Shattila Ekadashi Simple Remedies for Prosperity: आज षटतिला एकादशी साजरी केली जात आहे. या दिवशी भगवान विष्णूची मनोभावे पूजा केली जाते. असं म्हणतात की या दिवसी व्रत आणि काही सोपे उपाय केल्यास आयुष्यात सुख -समृद्धी लाभते.
षटतिला एकादशीचे उपायया दिवशी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. तिळाला खास महत्व आहे. असं केल्याने पुण्य मिळतं. घरातील नकारात्मकता दूर होते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यास आयुष्यात सुख समृद्धी लाभते. तसेच घरात शांती राहते.
कोणत्या वस्तू कराव्या दानया दिवशी गरजूंना गरम कपडे, अन्न, ब्लॅकेट दान करणे शुभ मानले जाते. यामुळे आर्थिक समस्या कमी होतात. तसेच आयुष्यातील प्रगतीचे मार्ग खुले होतील.
सकाळी उठून स्नान करावे. स्वच्छ कपडे परिधान करावे. श्रीकृष्ण मंत्राचा जप करावा. असं केल्याने पुण्य मिळते.
भगवान श्री कृष्णाची पूजा करावी. या दिवशी रात्री जागरण आणि हवन करणं शुभ मानलं जाते.
तिळाच्यापाणानेस्नान करावं. तसेच तिळाचे उटण लावावे. या दिवशी तिळाला खुप महत्व आहे.
तिळाची पाणी प्यावं. तसेच गरजूंना तिळाचं दान नक्की करावे. यामुळे आर्थिक समस्या कमी होतात.
तिळाच्या पदार्थांना खास महत्व आहे. तसेच कथा वाचन करावे.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.