Rekha vs Jaya Bachchan : रेखा की जया बच्चन, दोघींपैकी कोणाचं शिक्षण सर्वात जास्त ?
Tv9 Marathi January 15, 2026 01:45 PM

Rekha vs Jaya Bachchan Education : बॉलिवूडचे ‘शहनेशाह’ म्हणून ओळखले जाणारे सर्वात मोठे लिजेंड अमिताभ बच्चन यांनी वयाची 80 वर्ष पार केली असली तर ते ॲक्टिव्ह आहेत. छोटा पडदा असो वा सिनेमा त्यांचा अभिनय अविरत सुरू असतो. या ज्येष्ठ अभिनेत्याने हिंदी चित्रपटसृष्टीत साडेपाच दशके पूर्ण केली आहेत आणि आतापर्यंत 180 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या चित्रपट आणि अभिनयासोबतच, बिग बी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिले आहेत.

अमिताभ बच्चन यांचे लग्न ज्येष्ठ अभिनेत्री जया भादुरी (Jaya Bachchan ) यांच्याशी झालं.  लग्नानंतर त्या जया बच्चन झाल्या.  पण रेखा (Rekha ) यांच्यासोबतच्या त्यांच्या नात्याचीही बरीच चर्चा झाली. मात्र ते कोणत्याही नातेसंबंधांत बदललं नाही. तर अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया आणि अभिनेत्री रेखा यांच्यापैकी कोण जास्त शिक्षित आहे ? ते जाणून घेऊया.

रेखा यांचं शिक्षण

रेखा ही ज्येष्ठ अभिनेत्री पुष्पवल्ली आणि अभिनेता जेमिनी गणेशन यांची मुलगी आहे. रेखाचा जन्म 11 ऑक्टोबर 1954 साली चेन्नई येथे झाला. त्यांनी चेन्नईतील चर्च कॉन्व्हेंट स्कूलमध्ये प्रवेश घेतला. मात्र आर्थिक तंगीमुळे त्या जास्त शिकब शकल्या नाही आणि लवकरच त्यांनी शाळा सोडली. यानंतर, त्यांनी लहान वयातच चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. “रंगुला रत्नम” या तमिळ चित्रपटातून बालकलाकार म्हणून रेखा यांनी पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी 1970 साली आलेल्या “सावन भादों” या चित्रपटातून मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

जया बच्चन यांचं शिक्षण

जया बच्चन यांचा जन्म 9 एप्रिल 1948 साली मध्य प्रदेशातील जबलपूर येथे झाला. त्यांनी भोपाळमधील सेंट जोसेफ स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी कला विषयात पदवी प्राप्त केली. त्यानंतर, अभिनयात करिअर करण्यासाठी, त्यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मध्ये प्रवेश घेतला. 1971 साली आलेल्या “गुड्डी” या चित्रपटातून जया बच्चन यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, ज्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यासोबत त्यांनी काम केलं. नंतर त्यांचे अनेक चित्रपच भूमिका गाजल्या.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.