-rat१४p१०.jpg-
P२६O१७७२२
संजीव करपे
----------
संजय करपे यांना सह्याद्री पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १४ : ग्रामीण विकास, पर्यावरण संवर्धन व शाश्वत उपजीविकेच्या क्षेत्रात गेल्या तीन दशकांहून अधिक काळ भरीव आणि दूरगामी कार्य करणारे संजीव करपे यांना शिक्षणमहर्षि गोविंदराव निकम ‘सह्याद्री पुरस्कार'' जाहीर करण्यात आला आहे. प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व रोख रुपये पंचवीस हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सह्याद्री शिक्षणसंस्थेतर्फे स्व. गोविंदराव निकम यांच्या जयंतीनिमित्त हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. करपे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे कार्यरत कोकण बांबू अॅण्ड केन डेव्हलपमेंट सेंटरचे मार्गदर्शक संचालक असून, त्यांनी संस्थेची स्थापना १९९८ ला मोहन होडावडेकर यांच्यासह केली. बांबू लागवड ते उत्पादन व विपणनापर्यंतचे एकात्मिक मॉडेल उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. या उपक्रमातून हजारो ग्रामीण कारागीर, महिला व युवकांना कौशल्याधारित रोजगार व आत्मनिर्भरतेच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यांनी भारतीय बांबू उद्योगाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नवी ओळख देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतासह मालदीव व इतर देशांतील इकोरिसॉर्ट्स, बांबू संरचना, प्रीफॅब्रिकेटेड कीट्स आणि पर्यावरणपूरक बांधकामांमुळे शाश्वत पर्यटन व हरित अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. विशेष म्हणजे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना बांबू उत्पादनाला आंब्यापेक्षा अधिक दर मिळवून देत त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ दिले. त्यांच्या कार्याची दखल घेत सह्याद्री शिक्षणसंस्था यांच्यावतीने ‘सह्याद्री पुरस्कार'' देऊन त्यांना गौरवण्यात येणार आहे.