महापालिका निवडणुकीचं मतदान संपलं आहे, आता त्यानंतर एक्झिट पोल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. जनमतच्या एक्झिट पोलनुसार पुण्यामध्ये पुन्हा एकदा भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे, पुण्यात भाजपला 93 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर शिवसेनेला 6 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेना ठाकरे गटाला एकूण सात जागा मिळण्याची शक्यता आहे. पुण्यात राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांना देखील मोठा धक्का बसला आहे.
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पुन्हा एकदा पुणे महापालिकेत भाजपला मोठं यश मिळण्याचा अंदाज आहे, गेल्यावेळी पुणे महापालिकेत भाजपला 97 जागा मिळाल्या होत्या, भाजपला पुणे महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळालं होतं, यावेळी देखील एक्जिट पोलच्या अंदाजानुसार भाजप पुण्यातील आपली सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी ठरणार आहे. यावेळी पुण्यात भाजपला 93 च्या आसपास जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेना शिंदे गटाला 6 जागा मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाला सात जागा मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला देखील मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, जनमतच्या एक्झिट पोलनुसार पुण्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला 43 तरे राष्ट्रवादी शरद पवार गटाला 8 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या एक्झिट पोलनुसार मनसेला तर पुण्यात खातं देखील उघडता आलेलं नाहीये, तर अपक्ष दोन ते तीन ठिकाणी विजयी होण्याचा अंदाज आहे.
गेल्यावेळी पुणे महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. तब्बल 97 जागा भाजपला मिळाल्या होत्या तर राष्ट्रवादी दोन नंबरला होतं, पुणे महापालिकेत राष्ट्रवादीला गेल्यावेळी 39 जागा मिळाल्या होत्या, मात्र यावेळी राजकीय समीकरण बदलली होती, राष्ट्रवादीमध्ये फूट पडली मात्र पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या, दोन्ही राष्ट्रवादी विरोधात भाजप असा हा थेट सामना आहे. दरम्यान ऐक्झिट पोलच्या अंदाजानुसार पुण्यात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येताना दिसत आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.