कोल्हापूर : अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या भोगीच्या पार्श्र्वभूमीवर बांधावरच्या वरण्याचे दर किलोला १०० ते १२० रुपये प्रतिकिलो असा भाव राहिला, तर मेथी, शेपू, पोकळा, पालक यांचे दर पाच ते दहा रुपये प्रतिपेंडी असे होते.
कांदापात, चाकवत, करडई आणि राजगिरा भाजीचा दर प्रतिपेंडी १५ ते २० रुपये असा राहिला. गेल्या आठवड्यात टोमॅटो पन्नाशी पार गेला होता. टोमॅटोचा दर आजच्या आठवडी बाजारात ३० ते ४० रुपये असा पडला.
Kolhapur Market : आठवडा बाजारात भाजीपाला स्वस्त; टोमॅटो पन्नाशीवर, गृहिणींना दिलासाविजापूर, कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात लिंबूची आवक झाल्याने त्याचे दर पडले असून, मोठ्या आकाराचा लिंबू दहा रुपयास पाच ते सहा असा राहिला. भोगीला ऊस लागतो. त्यामुळे उसाच्या एका पेरास दहा रुपये असा दर राहिला, तर लहान हिरवे वाटाणे वाट्यास दहा रुपये असा दर राहिला.
काटेरी वांगीचा दर ८० ते १०० रुपये असा किलोचा भाव राहिला. जवारी गवारीचा दर १६० रुपये असा भाव कायम राहिला, तर बंदरी गवारीचा दर ८० ते १०० रुपये किलो असा दर राहिला. इंदोरी बटाटा २५ ते ३५ रुपये असा किलोचा भाव होता.
Ichalkaranji Market : लसणाची फोडणी महागली! नवीन आवक रखडल्याने दर दुपटीने वाढले, गृहिणींचा बजेट बिघडलानव्या बटाट्याचा दरही २० ते ३० रुपये असा होता. बाजारात नवा कांदा आल्याने दरही १५ ते २५ रुपये किलो असा भाव राहिला. खाद्यतेलामध्ये शेंगदाणे तेलाचे भाव पाच रुपयांनी वाढले.
भाजीपाला (पेंडीचे दर)
मेथी = ३ ते ५ रु.
चाकवत = १५ ते २० रु.
पालक = ५ ते १० रु.
कोथिंबीर = १० ते २५ रु.
हरभरा पेंडी = १० ते २० रु.
हरभरा भाजी = २० रु. वाटा
कांदापात = २० रु.
पोकळा = १० रु.
शेपू = १० रु.
राजगिरा = २० रु.
करडई = १५ रु.
फळभाज्यांचे दर
कोबी = १५ ते २०
वांगी = ६० ते ७० रु.
वांगी (काटेरी) = ८० ते १०० रु.
टोमॅटो = ३० ते ४० रु.
ओली मिरची = १०० रु.
ढब्बू मिरची = ८० ते १०० रु.
घेवडा = ८० रु.
गवारी (बंदरी) = ८० ते १०० रु.
जवारी गवारी = १६० रु.
ओला वाटाणा = ६० ते ८० रु.
ओला वाटाणा (गोल्डन) = १०० रु.
कारली = १०० रु.
भेंडी = ४० ते ६० रु.
वरणा = १०० ते १२० रु.
दोडका = ८० ते १०० रु.
काकडी (काटेरी) = ६० ते ८० रु.
बिनीस = १०० रु.
दुधी भोपळा = २५ ते ३० रु.
गाजर = ४० ते ८० रु.
आल्ले = ८० ते १०० रु.
फ्लॉवर = २० ते ६० रु.
पापडी= ४० रु.
मुळा = १० रू नग
शेवगा शेंग = २० रु. तीन नग
कांदा = २० ते २५ रु.
कांदा (पांढरा) = ३० रु.