T20 World Cup 2026 : बांगलादेशचे सामने भारतात खेळवणार की नाही, BCCI चा निर्णय काय ? मोठी अपडेट समोर
Tv9 Marathi January 12, 2026 08:46 PM

T20 World Cup 2026, Bangladesh : बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणार अत्याचार, त्याचे भारतात उमटलेले पडसाद, बांगलादेशच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये घेण्यास झालेला विरोध, त्यानतंर टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) स्पर्धेत त्यांच्या खएळांडूना भारतात येऊन देण्यास बांगलदेश क्रिकेट बोर्डाने (BCB) केलेला विरोध … या सगळ्या घडामोडींनंतर बांगलादेशच्या (Bangladesh)  संघाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. 2026 च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये बांगलादेशच्या सामन्यांचे ठिकाण बदलू शकते. बीसीसीआयने याबाबत मोठानिर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

मात्र हे ठिकाण श्रीलंकेत असेल की भारतातच कोणत्या दुसऱ्या शहरात या सामन्यांचे आयोजन केले जाईल?, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. येत्या 7 फ्बेरुवारी पासून टी-20 वर्ल्डकप 2026 ही स्पर्धा सुरू होणार असून भारत व श्रीलंका या स्पर्धेचे होस्ट आहेत. आधी ठरलेल्या वेळापत्रकानुसार, बांगलादेशचे सर्व गट सामने मूळतः कोलकाता आणि मुंबईत होणार होते.

बांगलादेशच्या मॅचचं ठिकाण बदलणार

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, बांगलादेशचे सामने श्रीलंकेत स्थलांतरित होण्याची शक्यता कमी आहे. या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की, बांगलादेशचे सामने दक्षिण भारतात हलवले जाण्याची शक्यता जास्त आहे. याचा अर्थ असा की हे सामने कोलकाता आणि मुंबईऐवजी चेन्नई आणि तिरुअनंतपुरममध्ये होऊ शकतात.

गेल्या महिन्यात बांगलादेशात हिंदूंच्या हत्येविरोधात झालेल्या निदर्शनांनंतर बीसीसीआयने बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून काढून टाकले होते. मात्र यामुळे भडकलेल्या बांगलादेश क्रिकेट बोर्डाने,बीसीसीआयच्या कारवाईला प्रत्युत्तर देत आयसीसीला ईमेल पाठवून 2026 च्या टी20 विश्वचषक सामन्यांचे ठिकाण बदलण्याची विनंती केली होती. बांगलादेशने ICCला त्यांचे सामने भारतातून श्रीलंकेत हलवण्याची विनंती केली होती. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी भारतात न खेळण्याची इच्छा त्यांच्या ईमेलमध्ये व्यक्त केली.

ताज्या रिपोर्टनुसार, बांगलादेशच्या सामन्यांच्या ठिकाणी बदल झाल्याचे दिसून येते. ात्र, बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या मागणीमुळे हे झाले की नाही हे सांगणे कठीण आहे, कारण हा बीसीसीआयचा निर्णय असल्याचे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

T20 वर्ल्डकप बांगलादेशचं सध्या शेड्यूल

T20 वर्ल्डकपमध्ये बांगलादेशचा संघ 7 फेब्रुवारीपासून प्रवास सुरू करणार आहे. या शेड्युलनुसार, त्यांचा पहिला सामना कोलकाता येथे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळायचा होता. त्यानंतर, 9 फेब्रुवारी रोजी इटली आणि 14 फेब्रुवारी रोजी इंग्लंडशी त्यांचा सामना होईल. हे दोन्ही सामने कोलकाता येथे होणार आहेत. तर 17 फेब्रुवारी रोजी मुंबईत नेपाळविरुद्ध बांगलादेश त्यांचा शेवटचा लीग सामना खेळेल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.