Latest Marathi News Live Update : शिवसेना शिंदे गट आणि उबाठा गट आमने सामने, स्लिप वाटपावरून वाद
esakal January 15, 2026 04:45 AM
kalyan live : शिवसेना शिंदे गट आणि उबाठा गट आमने सामने, स्लिप वाटपावरून वाद

कल्याणच्या भोईरवाडी परिसरात शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. निवडणूक प्रचारादरम्यान स्लिप वाटपाच्या कारणावरून दोन्ही गटांमध्ये जोरदार वाद झाला.

Turkman Gate stone pelting case: दिल्लाच्या तीस हजारी न्यायालयाने दगडफेक प्रकरणात अटक केलेल्या ५ आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावले

तुर्कमान गेट दगडफेक प्रकरणी दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने दगडफेक प्रकरणात अटक केलेल्या ५ आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले. आरोपांचे गांभीर्य आणि तपासाची सुरुवातीची अवस्था लक्षात घेऊन न्यायालयाने अदनान, कैफ, काशिफ, अरीब आणि समीर यांचे जामीन अर्ज फेटाळले.

Mumbai News: मतदानदिनी अॅक्वा लाईन मेट्रोची विशेष सेवा

१५ जानेवारी २०२६ रोजी बीएमसी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अॅक्वा लाईन मेट्रोची विशेष सेवा

मतदान कर्मचारी व अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त मेट्रो फेऱ्या

सकाळी ५.०० ते रात्री १२.०० (मध्यरात्र)पर्यंत मेट्रो सेवा सुरू

आरे जेव्हीएलआर व कफ परेड टर्मिनल्सवरून शेवटची मेट्रो रात्री १२.०० वाजता

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून विशेष व्यवस्था

BMC Election 2026: महापालिका निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित दिसत आहे - भाजप नेत्या पूनम महाजन

बीएमसी निवडणुकीबद्दल भाजप नेत्या पूनम महाजन म्हणतात, "महाराष्ट्रामध्ये २९ ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. आम्ही प्रत्येक शहरासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार केला आहे... आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला पाठिंबा मिळत आहे. बीएमसी आणि मुंबई महानगर प्रदेशातील ९ महानगरपालिकांबद्दल बोलायचे झाल्यास, मुख्यमंत्री फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ या काळात एक मास्टरप्लॅन तयार केला होता की, आपण एमएमआरचा जितका जास्त विकास करू, तितकाच तो महाराष्ट्र आणि देशाच्या विकासासाठी फायदेशीर ठरेल. गेल्या काही वर्षांत तुम्ही पाहिले असेलच की, मेट्रो असो, कनेक्टिव्हिटी असो, पायाभूत सुविधा प्रकल्प असोत, लोकांची घरे असोत किंवा प्रत्येक घराला पाणीपुरवठा असो, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पूर्वीच्या सत्ताधारी पक्षांनी न केलेल्या प्रत्येक लहानसहान गोष्टीची आम्ही काळजी घेतली आहे. हे केवळ कागदावर नाही, तर ते जमिनीवरील वास्तव म्हणूनही दिसत आहे. त्यामुळे, मला महायुतीचा विजय निश्चित दिसत आहे. लोकांना आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे आणि आम्हालाही लोकांच्या हितासाठी जबाबदारीने काम करायचे आहे."

Jalgaon News: मुक्ताईनगर शहराचा कायापालट करणार - नवनिर्वाचित नगराध्यक्ष संजना पाटील

मुक्ताईनगर नगरपंचायतीत शिंदे शिवसेनेचा संजना पाटील पदभार स्वीकारला

आज मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी देवयानी शिरसाठ यांची बिनविरोध उपनगराध्यक्ष पदी तर छोटू बाबुराव भोई व नितीन मदनलाल जैन यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली.

उपनगराध्यक्ष स्वीकृत नगरसेवकांची निवड होणार असल्याने मुक्ताईनगर नगरपंचायत परिसरात परिसरात कार्यकर्ते व पदाधिकारी गर्दी.

मुक्ताईनगर शहराचा विकास करू मुक्ताईनगरचा कायापालट करणार असल्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संजना पाटील यांनी सांगितले

Ashish Shelar: राज ठाकरेंनी पराभवाची कारणं शोधून हे धंदे बंद करावे - आशिष शेलार

तुमच्या ज्ञानावर हसावं की रडावं, एका अर्थाने हे लोक बिंडोखपणाची विधानं करतात. राज ठाकरे यांना माझा सल्ला आहे की, तुमचे सल्लागार तुम्हाला फसवत आहेत. उमेदवाराला कोणाच्याही घरी जाण्याची बंदी कधीच न्हवती, राज ठाकरेंनी पराभवाची कारणं शोधून हे धंदे बंद करावे, असे म्हणत मंत्री आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Kolkata Live: कोलकातामधील गांगुली स्ट्रीटवर लागलेल्या भीषण आगीमुळे तीन दुकानांचे नुकसान

कोलकातामधील गांगुली स्ट्रीटवर दोन तास लागलेल्या भीषण आगीमुळे तीन दुकानांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग नियंत्रणात आणली आहे.

दक्षिण कोलकाताचे अग्निशमन अधिकारी सुदीप्तो बी यांनी माहिती दिली आहे की आग पूर्णपणे नियंत्रणात आणली आहे. मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. १० अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. या आगीत ३ दुकाने आणि आजूबाजूच्या परिसराला फटका बसला आहे.

Maharashtra Live: २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या मतदानासाठी प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा सज्ज

उद्या महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूकांसाठी मतदान होणार आहेत. या मतदानासाठी प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.

Kolhapur Live: कोल्हापूर महानगरपालिका निवडणूकीसाठी यंत्रणा सज्ज

उद्या होणाऱ्या महानगरपालिका निवडणूकीसाठी कोल्हापूरमध्ये यंत्रणा सज्ज. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

PCMC Live : पतंग उडवताना विजेचा धक्का; पिंपरी-चिंचवडमधील १४ वर्षीय मुलाने गमावला जीव

पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी फाटा परिसरात पतंग उडवताना विजेचा धक्का बसून १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Pune Live : पुण्यात आचारसंहिता भंगावर पोलिसांचा कडक दणका; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात लागू असलेल्या आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये १७९ गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यातून १ कोटी २३ लाख ९० हजार ५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तसेच अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार करण्यात आलेल्या कारवाईत १२६ ग्रॅम एमडी, ३ किलो ९४७ ग्रॅम गांजा, ७ किलो २८६ ग्रॅम नॉरकोटिक्स गोळ्या, २१२ टॅब्लेट आणि ५७ ग्रॅम ७८० मिलीग्रॅम चरस असा एकूण २६ लाख ८४ हजार ७२९ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Mumbai Live : नालासोपारात बविआ-भाजप कार्यकर्त्यांत मध्यरात्री तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

नालासोपारा पूर्वेतील संतोष भुवन प्रभाग क्रमांक १८ मध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. पैसे वाटपाच्या संशयावरून मध्यरात्री सुमारे दोनच्या सुमारास दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने भिडल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

ChiplunLiveupdate : चिपळूणमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का, माजी आमदार रमेश कदम यांचा पक्षाचा राजीनामा

चिपळूणमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. नगरपंचायत निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या माजी आमदार रमेश कदम यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. नगरपंचायत मधील प्रभाव रमेश कदम यांच्या जिव्हारी लागला आहे. पक्षात त्यांची किंमत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रमेश कदम यांच्या राजीनाम्याने खळबळ उडाली आहे.

Nanded live update : नांदेड महानगरपालिकेसाठी उद्या मतदान, 81 जागेसाठी 491 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

नांदेड महापालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे तयार आहे. 20 प्रभागांमधील 81 जागांसाठी 491 उमेदवार निवडणुकीत सहभागी झाले आहेत. शहरातील पाच लाख एक हजार 799 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. 600 मतदान केंद्रांवर 3400 कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी तैनात आहेत. 81 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीचा निकाल 16 तारखेला जाहीर होईल. नांदेड महापालिकेवर कोणाची सत्ता येणार याची नांदेडकरांना उत्सुकता आहे.

ThaneLive Update : ठाण्यात प्रचाराच्या नावाखाली प्रभाग क्रमांक ०६ मध्ये पैसे वाटप

ठाण्यातील प्रभाग क्रमांक ०६ मध्ये पैशांचा वर्षाव..डमी मशीनद्वारे प्रचाराला सुरुवात...माजी नगरसेवक दिगंबर ठाकूर यांनी स्थानिकांना पैसे वाटप केल्याचा व्हिडिओ व्हायरल..जवळच्या लोकांना १००० रुपये तर इतरांना ५०० रुपये देण्याचा आरोप...शिंदे गटाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत जगदाळे वर्तक नगर पोलिस ठाण्यात दाखल...

Politics Live : सांगली महापालिका निवडणुकीच्या मतदानाची प्रशासनाकडून जय्यत तयारी

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडत आहे. तिन्ही शहरांच्या महापालिकेसाठी एकूण वीस प्रभागात 78 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यासाठी तब्बल 381 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. उद्या पार पडणाऱ्या मतदानासाठी आज मिरजेतील वेअर हाऊस मधून मत पेट्या रवाना करण्यात येत आहेत. महापालिका क्षेत्रामध्ये एकूण 527 मतदान केंद्रे करण्यात आलेत. सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेसाठी एकूण चार लाख 54 हजार 430 मतदार आपला मतदानाचा हक्क उद्या बजावणार आहेत. अनेक दिग्गजाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे मतदार राजा उद्या कोणाला कौल देणार हे उद्या मतपेटीत कैद होणार आहे..

Politics Live : भाजपचे "ऑपरेशन लोटस" 2.0, झेडपी निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजप मध्ये जाणार

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदीप गारटकर यांचा प्रवेश आता निश्चित झाला असून पुढील काही दिवसातच अधिकृत प्रवेशाची तारीख जाहीर होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्यानंतर गारटकर भाजप मध्ये जाणार असल्याचा चर्चा राजकीय वर्तुळात फिरत असताना आता यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

Politics Live : जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी 291 मतदान केंद्रावर होणार मतदान प्रक्रिया पार पडणार असून 2 लाख 45 हजार 929 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे.जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी 350 कंट्रोल युनिट तर 1 हजार 400 बॅलेट युनिट असणार आहे.जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी 65 जागांसाठी तब्बल 454 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.302 पक्षाचे उमेदवार तर 152 अपक्ष उमेदवारांच राजकीय भवितव्य याच ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे. दरम्यान उद्याच्या महानगरपालिका निवडणुकीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात असणार आहे 515 पोलीस कर्मचारी आणि 42 अधिकारी तैनात असणार आहे .

Mumbai Live: बिनविरोध नगरसेवकांविरोधातील याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली

बिनविरोध नगरसेवकांविरोधात दाखल केलेली मनसेची याचीका मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावलीय. राज्यात अनेक ठिकाणी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं बिनविरोध नगरसेवक निवडून आले. बिनविरोधसाठी दबाव टाकल्याचा आरोप करत मनसेच्या अविनाश जाधव यांनी हायकोर्टात धाव घेतली होती.

Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अहमदाबादमधील जगन्नाथ मंदिरात सहकुटुंब भेट देऊन केली पूजा PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांच्या निवासस्थानी केला पोंगल उत्सव साजरा Chh. Sambhajinagar: एमबीए, एमसीए सीईटीच्या नोंदणीस आजपासून सुरवात

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे २०२६ मध्ये होणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी एमबीए, एमसीएसह सात अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणी आजपासून (बुधवार, १४ तारखेपासून) सुरू होत आहे. ही नोंदणी १६ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन चालणार आहे.

उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल, राज ठाकरेंची घेतली भेट

उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल झाले आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची भेट घेतली आहे.

ठाकरे बंधूंमध्ये मतदानाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

नागपुरात महानगरपालिका निवडणुकीसाठी मतमोजणीची तयारी पूर्ण

नागपुरात महानगरपालिका निवडणुकीसाठी मतमोजणीची तयारी पूर्ण

नागपुरात महानगरपालिका निवडणुकीसाठी मतमोजणीची तयारी पूर्ण झालेली आहे..

नागपुरात होत असलेल्या निवडणुकीमध्ये राज्याचा मुख्यमंत्री यांचा होमटाऊन असलेल्या नागपुरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे यंदा भाजप आपला गड काबीज ठेवण्यात यशस्वी होतं का हे पाहावं लागणार आहे.

नागपूर शहरात 3004 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे शहरातील दहा वेगवेगळ्या झोनमध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

नागपूर शहरात जवळपास 16000 कर्मचारी या मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेमध्ये सहभागी असणार आहे. तेच 5000 च्या घरात पोलीस कर्मचारी असणार आहे.

नागपूर शहरात जवळपास 321 संवेदनशील मतदान केंद्र आहे...त्यावर पोलीस आणि निवडणूक विभागाची करडी नजर असणार आहे.

सुमारे 25 लाखाचा घरात मतदार असून 151 उमेदवार निवडून देणार आहे...

रत्नागिरीच्या सृजनने मध्यप्रदेशातील पचमढी येथे पार पडलेले रॉक क्लायबिंग चॅलेंज

रत्नागिरीच्या सृजनने मध्यप्रदेशातील पचमढी येथे पार पडलेले रॉक क्लायबिंग चॅलेंज

मध्य प्रदेशातील पचमढी येथे झालेल्या ‘पचमढी क्लायबिंग चॅलेंज २.०’ स्पर्धेत सृजन पटवर्धनने तिसरा आणि प्रसाद शिगवण याने ६ वा क्रमांक पटकावत रत्नागिरीच्या साहसी क्रीडाक्षेत्राला नवी ओळख मिळवून दिली आहे.

देशातील नामांकित राष्ट्रीय रॉक क्लायबिंग स्पर्धेत ताकद, कौशल्य व चिकाटीच्या जोरावर दोन्ही गिर्यारोहकांनी यश मिळवले आहे.

Bhiwandi Nizampur Municipal Corporation: भिवंडी निजामपूर महानगरपालिकेत 6 जागा भाजपच्या बिनविरोधात

भिवंडी निजामपूर महानगरपालिकेत 23 प्रभाग असून 90 जागेवर निवडणुका पार पडत आहे. त्यामध्ये सहा जागा या भाजपच्या बिनविरोध निवडून आलेले आहेत. उर्वरित एकूण 84 जागेसाठी निवडणूक पार पडत आहे .

भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचा आढावा बघितला तर ह्या महापालिकेमध्ये भाजपचे 12 ते 13 नगरसेवक हे निवडून येण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे 25 नगरसेवक हे निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकंदर बघितलं गेले तर समाजवादी पार्टीचे उमेदवार देखील रिंगणात उभे असून 15 ते 20 जागा ह्या समाजवादी पार्टीच्या निवडून येण्याची शक्यता आहे. तर शरद पवार गटाच्या एकूण चार ते पाच जागा अजितदादा पवार गटाचे दोन तर उद्धव ठाकरे गटाचे 5 ते 6 शिवसेना शिंदे गटाचे 4 ते 5 जागेवर नगरसेवक निवडून येण्याची शक्यता आहे. कोर्णक आघाडी आघाडीच्या चार जागा हे निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर भिवंडी विकास आघाडीच्या चार ते पाच अपक्ष उमेदवार 13 जागेंवर निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Nagpur News: संक्रांतीनिमित्त हॉट एअर बलून द्वारे मतदानाचा संदेश

नागपूर महानगर पालिकेच्यावतीने ईश्वर देशमुख मैदानावर बलून फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले.

संक्रांति निमित्त हॉट एअर बलून द्वारे मतदानाचा संदेश, 'स्वीप' उपक्रमांतर्गत मनपाद्वारे करण्यात आली जनजागृती

या उपक्रमातून निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला

या माध्यमातून 'करा मतदान,सांगताय संविधान' असा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.

Mumbai News: पार्क केलेल्या बाईकवर चोरट्यांची नजर; पोलिसांची मोठी कारवाई

मुंबईच्या डी एन नगर पोलिसांनी बाईक चोरी करणाऱ्या टोळी विरुद्ध मोठी कारवाई केली आहे.

अटक आरोपीच्या टोळीकडून चोरीला गेलेल्या 46 मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.

तसेचा आरोपीच्या टोळी संदर्भात डी.एन नगर पुढील तपास करत आहेत...

Live : फोंडाघाट अवजड वाहनांसाठी 15 जानेवारीपासून बंद; हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग जाहीर

कोकणातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा फोंडाघाट 15 जानेवारीपासून अवजड वाहनांना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 15 जानेवारीपासून ते 13 फेब्रुवारी पर्यंत हा रस्ता अवजड वाहनांना बंद करण्यात येणार आहे. हलक्या वाहनांना तात्पुरता पर्यायी रस्ता हा फोंडा कनेडी मार्गे कणकवली असा वळवण्यात आला आहे. तर अवजड वाहनांसाठी गगनबावडा घाटमार्गे वाहतूक करावी असा निर्णय शासनाने घेतला आहे.

Amravati Live: माजी नगरसेवकाच्या घरासमोर पैसे वाटल्याचा युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आरोप

अमरावतीच्या बेलपुरामध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाच्या घरासमोर पैसे वाटल्याचा युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आरोप....

पैसे वाटण्याच्या आरोपावरून भाजप आणि युवा स्वाभिमान च्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची.....

आधी रॅली काढण्यावरून युवा स्वाभिमान आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने तर आता युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी केला भाजपच्या माजी नगरसेवकाच्या घराजवळ पैसे वाटल्याचा आरोप..

युवा स्वाभिमान आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमधील वादाचा व्हिडिओ व्हायरल..

Nagpur Municipal Corporation Election : नागपूरमध्ये मनपा निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी 'आपली बस' सेवा आज पूर्णपणे बंद राहणार

मनपा निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी 'आपली बस' सेवा आज पूर्णपणे बंद राहणार आहे. मनपा निवडणूक कामासाठी 525 आपली बसेसचे व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे आज शहर बससेवा पूर्णपणे बंद राहील, तर उद्या मर्यादित मार्गावर 250 बस सुरू राहतील. 16 जानेवारीपासून शहर बससेवा आपल्या नियोजित वेळापत्रकानुसार पुन्हा सुरू होईल.

Tulja Bhavani Temple : तुळजाभवानी मंदिरात आज सायंकाळी 5 ते 6 यावेळेत पुरुषांना प्रवेश बंदी

तुळजापूर : तुळजाभवानी मंदिरात आज सायंकाळी 5 ते 6 वेळेत पुरुषांना प्रवेश बंदी आहे. मकर संक्रांतीनिमित्त तुळजाभवानी मातेला ओवसण्यासाठी स्थानिक महिला मंदिरात गर्दी करतात. स्थानिक महिला व सुवासिनींना मंदिरात प्रवेशासाठी आधार कार्ड अनिवार्य असणार आहे. मकर संक्रांतीनिमित्त तुळजाभवानी मंदिरात भाविकांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानाने हा निर्णय घेतलाय.

Belgaum News : महापौर मंगेश पवार, जयंत जाधव यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

बेळगाव : खाऊ कट्टा प्रकरणात महापौर मंगेश पवार व नगरसेवक जयंत जाधव यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांचा अपात्रतेचा निर्णय बंगळूर उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. त्यामुळे महापौर पवार यांचा एक वर्षाचा कार्यकाळ आता पूर्ण होणार, हे नक्की झाले आहे. उच्च न्यायालयाने आज हा निर्णय दिला आहे.

ZP Election : राज्यातील बारा 'झेडपीं'चा बिगुल वाजला; मतदान पाच फेब्रुवारीला तर मतमोजणी होणार सातला

मुंबई : राज्यातील बहुप्रतिक्षित बारा जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे बिगुल अखेर आज वाजला. पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून सातला मतमोजणी पार पडेल. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज सह्याद्री अतिथिगृह येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत घोषणा केली. यावेळी पत्रकार परिषदेस सचिव सुरेश काकानी हे देखील उपस्थित होते.

Delhi Weather : दिल्लीचा पारा तीन अंशांवर; चंडीगडमध्ये नऊ वर्षांतील नीचांकी तापमानाची नोंद

नवी दिल्ली : काश्मीरमध्ये नव्या हिमवृष्टीची प्रतीक्षा असतानाच मंगळवारी दिल्लीत गेल्या तीन वर्षांतील जानेवारीतील सर्वांत कमी तापमान नोंदवले गेले, तर चंडीगडमध्येही गेल्या नऊ वर्षांतील नीचांकी तापमानाची नोंद झाली. राजस्थान, पंजाब, हरियाना आणि झारखंडमध्ये थंडीची लाट तीव्र होत आहे. मंगळवारी दिल्लीत किमान तापमान ३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने गेल्या तीन वर्षांतील जानेवारीतील सर्वात थंड सकाळ नोंदवली गेली.

Municipal Elections : आता सर्वच राजकीय पक्षांचा घरोघरी राहणार प्रचारावर; जाहीर प्रचाराची अधिकृत सांगता

Latest Marathi Live Updates 14 January 2026 : राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या २९ महापालिकांच्या निवडणूक प्रचाराचा धडाकेबाज समारोप झाला. बड्या नेत्यांच्या सभा, रोड शो आणि जाहीर मुलाखतींमुळे संपूर्ण राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. प्रमुख शहरांतील रस्ते, चौक आणि गल्लीबोळांत केवळ निवडणूक प्रचाराच्याच चर्चा सुरू होत्या. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार काल सायंकाळी पाच वाजता जाहीर प्रचाराची अधिकृत सांगता करण्यात आली. आता सर्वच राजकीय पक्षांचा भर हा घरोघरी प्रचारावर राहणार आहे. दरम्यान, राज्यातील बहुप्रतिक्षित १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे बिगुलही अखेर वाजले आहे. येत्या ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारीला मतमोजणी पार पडणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सह्याद्री अतिथिगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत या निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत घोषणा केली. याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलताना लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “पाकिस्तानविरुद्ध सुरू करण्यात आलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप सुरूच आहे. भविष्यात कोणतीही आगळीक घडल्यास त्याला ठोस आणि निर्णायक प्रत्युत्तर दिले जाईल.” याशिवाय देश आणि राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, वाहतूक कोंडी, राजकीय हालचाली, क्रीडा, मनोरंजन तसेच मान्सूनविषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी एका क्लिकवर सविस्तर माहिती मिळवा...

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.