मुंबईसह 29 महापालिकांचा निकाल काल लागला आणि राज्यात पुन्हा भाजपाचंच वर्चस्व असल्याचं दिसून आलं. अतिशय प्रतिष्ठेचा बनलेल्या बीएमसी निवडणुकीसह राज्यातील बहुतांश माहपालिकांत भाजपाचे कमळ फुलले आहे. ठाकरें बंधूंनी एकत्र येऊन, युती करू, मराठी अस्मिता, मुंबई वाचवाचा नारा देत बीएमसी निवडणुकीत झोकून दिलं खरं पण भाजप-शिवसेन शिंदे गटाच्या युतीने दणदणीत विजय मिळवत ठाकरेंना मोठा धक्का दिला. त्यामुळे तब्बल 25 वर्षांनंतर मुंबईत आता शिवसेनेचा महापौर नसेल तर भाजप-सेना युतीचा महापौर मुंबई महापालिकेत विराजमान होईल.
मुंबईत भारतीय जतना पक्षाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले असून मतांच्या बाबातीतही भाजपच नंबर वन ठरला आहे. सर्वाधिक मतं घेऊन भाजप पहिल्या स्थानावर आह तर शिवसेना ठाकरे गट दुसऱ्या स्थानी आहे. भाजपचे 89 उमेदवार तर शिवसेना ठाकरे गटाचे 65 उमेदवार निवडून आलेत. मात्र दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांमध्ये प्रचंड फरक असून मतांच्या बाबतीत भाजपा हा शिवेसेनेपेक्षा चार लाखआंहून अधिक मतांनी पुढे असल्याचे दिसून आले.
मुंबई महापालिकेचा निकाल काय ?
मुंबई महापालिकेत एकूण 227 जागांसाठी निवडणूक लढवण्यात आली. भाजपा आणि शिंदेंची शिवसेना यांची युती विरुद्ध राज व उद्धव ठाकरे यांची मनसे-शिवसेना युती असा सामना प्रामुख्याने मुंबईत दिसून आला. मात्र ठाकरे बंधूंना फार यश मिळालं नाही. त्यांना पछाडून भाजप -सेनेच्या युतीचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले आहेत. भाजपाचे एकूण 89 उमेदवार विजयी झाले असून त्यांना एकूण 11 लाख 79 हजार 273 मतं मिळाली. भाजप पहिल्या स्थानी आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 65 उमेदवार विजयी झाले, त्यांना 7 लाख 17 हजार 736 मतं मिळाली. ते दुसऱ्या स्थानी आहे. म्हणजेच भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांमध्ये तब्बल 4 लाख 61 हजार 5387 मतांचा फरक आहे. त्यामुळे भाजप हा फक्त उमेदवारांच्या बाबतीतच नव्हे तर मतांच्या बाबतीतही नंबर 1 पक्ष ठरल्याचे दिसून आले.
तर शिवसेना शिंदे गटाच्या 29 उमेदवारांनी विजयी झेंडा फडकावला असून त्यांना 2 लाख 73 हजार 326 मत मिळाली. त्या पाठोपाठ काँग्रेसच 24 उमेदवार जिंकले असून त्यांना एकूण 2 लाख 42 हजार 646 मतं मिळाली आहेत. त्यामुळे आता पालिकेवर भाजपाचा भगवा फडकणार असून महापौर नेमकं कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
