ट्रॅव्हल करताना योग्य कपडे घालणे गरजेचे आहे. कारण यामुळे तुम्हाला कम्फर्टेबल वाटते. अनेकांसाठी ट्रॅव्हलिंग ही एक हॉबी असते. महिलांनी ट्रॅव्हल करताना आरामदायी आऊटफिट निवडणे महत्त्वाचे आहे. चला तर मग महिलांसाठी काही कम्फर्टेबल ट्रॅव्हलिंग आऊटफिट्स जाणून घेऊया… ( Confortable Travel Outfits Tips For Women )
सैल फिट जीन्स
लोअर्स किंवा ट्रॅक पॅन्टपेक्षा जीन्स हा एक चांगला पर्याय आहे. म्हणून, प्रवास करताना तुम्ही लूज-फिट जीन्स घालू शकता. तुम्ही टॉप, कुर्तीसह जीन्स स्टाईल करू शकता. लूज-फिट जीन्स खूप आरामदायक असतात आणि लांब प्रवासादरम्यान त्यामुळे अस्वस्थ वाटत नाही. यामध्ये बॅगी जीन्स आजकाल खूप ट्रेंडी आहेत. प्रवास करताना तुम्हाला आरामदायीआणि फोटोजेनिक लूक मिळतो.
जंपसूट
जंपसूट पुन्हा एकदा लोकप्रिय होत आहेत. प्रवासासाठी ते एक उत्तम पर्याय ठरतात. मात्र लांबच्या प्रवासासाठी जंपसूट टाळा. शॉर्ट ट्रॅव्हलसाठी हे आऊटफिट चांगले ठरते. जर तुमचा जंपसूट स्ट्रॅपी असेल तर तुम्ही तो टी-शर्टवर स्टाईल करू शकता.
ओव्हरसाईज्ड टी-शर्ट
हलके आणि ओव्हरसाईज्ड कपडे प्रवासासाठी परफेक्ट आहेत. तुम्ही ट्रॅव्हल आउटफिट म्हणून जीन्स आणि ओव्हरसाईज्ड टी-शर्ट निवडू शकता. जर तुम्ही थंड ठिकाणी प्रवास करत असाल तर डेनिम जॅकेट घालायला विसरू नका.
कफ्तान ड्रेस
जर तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही कफ्तान ड्रेस स्टाईल करू शकता. हे ड्रेसेस सैल-फिटिंग आणि आकर्षक असतात, ज्यामुळे तुमचा लूक दिसतो. तुम्ही कफ्तानसह जीन्स स्टाईल करू शकता.
शॉर्ट्स आणि टी-शर्ट
शॉर्ट्स आणि टी-शर्ट हे रोड ट्रिपसाठी एक बेस्ट पर्याय आहेत. तुम्ही हलक्या टी-शर्टसह शॉर्ट्स स्टाईल करू शकता. यावर कॅनव्हास शूज घातल्यास आणखी आरामदायी वाटते. ओव्हरसाईज टी-शर्टसह शॉर्ट्स आणखी स्टायलिश दिसतात.
लांब स्कर्ट
जर तुम्ही गरम ठिकाणी प्रवास करत असाल तर कॉटनचे कपडे घालावेत. कारण प्रवासादरम्यान टॅनिंगचा धोका असतो, लॉन्ग स्कर्टमुळे तुमच्या पायांचे टॅनिंगपासून संरक्षण होते. तुम्ही फुल-स्लीव्ह क्रॉप टॉप किंवा फुल-स्लीव्ह टी-शर्टसोबत लॉन्ग स्कर्ट देखील घालू शकता.