निक्की तांबोळीने 'बिग बॉस मराठी 5' गाजवला.
नुकतीच निक्की बॉयफ्रेंड अरबाजसोबत हॉस्पिटलबाहेर स्पॉट झाली.
निक्कीच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.
'बिग बॉस मराठी 5'ची स्पर्धक निक्की तांबोळी सध्या कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिला 'बिग बॉस मराठी 5' मुळे खूप लोकप्रियता मिळाली. तिचा बिग बॉसच्या घरातील खेळ प्रेक्षकांना खूप आवडला. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. ती एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. अशात नुकतीच निक्की तांबोळी स्पॉट झाली आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on InstagramA post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)
व्हायरल व्हिडीओमध्ये निक्कीच्या डोळ्याला गंभीर दुखापत झालेली दिसून येत आहे. तिच्या डोळ्याला सफेद पट्टी बांधलेली दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, निक्की डोळ्यालापट्टी बांधून हॉस्पिटलबाहेर येताना दिसत आहे. यावेळी तिच्या सोबत तिचा बॉयफ्रेंड अरबाज पटेल दिसला. निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांची ओळख बिग बॉसच्या घरात असताना झाली. शोमध्ये त्यांची मैत्री झाली. हळूहळू मैत्रीचे रुपातंर प्रेमात झाले. बिग बॉसच्या घरात असताना शेवटी त्यांच्यामध्ये अनेक भांडणे झाली. मात्र आता दोघे अनेक वेळा एकत्र स्पॉट होतात.
व्हिडीओमध्ये अरबाजनिक्कीची काळजी घेताना दिसत आहे. निक्की तांबोळीला नेमकं झालं काय? याची अद्याप माहिती समोर आली नाही. मात्र असे बोले जात आहे की, तिच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दोघे एकत्र कारमध्ये बसून गेले. व्हिडीओमध्ये निक्की खूपच अस्वस्थ वाटली. तिच्या या व्हिडीओवर चाहते कमेंट्स करत आहे. तसेच ती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.
View this post on InstagramA post shared by Viral Bhayani (@viralbhayani)
निक्की तांबोळी 'बिग बॉस मराठी 5'नंतर अनेक प्रोजेक्टमध्ये दिसली. तिचे इन्स्टाग्रामवर 6.1 फॉलोअर्स आहेत. निक्की कायम आपल्या लूक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अरबाजसोबतचे व्हिडीओ शेअर करते. बिग बॉसनंतर निक्की तांबोळी हिंदी शो 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' आणि मराठी कार्यक्रम 'शिट्टी वाजली रे' मध्ये दिसली. तिचे चाहते तिच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
Tharala Tar Mag : अर्जुन-सायलीसमोर आलं नागराजचं सत्य; मालिका घेणार 'हे' धक्कादायक वळण, सुमन काकूचं काय होणार? पाहा VIDEO