महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती
Marathi January 15, 2026 07:25 PM

जळगाव : राज्यातील महापालिका (Election) निवडणुकांसाठी मतदान होत असून दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी सरासरी 30 टक्क्यांच्या पुढे पोहोचली आहे. मात्र, काही महापालिका क्षेत्रात गटातटात आणि उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, आता जळगावमध्ये (जळगाव) गोळीबार (Firing) झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे, याप्रकरणी पोलीस अधीक्षकांनी माहिती दिली.

जळगाव शहरातील पिंपराळा परिसरामध्ये हवेत गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती असून दोन तरुणांमध्ये झालेल्या वादानंतर ही गोळीबाराची घटना घडली. त्यानंतर, पोलिसांचा मोठा फौजफाटा पिंप्राळा परिसरात दाखल झाला असून गोळीबार नेमका कुठल्या कारणावरून झाला अद्याप स्पष्ट नाही. आता, पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून गोळीबार करणाऱ्या तरुणांचाही शोध घेतला जात आहे. याप्रकरणीजळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी माहिती दिली. गोळीबारच्या घटनेवर पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, पिंपराळा भागातील रहिवासी असलेले सचिन आणि मुस्तफा नामक तरुणांमध्ये आर्थिक विषयावरून वाद होता. त्यातून गोळीबारची घटना घडलेली आहे. या घटनेचा मतदानाशी काहीही संबंध नाही. दरम्यान, जनतेने निर्भीडपणे मतदान करावे, असे आवाहन देखील पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी केले आहे.

जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक2025-26

दुपारी. 1.30 पर्यंत मतदान.

पुरुष मतदान = 54132

महिला मतदान = 44509

एकूण मतदान = 98641

टक्केवारी =२२.४९ %

जालन्यात बोगस मतदार आणल्याचा आरोप

जालन्यात अपक्ष उमेदवाराचे प्रतिनिधी शंकर घोडके यांनी भाजपच्या संध्या देठे यांच्यावर 600 ते 660 बोगस मतदार आणल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, इतर संशयित आरोपी फरार झाल्याचा दावा करण्यात येतोय. शंकर घोडके यांनी काही व्हिडिओ फुटेज आणि बोगस मतदारांचे मतदान कार्ड देखील जप्त केल्याचं सांगितलं आहे.

शिवसेना उमेदवाराचा मतदान केंद्रात राडा

अमरावती महानगर पालिका निवडणुकिमध्ये प्रभाग क्र. १७ गडगडेश्वर परिसरातील शारदा विद्यालय येथे इव्हीएम यंत्र बंद पडल्याने शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराने राडा केल्याची घटना घडली. ईव्हीएम यंत्र बंद पडल्याबरोबर तात्काळ का बदलवली नाही असा प्रश्न करत मतदान केंद्रामध्ये शिरून उमेदवाराने राडा केला. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत सर्वाना मतदान केंद्राच्या बाहेर काढले.

हेही वाचा

पुण्यात गावाकडनं आणले मतदार, सोलापुरात कर्नाटकातून गाड्या भरल्या; बोगस मतदारांचा सुळसुळाट

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.