Pakistan U19 Vs England U19: वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा पराभव, झालं असं की..
GH News January 17, 2026 01:19 AM

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धा प्रत्येक सामन्यानंतर पुढे सरकत आहे. या स्पर्धेतील चौथा सामना पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय फसला असंच म्हणावं लागेल. त्याला कारणंही तसंच आहे. खरं तर पाकिस्तानने चांगली गोलंदाजी केली आणि इंग्लंडला 211 धावांवर रोखलं. इंग्लंडने विजयासाठी 212 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. त्यामुळे पाकिस्तान हा सामना सहज जिंकेल असं वाटलं होतं. पण पाकिस्तानचा डाव 173 धावांवर आटोपला. या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला 37 धावांनी पराभवाची धूळ चारली. या पराभवामुळे पाकिस्तानची या स्पर्धेतील सुरुवात निराशाजनक झाली आहे.

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानच्या आघाडीच्या फलंदाजांनी निराश केलं. इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर त्यांचा निभाव लागला नाही. समीर मिन्हास, मोहम्मद शयान, उस्मान खान, अहमद हुसैन स्वस्तात बाद झाले. समीर मिन्हास चौथ्या षटकात बाद झाला. त्याला फक्त 10 धावा करता आल्या. मोहम्मद शयान 7 धावा, उस्मान खान 6 धावा, अहमद हुसैने 12 धावा करून बाद झाले. पण पाकिस्तानचा डाव काही अंशी कर्णधार फरहान युसूफने सावरला. त्याने 65 धावांची खेळी केली. पण त्याची अर्धशतकी खेळीही पाण्यात गेली. इंग्लंडचे वेगवान गोलंदाज एलेक्स ग्रीन, जेम्स मिंटो आणि राल्फी अल्बर्ट यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.पाकिस्तानला आता पुढचे दोन्ही साखळी फेरीचे सामने जिंकावे लागतील. त्यांचा पुढचा सामना 19 जानेवारी रोजी स्कॉटलंडविरुद्ध, तर शेवटचा साखळी सामना 22 जानेवारी रोजी झिम्बाब्वेविरुद्ध असेल.

पाकिस्तानचा कर्णधार फरहान युसूफ म्हणाला की, ‘पुढील सामन्यांसाठी खूप काही शिकलो. मला माझ्या मधल्या फळीतील फलंदाजांवर विश्वास आहे, पुढील सामन्यांमध्ये चांगले खेळेन.’ इंग्लंडचा कर्णधार थॉमस रूव म्हणाला की, ‘अर्ध्या टप्प्यात आम्ही बरोबरी साधत नसल्यासारखे वाटले. धावा थोड्या कमी होते पण ग्राउंड्समनचे खूप खूप आभार मानावे लागतील. विजय मिळवणे हे अवास्तव होते. आमच्यासाठी मोठी गोष्ट म्हणजे स्टंपच्या वर जात नव्हता. मैदानात त्याचा आधार घेतला. काही चांगले झेल. पहिल्या दोन सराव सामन्यांमधून आम्हाला काही गती मिळाली होती. आम्ही चांगल्या स्थितीत आहोत. आमचा पहिला सामना जिंकणे खूप छान झाला.’

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.