आठ दिवसांत चार बकऱ्यांचा मृत्यू
जोगलवाडीत विचित्र आजाराचा प्रादुर्भाव
मोखाडा, ता. १४ (बातमीदार) ः तालुक्यातील सायदे-जोगलवाडी ग्रामपंचायतीमधील जोगलवाडीत संसर्गजन्य रोगामुळे आठ दिवसांत ४ बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेळीपालन करणारे आदिवासी शेतकरी हवालदिल आहेत.
जोगलवाडीतील राजेवाडीमध्ये गाय, बैल आणि वासरांना विचित्र आजाराची लागण होऊन मृत्यू झाला होता.. तर अन्य जनावरांना त्याची लागण होऊ लागली आहे. ही घटना ताजी असतानाच भरत पाटील यांचा १ बोकड, देवानंद मुकणे यांचे दोन तर सुनंदा हिलम यांची एक अशा चार बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेळीपालन करणारे शेतकरी अडचणीत आले आहेत.