Maharashtra Political Updates : पावसाळ्यातील बेडकाप्रमाणे राज ठाकरे आणि असदुद्दीन ओवैसी यांचे आवाज येत असतात
Sarkarnama January 12, 2026 11:46 PM
Gunratan Sadavarte : पावसाळ्यातील बेडकाप्रमाणे राज ठाकरे आणि असदुद्दीन ओवैसी यांचे आवाज येत असतात

मनसे प्रमुख राज ठाकरे आणि एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी हे दोघेही एकाच विचाराला वाहून घेतलेल्या औलादी आहेत की काय, असा प्रश्न पडतो. दोघांमधील साम्य सांगितल्यावर ते राज्यातील जनतेला शंभर टक्के खरं वाटलंच पाहिजे. पावसाळ्यात बेडकांचा आवाज येतो. तसं निवडणुका लागल्यावर एका बाजूला राज ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला असदुद्दीन ओवेसी यांचे आवाज येत असतात, अशी टीका ॲड गुणरत्न सदावर्ते यांन राज ठाकरेंवर केली.

200 इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी घेतला निर्णय

Mumbai News : एकीकडे जास्तीत जास्त मुंबईकरांनी मतदानासाठी नागरिकांनी बाहेर पडावं यासाठी प्रशासन प्रयत्नशील असताना जुहू परिसरातील सुमारे 35 हजार नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे जाहीर केलं आहे. जुहू परिसरातील जवळपास 200 इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी तसा निर्णय घेतला आहे. मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याच्या आशयाचे अनेक बॅनर जुहू रुईया पार्क, कराची सोसायटी परिसरात लागल्याचे दिसत आहे.

Anil Bonde : अमरावतीमधील काही लोक डबल ढोलकीचं राजकारण करतात

माजी कृषिमंत्री आणि खासदार अनिल बोंडे यांनी पुन्हा एकदा वाद्ग्रस्त विधान केले आहे. त्यांनी सभेत उपस्थित असलेल्या नागरिकांना असली कमळाला मतदान करणार की नकली असा सवाल केला. काही लोक डबल ढोलकीचं राजकारण करत आहेत. मुख्यमंत्री आल्यानंतर त्यांच्या गाडीत चढायचं आणि इकडे आल्यानंतर.... अरे, अमरावतीच्या साईनगरमधील लोक क्रॅक झाले आहेत का. त्यांचे नट फिटावे करतील का, असा सवाल बोंडे यांनी केला.

Akot : अकोटमध्ये स्वीकृत नगरसेवक निवडणुकीत भाजपचे माजी नगराध्यक्षाच्या मुलाला एमआयएमचा पाठिंबा

अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेत एमआयएम आणि भाजपची युती झाली होती. मात्र, राज्यभरातून टीकेची झोड उठल्यानंतर ती युती भाजपने तोडली होती. मात्र, त्यापुढची गोष्ट स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडणुकीत दिसून आली आहे. भाजपचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र बरेठिया यांचा मुलगा जितेन बरेठिया यांना स्वीकृतच्या निवडणुकीत एमएमएमने उमेदवारी दिली आहे. एमआयएमच्या पाच नगरसेवकांनी बरेठिया यांना पाठिंबा दिला आहे.

Ambernath News : रवींद्र चव्हाणांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या अंबरनाथमध्ये राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या अंबरनाथ नगरपालिकेच्या उपनराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रसचे सदाशिव पाटील हे निवडून आले आहेत. चव्हाण यांनी नगरपालिकेत सत्ता मिळविण्यासाठी काँग्रेसच्या बारा नगरसेवकांना भाजपत प्रवेश दिला होता. मात्र, खासदार श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन नगरपालिकेत सत्ता मिळविली. आज मतदानाच्या दिवशी भाजप आणि शिवसेनेत प्रचंड राडा झाला. पण त्या राड्यात राष्ट्रवादीचे सदाशिव पाटील हे निवडून आले आहेत.

Mumbai : मुंबईतील जुहू परिसरातील वीस मतदारांचा मतदानावर बहिष्काराचा निर्णय

जुहू परिसरातील सुमारे १५ ते २० हजार नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे बॅनर लावले आहेत. या परिसरातील सुमारे दोनशे इमारती धोकादायक परिस्थितीत आहेत. अनेकदा पाठपुरावा करून त्यांचा हा प्रश्न निकाली निघू शकलेला नाही. लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकीत अनेक उमेदवारांनी त्यांना नुसती आश्वासने दिली आहेत. पण जुहू परिसरातील सुमारे पंधरा ते वीस हजार मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

अंबरनाथमध्ये भाजप–शिंदेसेना आमने-सामने

अंबरनाथमध्ये भाजप-शिंदेसेना आमने-सामने आले आहेत. उपनगराध्यक्षपदाची निवडणूक पार पडतेय. यावेळी भाजपकडून शिंदेंचे उमेदवार असणारे सदाशिव पाटील हे गद्दार आहे अशी घोषणाबाजी केली होती. आता चप्पल दाखवत महिलांनी रोष व्यक्त केला आहे.

अमित साटमांकडून राज ठाकरेंचा गौतम आदनींसोबतचा फोटो शेअर

राज ठाकरेंनी गौतम आदानींवर आपल्या जाहीर सभेतून टीका केली. महाराष्ट्र आणि मुंबईत अदानीच्या घशात घालण्याचा डाव असल्याची टीका त्यांनी सरकारवर केली. दरम्यान, मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी राज ठाकरे आणि गौतम अदानींचे फोटो ट्विट करत ढोंगी आणि दुटप्पीपणाचा कळस, असे म्हटले आहे.

शिवाजी पार्कवर आज भाजप-शिवसेनेची सभा

शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे बंधूंची काल जाहीर सभा झाली. यात ठाकरे बंधूनी महायुतीवर जोरदार टीका केली. आज शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची सभा आहे. फडणवीस ठाकरेंच्या प्रश्नाला काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

फडणवीस कोल्हापूरकरांशी साधणार मिसळ कट्ट्यावर साधणार

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूरकरांशी मिसळ कट्ट्यावर थेट संवाद साधणार आहेत.

Raj Thackeray: राज ठाकरे यांचा उद्या पुण्यात दौरा

मनसेचे प्रमुख राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर आहेत. ते मनसेच्या उमेदवारांसोबत संवाद साधणार आहेत. सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ४.४५ पर्यंत राज ठाकरे उमेदवारांना भेटी देणार आहेत.

BJP Live: भाजप बंडखोर उमेदवारांची हकालपट्टी

भाजपचे बंडखोर उमेदवार मुकेश शहाणे यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे. भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार यांनी त्यांची पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी केली. दिपक सुधाकर बडगुजरांविरोधात प्रभाग 29 मध्ये मुकेश शहाणे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. पक्ष शिस्त न पाळल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

काँग्रेस आमदार राहुल ममकुटाथिला अटक

काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले केरळचे आमदार राहुल ममकुटाथिला याला पोलिसांनी अटक केली आहे. तरुणीवर अत्याचार प्रकरणार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

डोंबिवलीत भाजपकडून पैसे वाटप, शिवसेनेचा आरोप

डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. तीन हजार रुपयाचे पाकीट भाजप दशरथ भुवन परिसरात वाटत असल्याचे शिंदेंच्या सेनेचे उमेदवार नितीन पाटील यांनी केला, पाटीस आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटणाऱ्याना रंगेहाथ पकडले.

सुनील आर्दड यांचा शिवसेनेत प्रवेश

मतदानासाठी तीन दिवस बाकी असताना एकनाथ शिंदेंनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपचे जालन्याचे माजी नगराध्यक्ष  सुनील आर्दड यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वात हा पक्ष प्रवेश झाला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.