मुंबई महानगर पालिकेत उद्धव आणि राज ठाकरे भावांची युती काही खास कमाल करु शकली नाही. दोन्ही भावांचे एकत्र येणे उद्धव ठाकरे यांना सत्तेबाहेर घेऊन गेले आहे. उद्धव ठाकरे यांना ६७ तर राज ठाकरे यांना ६ जागा मिळाल्या आहेत.साल २०२६ चे मुंबई महानगर पालिकेची निवडणूक ठाकरे बंधूंच्या चुकीच्या निर्णयाचा परिपाक म्हणून लक्षात राहणार आहे. आशियातील सर्वात श्रीमंत नगरी मुंबईत आता मराठी मते काही खास प्रभाव दाखवणारी ठरली नाहीत.
1 – सिंगल बास्केट ब्लंडरअशी इंग्रजीत एक म्हण आहे की सर्व अंडी एकाच टोपलीत ठेवू नये. त्याकडे दुर्लक्ष करीत राज आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांची संपूर्ण मदार मराठी मतदारांवर केंद्रीत केली. ठाकरे बंधूंच्या या रणनितीमुळे मुंबई रहाणाऱ्या इतर समुदायांनी त्यांच्याशी फारकत घेतली.
2 – महानगरांचे वास्तव्याकडे दुर्लक्षमुंबई हे कॉस्मोपोलीटीन शहर आहे. येथे विविध भाषा आणि जातीचे लोक रहात आहेत. येथील मराठी मतदार जरी ३५ टक्के असून ते महत्वाचे आहेत. परंतू मराठी मतदारांमुळे बहुमताचा आकडा गाठता येत नाही हे स्पष्ट झाले. उर्वरित ६५ टक्के लोक मनसेच्या परप्रांतीय धोरणामुळे नाराज होते.
3 – उर्वरित मुंबईचे गणितमुंबईत २२% उत्तर भारतीय, २०% मुस्लीम आणि १८ % गुजराती,मारवाडी आहेत. यांची संख्या मुंबईच्या विजयात महत्वाची होती. केवळ मराठी मतदानावर विसंबून राहील्याने नुकसानच झाले. राज ठाकरे यांच्याशी उद्धव यांनी समझोता केल्याने इतर सुमदाय नाराज झाले.
4-धर्मनिरपेक्ष कवच हरवलेकाँग्रेस सोबत महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांची प्रतिमा उदार झाली होती. विविध समुदायांना त्यांना पसंती दिली. परंतू राज ठाकरे यांच्याशी हातमिळवणी केल्याने उदारमतवादी प्रतिमेला धक्का बसून हिंदी आणि गैरमराठी लोकांना ही युती पसंत पडली नाही.
5 – लाऊडस्पीकरचा मुद्दाराज ठाकरे यांनी मस्जिदवरील लाऊड स्पिकरच्या मुद्यावरुन रान पेटवले होते. त्यामुळे २० टक्के मुस्लीम मतदार नाराज झाले होते. साल २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत उद्धव ठाकरे यांचे समर्थन करणाऱ्या मुस्लीम मतदारांनी त्यांची राज यांच्याशी हातमिळवणी पसंद केली नाही.
6 – उत्तर आणि दक्षिण भारतीयउत्तर आणि दक्षिण भारतीयांसोबत राज ठाकरे यांच्या वक्तव्यांमुळे या मतदारांनी दोघा बंधूपासून अंतर राखले.उत्तर भारतीय तर आधीच राजवर नाराज आहेत, त्यात भाजपाचे नेते के. अण्णामलई यांच्या वक्तव्याचा राज यांनी समाचार घेतला त्याला शिवीगाळ करणे दक्षिण भारतीयांना नाराज करुन गेले.
7 – मराठी अस्मिता विरुद्ध विकासठाकरे बंधूंनी मराठी अस्मितेचा मुद्दा निवडणूकीच्या प्रचारात वापरण्याचा प्रयत्न केले.तर महायुतीने विकासाच्या मुद्यांवर मते मागितली. मराठी मतदारांची तरुण पिढीला संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास माहिती असण्याचा काही प्रश्नच नव्हता. त्यामुळे लोकांनी मेट्रो- ३ सह इतर विकास कामांसाठी महायुतीला मते दिली.
8 – महाविकास आघाडीत फूट२०२४ च्या विधानसभा निवडणूकात युबीटी, काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी अशा महाविकास आघाडीमुळे मुंबईत शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या. परंतू राज यांच्या उद्धव ठाकरे यांनी हातमिळवणी केल्याने परप्रांतीय मते राखण्यासाठी काँग्रेसने ठाकरे बंधूंऐवजी मुंबईत फारसा जनाधार नसलेल्या वंचितशी युती करणे पसंद केले.
9 – भाजपा विरोधी मतांची विभागणीशिवसेना यूबीटी आणि एमएनएस एकत्र निवडणूक लढल्याने काँग्रेसने स्वंतत्र लढण्याचा प्रयत्न केल्याने तिरंगी आणि चौरंगी निवडणूका झाल्या. त्यामुळे उपनगरात विरोधी मतांची विभागणी झाली. याचा मोठा फायदा शिंदे यांची शिवसेना आणि भाजपाला झाला.
10 – एक आत्मघाती गोलमुंबई सारख्या बहुरंगी आणि बहुढंगी शहरात मतांची बेरीज करण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी रक्ताच्या नात्याला महत्व देत कुटुंबातील वाद मिठवला असला तर या नादात मुंबईत बहुतांशी जनाधार ते हरवून बसले.