RIL कॅपिटल पुसून टाकले मुंबई : 2026 च्या सुरुवातीला अमेरिकेनं व्हेनेझुएललावर हल्ला करुन तिथल्या राष्ट्रपतीला अटक केली आणि स्वत:ला प्रभारी राष्ट्रपती जाहीर केलं आहे. यानंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष वाढला आहे. जागतिक घडामोडींमुळं बाजारात निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा परिणाम रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये नववर्षात 7 टक्क्यांची घसरण झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचं बाजारमूल्य 1.4 लाख कोटी रुपयांनी कमी झाल्यानं गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरवर दबाव येण्याचं मुख्य कारण रशियन कच्चा तेलाच्या खरेदीबाबत वाढलेल्या चिंता आणि कंपनीच्या रिटेल कारभारातील नरमाईचा परिणाम मानला जात आहे. 2025 मध्ये मुकेश अंबानी यांच्या नेतृत्त्वात रिलायन्स इंडस्ट्रीजनं दमदार कामगिरी केली होती. या शेअरमध्ये 29 टक्क्यांची तेजी दिसून आली होती.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या डिसेंबरच्या तिमाहीचे निकाल शुक्रवारी जाहीर केले जाणार आहेत. मात्र, त्यापूर्वी गुंतवणूकदार सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे. बहुतांश ब्रोकरेज फर्म्स रिलायन्स इंडस्ट्रीजबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजची कामगिरी विविध क्षेत्रात संमिश्र कामगिरी आर्थिक वर्ष 2026 मध्ये राहिल्याचं दिसून येतं. ऊर्जा क्षेत्रात रिलायन्सची कामगिरी मजबूत असेल असा अंदाज आहे. तर, दुसरीकडे रिटेल क्षेत्रातील कारभारावर दबाव राहू शकतो.
ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीनुसार, डिसेंबरच्या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजचा EBITDA वार्षिक आधारावर 10 टक्क्यांपर्यंत वाढऊ शकतो. ज्याचं कारण ऑईल टू केमिकेल व्यवसायात 16 टक्क्यांची वाढ हे आहे. कंपनीच्या नफ्यात केवळ एक टक्के वाढ असेल, असा अंदाज आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजा रिटेल कारभार कमजोर दिसून येऊ शकतो. ब्रोकरेज फर्म गोल्डमॅन सॅक्सनं डिसेंबरच्या तिमाहीत रिलायन्स रिटेलच्या विक्रीत जवळपास 10 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. सप्टेंबर तिमाहीत 21.3 टक्के वाढ दिसून आली होती. मॉर्गन स्टॅनलीच्या मते रिटेल सेगमेंटमध्ये वाढ कमी होऊन 9 ते 10 टक्क्यांपर्यंत येऊ शकतं. कंझ्युमर प्रोडक्ट बिझनेसच्या विलिनीकरणचा रिटेल व्यवसायाच्या वेगावर परिणाम दिसून येऊ शकतो.
दरम्यान,सेन्सेक्समध्ये आज 244.98 अंकांची घसरण होऊन ते 83382.71 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 50 मध्ये 66.70 अंकांची घसरण होऊन निर्देशांक 25665.60 अंकांवर बंद झाला.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा