Mens Skincare : पुरुषांना स्किनकेअरची गरज असते का?
Marathi January 14, 2026 05:25 PM

अनेकांचा असा समज असतो की स्किनकेअर, मेकअप प्रॉडक्ट या सर्व गोष्टी फक्त महिलांसाठीच असतात. पण हा गैरसमज पूर्णत: चुकीचा आहे. महिलांप्रमाणे पुरुषांनाही स्किनकेअरची गरज असते. त्वचेची काळजी न घेतल्यास महिलांना जसं डाग, मुरुमे, ब्लॅक हेड्स, सुरकुत्या अशा समस्या जाणवतात त्याचप्रमाणे पुरुषांनाही जाणवतात. त्यामुळे पुरुषांची त्वचा जाडसर असली तरी पुरुषांनी डेली रुटीनमध्ये योग्य पद्धतीने त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे.

पुरुषांना स्किनकेअरची गरज असते का?

पुरुषांना स्किनकेअरची गरज असते का? या प्रश्नाचे उत्तर ‘होय’ असे आहे. धूळ, प्रदूषण आणि घामामुळे त्वचेवर मळ साचतो. हवामानातील बदलामुळे त्वचाही कोरडी होते, मुरुमे येतात. त्यामुळे पुरुषांनी स्किनची काळजी घेणे आवश्यक आहे.

कसं कराल?

  • पुरुषांची त्वचा जाडसर असते. त्यामुळे त्वचेवरील धूळ, माती, सूर्यप्रकाश यांचा प्रभाव कमी करण्यासाठी दिवसातून दोन वेळा फेसवॉश करावे.
  • तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला होणारे नुकसान टाळण्यासाठी सनस्क्रीन गरजेचे आहे. त्यामुळे स्किनकेअर रुटीनमध्ये याचा समावेश करावा.
  • बरेच पुरुष नियमित दाढी करतात. ज्यामुळे इरिटेशन, रेझर बर्न, इनग्रोन हेयर्सचा त्रास होतो. अशा परिस्थितीत केसांना शेव्हिंग जेल वापरावे. त्वचेसाठी मॉईश्चरायझ करावे. पुरुषांनी मॉइश्चरायझरचा वापर केल्यास त्वचेच्या अनेक समस्या दूर राहतात.
  • कडक त्वचा घालवण्यासाठी डेड स्किन काढून टाकणे आवश्यक आहे. यासाठी स्क्रबचा वापर करावा. स्क्रब वापरल्याने डेड स्किन निघून जाते.
  • पुरुषांची त्वचा एका स्त्रीच्या तुलनेत जाड असते आणि त्यात कोलेजनचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे वृद्धत्वाची चिन्हे रोखण्यासाठी ऍंटीएजिंग प्रॉडक्ट वापरावेत. यामुळे बारीक रेषा, सुरकुत्या येणार नाहीत.
  • लक्षात ठेवा. स्किनकेअर हे फक्त स्त्रियांसाठीच लागू आहे, असं नाही. हा एक मोठा गैरसमज आहे. पुरुषांनीही त्वचेची योग्य काळजी घेतल्यास फायदाच होतो.

हेही वाचा – Male Fertility : योग्य वयात बाप होणं पुरुषांसाठीही महत्वाचं

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.