टॉसही झाला नाही! बांग्लादेश प्रीमियर लीगची पुरती लाज गेली, सामना खेळण्यास खेळाडूंचा नकार
GH News January 15, 2026 06:11 PM

बांगलादेशात सध्या काहीच व्यवस्थित नसल्याचं दिसून येत आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने भारतात टी20 वर्ल्डकप खेळणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आधीच अडचणीत सापडले आहेत. असं असताना अजून एक संकट ओढावलं आहे. यासाठी खुद्द बांग्लादेश क्रिकेट बोर्ड जबाबदार आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्ड आणि बांग्लादेश क्रिकेटर्स वेल्फेयर असोसिएशन यांच्यात तणाव विकोपाला गेला आहे. खेळाडूंच्या असोसिएशनने बीसीबीचे फायनान्स कमिटीचे चेअरमन नजमुल हसनच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नजमुल हसन यांना पदावरून दूर करत नाही, तो पर्यंत खेळणार नाही, अशी भूमिका खेळाडूंनी घेतली आहे. नजमुल हसनच्या एका वक्तव्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे.

नजमुल हसनच्या मते, बांगलादेशने टी20 विश्वचषकातून माघार घेतली तर त्याचे नुकसान खेळाडूंना होईल, बोर्डाला नाही. इतकंच काय तर त्यांनी बांगलादेशचा दिग्गज खेळाडू तमीम इक्बालला भारतीय एजंट संबोधले होते. त्यामुळे क्रिकेटपटू संतापले आहेत. बांगलादेश टी20 विश्वचषकात खेळला नाही तर तो खेळाडूंना नुकसानभरपाई देणार नाही, असे नझमुल हसन यांनी म्हटले आहे. “आपण नुकसान भरपाई का द्यावी? जर ते कुठेही जाऊन काहीही करू शकत नसतील तर आपण त्यांच्यावर खर्च केलेल्या कोट्यवधी रुपयांची परतफेड करावी का?”, असं नजमुल हसन म्हटले होते. त्यांच्या विधानामुळे खेळाडूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. त्याचा परिणाम बांगलोदश क्रिकेट लीगवर होत आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. पण बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिला आहे. इतकंच काय आयसीसीने टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून बांगलादेशला वगळलं तरी बोर्डाचं काहीच आर्थिक नुकसान होणार नाही. कारण खेळाडूंना सामना शुल्क मिळणार नसल्याने बोर्डाचं आर्थिक नुकसान होणार नाही. उलट खेळाडूंना फटका बसेल. यापूर्वी नजमुल हसनने यापूर्वी बांगलादेशचा माजी कर्णधार तमीम इकबालवर टीका केली होती. कारण त्याने बोर्डाला टी20 वर्ल्डकप स्पर्धेबाबत निर्णय घेताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला होता. इतकंच क्रिकेटला प्राधान्य देण्याचा सल्लाही दिला. त्यानंतर नजमुलने त्याच्यावर भारताचा एजंट असल्याचा आरोप केला होता.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.