Cricket Retirement: डिव्हिलियर्सला पहिल्याच सामन्यात बाद करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा; १२०+ विकेट्स नावावर
esakal January 13, 2026 07:45 AM

सध्या भारतात देशांतर्गत क्रिकेट जोरदार सुरू आहे, अशातच आता सोमवारी (१२ जानेवारी) भारताच्या फिरकीपटूने निवृत्तीची (Retirement) घोषणा केली आहे. कर्नाटक आणि मिझोरम संघांकडून खेळलेल्या केसी करिअप्पाने (KC Cariappa) सोमवारी भारतीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत त्याच्या निवृत्तीची माहिती दिली आहे.

Cricket Retirement: 'भारतीय क्रिकेटचा खरा लढवय्या...', स्टार खेळाडूची निवृत्ती; अजिंक्य, शमी, ऋषभ यांची खास पोस्ट

करिअप्पा नुकताच मिझोरमकडून विजय हजारे ट्ऱॉफी २०२५-२६ स्पर्धेतही खेळला. पण या स्पर्धेनंतर त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. त्याने त्याच्या सोशल मिडिया पोस्टमध्ये त्याच्या निर्णयाबाबत माहिती दिली.

त्याने लिहिले की 'रस्त्यावरून हा प्रवास सुरू झाला, तो स्टेडियमच्या लाईट्सपर्यंत आणि सन्मानाने जर्सी घालण्यापर्यंत पोहचला. मी कधीकळी केवळ कल्पना केलेलं स्वप्न जगलो. आज मी केसी करिअप्पा बीसीसीआयच्या क्रिकेटमधून अधिकृतपणे निवृत्तीची घोषणा करत आहे. '

View this post on Instagram

A post shared by KC Cariappa (@cariappa13)