जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक मुकेश अंबानी यांच्याबद्दल कोणाला माहिती नाही? पण जेव्हा मुकेश अंबानी यांची चर्चा होते, तेव्हा त्यांचे घर अँटिलियाचीही चर्चा नक्की होते. कारण अँटिलिया केवळ दिसायला सुंदरच नाही, तर अनेक सोयी-सुविधा या घरात आहेत. पण प्रश्न असा आहे की मुकेश अंबानी ज्या एंटीलियात राहतात, तिथे दरमहा किती वीजेचा वापर होतो? आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. ४ जानेवारी २०२५ रोजी जारी झालेल्या फोर्ब्सच्या अहवालानुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ९६.६ अब्ज डॉलर होती. यासोबत ते जगातील १८व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. 2026 वर्षात ते कोणत्या क्रमांकावर आहेत हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.
मुकेश अंबानी यांचे घर अँटीलिया हे जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे. पण हे घर काय-काय सुविधांनी भरलेले आहे हे तुम्हाला माहीत आहे का? आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत. अँटीलिया २७ मजली इमारत आहे, ज्यात जिम, स्पा, थिएटर, टेरेस गार्डन, स्विमिंग पूल, मंदिर आणि हेल्थ केअर सुविधा यासारख्या सर्व गोष्टी आहेत. याशिवाय १५० हून अधिक कार्सच्या पार्किंगची जागा आहे. टेरेस गार्डन, ३ हेलिपॅड आहेत. वरच्या ६ मजल्या खासगी निवासस्थान आहेत, जिथे अंबानी कुटुंब राहते.