Nashik News : 'एकही झाड तोडणार नाही'; शिवसेना-राष्ट्रवादी-रिपब्लिकन सेना युतीचा नाशिकसाठी 'हरित वचननामा'
esakal January 13, 2026 07:45 AM

नािशक: नाशिकच्या शाश्वत विकास साधताना स्वच्छ, सुंदर व हरित शहर बनविण्याचा निर्धार शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपब्लिकन सेना युतीने व्यक्त केला. शहराचा विकास करताना एकही वृक्ष तोडला जाणार नाही, अशी ग्वाही या तिन्ही पक्षांनी दिली आहे. खड्डेमुक्त नाशिकसह झपाट्याने विस्तारणाऱ्या नाशिकमध्ये वाहतूक व्यवस्थेच्या सक्षमीकरणासह गावठाण भागाचा क्लस्टर विकास करण्याचा शब्द वचननाम्यात देण्यात आला.

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपब्लिकन सेना युतीतर्फे रविवारी (ता. ११) पत्रकार परिषद घेत महापालिका निवडणूकीसाठी वचननामा जाहीर करण्यात आला. याप्रसंगी अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ व हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शिवसेनेचे अनिल ढिकले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

तपोवनातील प्रस्तावित माईस केंद्र व त्यासाठीच्या वृक्षतोडीवरुन राजकारण पेटले असताना शिवसेना-राष्ट्रवादी-रिपब्लिकन सेनेने वचननाम्यात औद्योगिक प्रदर्शन केंद्राला चालना दिली आहे. माजी खासदार भुजबळ यांनी याबाबत बोलताना तपोवनात अडीचशे एकरपैकी ५० एकर जागेत वृक्ष आहे. तो भाग वगळता उर्वरित २०० एकरावर प्रदर्शन केंद्र उभे राहू शकते, असा दावा केला. तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पर्यायी जागेवर केंद्र उभारण्यास सकारात्मक असल्याचे माजी खासदार गोडसे यांनी स्पष्ट केले.

असा आहे वचननामा

शहरात वृक्षतोड न करता विकास साधणार

गोदावरीच्या उपनद्यांचे ‘अक्विफर मॅपिंग’ करून त्यांना बारमाही वाहते करणार

औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी यंत्रणा तत्काळ कार्यान्वित करणार

गोदावरी व उपनद्यांच्या किनारी बांबूची लागवड करून नैसर्गिक तटबंदी निर्माण करणार

देशातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर बनविण्याचा संकल्प

घंटागाड्यांची संख्या वाढवून कचऱ्याचे संकलन केले जाणार

टोलचे १०० रुपये वाचवायला शॉर्टकट घेतला, पण इंजिनिअरनं गमावला जीव; १५ दिवसांपूर्वी घेतलेली नवी कार

विल्होळी येथे ‘बायोडिझेल प्रकल्प’ सुरु करणार

रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी स्वयंचलित यंत्रांचा वापर

ठिकठिकाणी मोबाईल स्वच्छतागृहांची निर्मिती

मोकळ्या भूखंडांवर, उद्यानांत आणि जलकुंभाच्या परिसरात देशी वृक्षांची लागवड

महापालिकेचे संपूर्ण संगणकीकरण,

शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

शहर रस्ते खड्डेमुक्त करताना त्याचे काँक्रिटीकरण करणार

शहरात बस आणि रिक्षा सेवेचा दर्जा वाढविणे

शहरामध्ये डबल डेकर ५० ई-बस प्रस्तावित करणे

मेट्रो सुरू करताना शहरालगतच्या निमशहरांशी ती जोडणार

मुख्य बाजारपेठेत वाहनतळ उभारणे, तीन हजार रिक्षा थांबे

सहाही विभागात भाजीपाला मॉल उभारणार

फाळके स्मारकाचे रूपडे बदलणार

तारांगणाला पुनरुज्जीवित करणे

नाशिक शहर झोपडपट्टीमुक्त करणार

नाशिकला आयटी पार्क कार्यान्वित करणे

शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता किकवी धरण

महापालिकेत पर्यटन विकास सेल सुरू करणार

चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार वितरण करणे

द्वारका येथे ५०० बेडचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल साकारणार

२०० खाटांचे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.