मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेचे भारतीय जनता पक्षाचे (BJP) स्वप्न साकार होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाीठी झालेल्या निवडणुकीत भाजपला वर्चस्व मिळताना दिसत आहे, त्यामध्ये सर्वात श्रीमंत अशा बीएमसीचाही समावेश आहे. पहिल्यांदाच भाजपला बीएमसीमध्ये बहुमत मिळत असून ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता आता डळमळीत होणार असल्याचे चित्र आहे. मुंबईशिवाय नागपूरपासून ते पुण्यापर्यंत भाजपचा महापौर होण्याचीच चिन्हे आहेत. पण दुसरीकडे मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन निवडणूक लढणाऱ्या ठाकरे बंधूंचा करिश्मा फारसा चालला नसल्याचे दिसून आलं.
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीची मतमोजणी अद्याप सुरू असून भाजप आणि शिंदेंच्या महायुतीने 125 पेक्षा अधिका जागांवर आघाडी मिळवली आहे. भाजपला 95 पेक्षा अधिक जागांवर आघाडी मिळाल्याचे चित्र आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackrye) यांच्या शिवसेनेशी झालेल्या चुरशीच्या लढतीनंतर, भाजप आणि शिंदे यांची शिवसेना स्वबळावर बहुमत मिळवण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. तर मराठी भाषा, मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन निवडणूक वढवणारे राज ठाकरे (Raj Thackrey) यांचा सुपडा साफ झाल्याचे दिसत आगे. त्यांना मुंबईत तर फारशी मतं मिळालेली नाहीतच पण पुण्यातही राज ठाकरेंचा करिश्मा दिसलेला नाही.
महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांमधील आतापर्यंतच्या ट्रेंडवरून असे दिसून येते की मुंबईतील बीएमसीमध्ये भाजप युतीला मोठा विजय मिळतोय. राज ठाकरे यांचा पक्ष मनसे ट्रेंडमध्ये दुहेरी अंकही ओलांडू शकलेला नाही. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करून मुंबई निवडणूक लढवूनही राज ठाकरे यांची हीच अवस्था आहे. राज ठाकरेंच्या मनसेचा केवळ बीएमसीमध्येच नाही तर मुंबईबाहेरही पराभव झाला आहे.
महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे यांची कामगिरी
बीएमसीसह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांमध्ये एकूण 2869 जागांसाठी निवडणुका घेण्यात आल्या. सध्याच्या कलांनुसार, भाजप 1064वॉर्डमध्ये आघाडीवर आहे, तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना 282 वॉर्डमध्ये आघाडीवर आहे.
उद्धव ठाकरे यांची शिवसेना (UBT) फक्त 109 वॉर्डमध्ये आघाडीवर आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी 113 जागांवर आघाडीवर आहे, तर शरद पवार यांची राष्ट्रवादी 24 जागांवर आघाडीवर आहे.
दरम्यान, महापालिका निवडणुकीत काँग्रेस 222 जागांवर आघाडीवर आहे, मात्र राज ठाकरे यांचा मनसे पक्ष अवघ्या 12 जागांवर पुढे आहे. मुंबईतील एकूण 277 जागांपैकी राज ठाकरेंचा पक्ष फक्त 5 जागांवर आघाडीवर असल्याची माहिती समोर आली होती. या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी चुलत भाऊ उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येत निवडणूक लढवली, परंतु तरीही त्यांच्या पक्षाला दारूण पराभव पत्करावा लागला.
राज ठाकरेंच्या पक्षाचे सिंगल डिजीटवर समाधान
– कल्याण-डोंबिवलीमध्ये 122 जागा आहेत. भाजप आणि शिंदे यांची शिवसेना बहुमत मिळवताना दिसत आहेत. राज ठाकरे यांचा पक्ष 4 जागांवर आघाडीवर आहे.
– ठाण्यातील 131 जागांपैकी राज ठाकरेंचा पक्ष फक्त एकाच जागेवर आघाडीवर आहे.
– नवी मुंबईतील 111 जागांपैकी इथेही राज ठाकरेंचा पक्ष फक्त एकाच जागेवर आघाडीवर आहे.
– नाशिकमधील 122 जागांपैकी दोन जागांवर राज ठाकरेंचा मनसे आघाडीवर आहे.
– अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रातील 68 जागांवपैकी राज ठाकरेंच्या पक्षाचे, मनसेचे 3 उमेदवार आघाडीवर आहेत.
– उल्हासनगर महानगरपालिकेत राज ठाकरे यांचा पक्ष अवघ्या एका जागेवर आघाडीवर आहे.
राज ठाकरेंचा पक्ष 22 शहरांमध्ये शून्यावर
पुण्यात 165 जागांसाठी निवडणुका झाल्या, ज्यापैकी 122 जागांवर ट्रेंड आले आहेत. राज ठाकरे यांच्या पक्षाला पुण्यात खातेही उघडता आलेलंल नाही. फक्त पुणे महानगरपालिकाच नव्हे तर मीरा-भाईंदर, वसई-विरार, भिवंडी, पनवेल, नागपुर, पिंपरी-चिंचवड़, संभाजीनगर, कोल्हापुर, सांगली-मिरज, सोलापूर, मालेगांव, जळगाव, धुळे, इचलकरंजी, नांदेड़, परभणी, जलाना, लातूर, अमरावती, अकोला आणि चंद्रपुर येथएही राज ठाकरेंच्या पक्षाला एक देखील जागाा मिळाली नाही.
मनसेने सर्व 29 महापालिकातील मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले नव्हते, परंतु काही महत्त्वाच्या जागांवर निवडणूक लढवली. मुंबई महापालिकेत एकूण 227 वॉर्ड आहेत.मनसेने उद्धव ठाकरे यांच्या सेनेशी (यूबीटी) युती करून निवडणूक लढवली. मनसेने 20-30 जागांवर जोरदार निवडणूक लढवली. तरीही, त्यांना फक्त 9 जागांवर आघाडी मिळवता आली.
मुंबई व्यतिरिक्त, राज ठाकरे यांनी पुणे आणि नाशिकमध्येही जोरदार निवडणूक लढवली. या शहरांमध्ये, मनसेने पारंपारिक बालेकिल्ल्यात उमेदवार उभे केले. नाशिकमध्ये, जिथे मनसे एकेकाळी सत्ता होती, तिथे पक्ष फक्त दोन जागांवर आघाडीवर आहे.