Ichalkaranji Election : केंद्र–राज्य सरकारच्या निधीतून इचलकरंजीचा सर्वांगीण विकास आमदार राहुल आवाडे
esakal January 15, 2026 02:45 PM

इचलकरंजी : शहापूर परिसर हा इचलकरंजी शहराचा महत्वाचा अभिवाज्य घटक बनलेला आहे. आम्ही सर्वांनी शहापूरच्या परिसराच्या विकासासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे या परिसरातून आमच्या विजयाचा ‘श्रीगणेशा’ होणार असून,

तो अखेरच्या प्रभागापर्यंत कायम राहिल, असा विश्वास आमदार राहुल आवाडे यांनी व्यक्त केला. तसेच  शहापूर परिसरातील विकासकामे, मूलभूत नागरी सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता आदी प्रश्न आगामी काळात मार्गी लागतील.

Ichalkaranji Election : भाजपमधील नाराजीचा फटका; रखडलेले प्रश्न शिव-शाहू विकास आघाडीला संधी देणार

विकासाच्या दृष्टीने सातत्यपूर्ण व सक्षम नेतृत्व गरजेचे असल्याने सर्वांनी महायुतीच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. इचलकरंजी महापालिका प्रभाग क्रमांक एकमधील महायुतीच्या उमेदवार कृष्णनाथ शिंदे, मेघा भाटले, रणजीत अनुसे, दिपाली कांबळे यांच्या प्रचारार्थ गावचावडी चौक शहापूर येथे सोमवारी झालेल्या जाहीर सभेत आमदार आवाडे बोलत होते.

यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांची उपस्थिती होती. आमदार आवाडे म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून इचलकरंजीसाठी सातत्याने निधी मिळाला आहे.

Ichalkaranji Election : महापालिकेत महायुतीची सत्ता आली तर विकासासाठी निधीचा ओघ वाढेल; खासदार धैर्यशील माने यांचे इचलकरंजीत आश्वासन

आता महापालिकेत सत्ता आल्यास शहरासह परिसराचाही विकास साधता येणार आहे. याप्रसंगी श्रीनिवास कांबळे, दादासो भाटले, पांडुरंग सोलगे, अनिल बमण्णावर व नागरिक उपस्थित होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.