२९ महानगरपालिकांसाठी १३ ते १६ जानेवारी दरम्यान ड्राय डे
मतदान १५ जानेवारी, मतमोजणी १६ जानेवारीला
दारूची दुकाने व सार्वजनिक मद्यपान पूर्णपणे बंद
नियम तोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार
अक्षय बडवे, पुणे
Maharashtra Dry Day During Municipal Election 2026 : राज्यात २९ महानगरपालिकांसाठी निवडणुकांचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आहे. राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते सोशल मीडिया, रोड शो आणि सभा यांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. या निवडणुका १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, मतमोजणी १६ जानेवारीला पार पडेल. या काळात राज्य शासनाने नागरिकांसाठी विशेष नियम जाहीर केले आहेत. उद्यापासून येत्या १६ जानेवारीपर्यंत शासनाने ड्राय डे लागू केला आहे.
आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी सुरू असलेला प्रचार मंगळवार १३ जानेवारीला संपणार आहे. याच दिवशी संध्याकाळी ६ वाजल्यापासून ज्या महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे तेथील दारूची सर्व दुकानं बंद राहतील. या नियमाचा प्रभाव महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका क्षेत्रात राहील, ज्यात मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या प्रमुख महानगरपालिका समाविष्ट आहेत. याकाळात नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यासही मनाई करण्यात आली आहे.
Love Tragedy : प्रेमाचा दुर्दैवी अंत! धावत्या वंदे भारत एक्सप्रेससमोर उडी मारून प्रेमीयुगुलाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण आलं समोरराज्य शासनाचे उद्दिष्ट आहे की निवडणूक काळात शांतता, सुरक्षितता आणि अनुशासन राखणे आवश्यक आहे. मद्यपानावरील बंदीमुळे मतदारांना सुरक्षित मतदानाचे वातावरण मिळेल, तसेच निवडणुकीसंबंधी गैरप्रकार आणि दंगली टाळता येतील. दुकानदारांना ही माहिती आधीच देण्यात आली आहे.
HSC Board Exam : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आजपासून मिळणार ऑनलाईन हॉल तिकीट; कसं कराल डाउनलोड ? वाचातसेच सार्वजनिक जागांवर पोलीस व प्रशासनाचे नियंत्रण वाढवले जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.अशा प्रकारे १३ जानेवारीपासून १६ जानेवारीपर्यंत महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांमध्ये चार दिवसांचा ड्राय डे लागू असेल, ज्यामुळे मतदानाची प्रक्रिया सुरक्षित, शांत आणि पारदर्शक होईल, असा विश्वास प्रशासनाला आहे.