Govinda Affair: 'मी त्याला माफ करणार नाही...' गोविंदाच्या अफेअरवर पत्नीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाली ६३ वर्षे...
Saam TV January 17, 2026 07:45 PM

Govinda Affair: बॉलिवूडचा हिरो नंबर वन गोविंदा आणि सुनीता आहुजा त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतात. सुनीता अनेकदा तिचा पती गोविंदासोबतच्या तिच्या नात्याबद्दल उघडपणे बोलली आहे. सुनीता अनेक वेळा गोविंदाच्या अफेअरच्या अफवांवरही बोलली आहे. आता, तिने पुन्हा एकदा तिच्या पतीच्या अफेअरवर मत व्यक्त केलं आणि धक्कादायक खुलासा केला आहे.

सुनीता गोविंदाबद्दल काय म्हणाली?

नवीन पॉडकास्ट मिस मालिनीशी झालेल्या मुलाखतीत सुनीता तिच्या पती गोविंदाच्या अफेअरबद्दल बोलली. सुनीता यांनी असाही दावा केला की गोविंदाने तिचा मुलगा यशला त्याच्या करियरमध्ये मदत केली नाही आणि त्याच्या वडिलांच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत. पॉडकास्टचा फक्त प्रोमो व्हिडिओ रिलीज झाला असला तरी, प्रोमोमध्ये सुनीता यांनी तिच्या पतीबद्दल केलेल्या स्पष्ट खुलाशांमुळे खळबळ उडाली आहे.

Mrunal And Dhanush: मृणाल ठाकूर आणि धनुष व्हॅलेंटाईन डेला अडकणार लग्नबंधनात? वाचा महत्वाची अपडेट

सुनीता म्हणते, "मी गोविंदाला माफ करणार नाही. मी नेपाळची आहे. जर मी माझी खुकरी काढली तर सगळे अडचणीत येतील. म्हणूनच मी म्हणतेय, आताचं सावध हो बेटा." गोविंदाच्या अफेअरकडे इशारा करताना सुनीता पुढे म्हणाली, "अशा मुली खूप येतात. पण तू थोडा मूर्ख आहेस. तू ६३ वर्षांचा आहेस. तू टीनाचं लग्न कर. यशचे करिअर धोक्यात आहे ते ठिक करायला त्याला मदत कर कसा बाप आहेस तू.

Don 3: डॉन परत आला! रणवीर बाहेर पडल्यानंतर, बादशाहाची 'डॉन ३'मध्ये एन्ट्री; या अटीवर करणार चित्रपट
View this post on Instagram

A post shared by MissMalini (@missmalini)