्याल यांचं नाव न घेता केलाय. काँग्रेसला मतदान देणे म्हणजे भाजपलामतदान देणे असा थेट हल्लाबोल त्यांनी केलाय. दरम्यान भाजपला दाबायचं असेल तर अर्जुन खोतकर आणि अब्दुल सत्तारच पाहिजे अस म्हणत भाजपला दाबणारे आम्ही आहोत तर आम्हाला ताकद द्या असे आवाहन शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी मतदारांना केलंय.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मकरसंक्रातीला खुशखबर मिळणार? खात्यात ₹३००० येण्याची शक्यता
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.