swt142.jpg
17686
बेळगाव ः सुरेश ठाकूर यांना बालसेवा पुरस्काराने गौरविण्यात आले.
केंद्रीय ''बालसेवा'' पुरस्काराने
सुरेश ठाकूर यांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. १४ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ कथामाला कार्यकर्ते आणि साने गुरुजी कथामाला मालवणचे अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर यांना अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचा केंद्रीय बालसेवा पुरस्कार बेळगाव येथे सपत्नीक प्रदान करण्यात आला.
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई आणि दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव (कर्नाटक) यांच्यावतीने बेळगाव येथे लोकनेते प्रा. एन. डी. पाटील कथानगरीत कथामालेचे अमृत महोत्सवी अधिवेशन झाले. ठाकूर यांच्या गेल्या ५५ वर्षांच्या बालसेवेच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार साने गुरुजी कथामाला केंद्रीय अध्यक्ष हसन देसाई (मुंबई) आणि आकाश चौगुले (आयआरएस अप्पर आयुक्त, बेळगाव) या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख ११ हजार, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.या पुरस्काराबाबत श्री. ठाकूर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.