राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालामध्ये आतापर्यंत भाजप आणि शिवसेना शिंदे गट आघाडीवर होते, मात्र आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालामध्ये मोठा ट्विस्ट आला असून. आकडे फिरले आहेत. त्यामुळे भाजप, शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढलं आहे. सध्या स्थितीमध्ये भाजप 84 जागांवर आघाडीवर आहे, तर शिवसेना शिंदे गट 26 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेचे मिळून एकूण 110 उमेदवार आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे 64 उमेदवार आघाडीवर असून, मनसे 8 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे मिळून एकूण 72 उमेदवार आघाडीवर आहेत.
मुंबई महापालिकेमध्ये एकूण 227 जागा आहेत, त्यामुळे बहुमताचा आकडा पार करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 114 जागांची गरज आहे. सध्या स्थितीमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट बहुमताच्या जवळ आहेत, परंतु तरी देखील त्यांना अजूनही बहुमताचा आकडा गाठता आलेला नाहीये. तर दुसरीकडे मुंबईत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली असून, 23 जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत, त्यामुळे सध्या समोर असलेल्या आकडेवारीनुसार आता मुंबईत सत्तास्थापनेसाठी काँग्रेस किंगमेकरची भूमिका बजावू शकते. काँग्रेससोबत विजयी अपक्ष उमेदवार देखील मोठा खेळ करण्याची शक्यता आहे. कारण मुंबईत कमीत कमी दहा जागांवर अपक्ष उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे.
मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेन शिंदे गटानं जोरदार मुसंडी मारली होती. आतापर्यंत मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला स्पष्ट बहुमत मिळेल असं वाटत होतं. मात्र आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालात मोठं ट्विस्ट आल्याचं पहायला मिळत आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट सध्या स्थितीमध्ये बहुमतापासून दूर आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचा आकडा वाढल्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे, तसेच दहा ठिकाणी अपक्ष उमेदवार देखील आघाडीवर आहेत. त्यामुळे आता भाजपसह सर्वच पक्षांची धाकधूक चांगलीच वाढली आहे. मुंबईमध्ये कोणाचा माहापौर होणार याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे.