मोठी बातमी! चार आमदार आणि खासदार अजित पवारांच्या भेटीला, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?
Marathi January 17, 2026 11:25 PM

पुणे बारामती बातम्या: महानगरपालिका निवडणुका पार पडल्यानंतर आता जिल्ह्या परिषद आणि पंचायत समितीच्यांचा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यादृष्टीने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या बारामतीतील निवासस्थानी इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत. याचदरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील चार आमदार आणि एक खासदार अजित पवार यांची भेट घेण्यासाठी बारामतीत दाखल झाले आहेत. पण आतापर्यंत दोनच आमदारांची नावे कळली असून, त्यांच्यासोबत खासदार धैर्यशील मोहित पाटील असल्याची माहिती मिळत आहे.

पुणे जिल्ह्यापाठोपाठ सोलापूर जिल्ह्यात देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार?

शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार अभिजित पाटील आणि करमाळ्याचे नारायण आबा पाटील अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत. त्यांच्यासोबत आणखी दोन आमदार आहेत. त्याचबरोबर शरद पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील देखील अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. अजित पवार मुलाखाती घेत असतानाच त्यांच्या सहयोग निवासस्थानी आमदार आणि खासदार दाखल झाले आहेत. त्यामुळं आता पुणे जिल्ह्यापाठोपाठ सोलापूर जिल्ह्यात देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

उत्तम जानकर यांनी देखील घेतली अजित पवार यांची भेट

रासपचे प्रमुख उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामतीत भेट घेतली आहे. आम्हाला तिथे तोडगा निघत नव्हता म्ह्णून आम्ही अजित पवारांना भेटायला आलो होतो. आम्ही वेगवेगळे लढलो असतो तर त्याचा फायदा दुसऱ्यांना झाला असता. आता तोडगा निघाला आहे. आम्ही एकत्र निवडणूक लढवणार आहोत अशी माहिती जानकर यांनी दिली.

अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट

राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीचा निकाल 16 जानेवारी रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) एकत्र आले होते. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवल्यानंतरही पराभवाला सामोरं जावं लागलं. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत आलेल्या अपयशानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अनक बारामतीत शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. महानगरपालिकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर अजित पवारांनी अचानक शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.