बॉलिवूड अभिनेत्रीचं मौलवीने ब्रेनवॉश करुन केलं लग्न! 6 वर्षांनंतर मोठं सत्य अखेर समोर
Tv9 Marathi January 18, 2026 12:45 AM

बॉलिवूड विश्वातील अभिनेत्री त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आता देखील एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्रीचं एका मौलवीने ब्रेनवॉश करून लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता अभिनेत्रीने याबद्दल मोठा खुलासा केला आहे. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री सना खान आहे. सना हिने बॉलिवूडचा निरोप घेतल मुस्लीम धर्मगुरू मुफ्ती अनस सैयद याच्यासोबत लग्न केलं. गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर असे दावे करण्यात येत आहेत की, सना खानने तिच्या पतीच्या दबावामुळे किंवा ब्रेनवॉशिंगमुळे हा निर्णय घेतला. आता, जवळजवळ सहा वर्षांनंतर, सना खानने स्वतः या प्रकरणावर तिचं मौन सोडले आहे.

नुकताच एका संभाषणादरम्यान, सना खानने अभिनेत्री रश्मी देसाईशी तिच्या निर्णयांबद्दल मोकळेपणाने सांगितलं. बॉलिवूडचा निरोप घेत लग्न करणं हा माझा स्वतःचा निर्णय होता… असं सना म्हणाली होती. सना हिने सांगितल्यानुसार, अभिनेत्रीचं लग्न गुपित पद्धतीने झालं.. लग्नाबद्दल तिच्या आई – वडिलांना देखील माहिती नव्हतं. एवढंच नाही तर, मेहेंदी लावण्यासाठी आलेल्यांना देखील अभिनेत्रीच्या नवऱ्याबद्दल माहिती नव्हती. यासाठी अभिनेत्रीने मेहेंदीमध्ये होणाऱ्या नवऱ्याचं नाव देखील लिहिलेले नव्हतं.

View this post on Instagram

A post shared by Saiyad Sana Khan (@sanakhaan21)

ब्रेनवॉश झाल्याच्या आरोपांवर अभिनेत्री म्हणाली, ‘कोणाचं ब्रेनवॉश करणं इतकं सोपं नाही. तिने सांगितले की, तिला आंतरिक शांती हवी होती आणि त्यामुळेच तिला या मार्गावर आणलं. हा निर्णय सना हिने स्वतःघेतला होता. तिचं कोणाही ब्रेनवॉश केलं नाही..

पुढे सना म्हणाली, ‘व्यक्तीकडे पैसा, नाव आणि प्रसिद्ध सर्वकाही असून शकतं… सर्वकाही असताना देखील व्यक्ती समाधानाच्या शोधात असतो.’ शांती ही तिची सर्वात महत्त्वाची प्राथमिकता होती आणि तिने ती निवडली. सनाने असंही सांगितलं की, तिच्या अनेक नातेवाईकांना लग्नाबद्दल नंतर कळले. जेव्हा तिच्या चुलत भावांनी अनस सय्यदला पहिल्यांदा मशिदीत पाहिले तेव्हा त्यांना सत्य कळले.

सना हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, तिने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. जय हो आणि टॉयलेट: एक प्रेम कथा या सिनेमांमध्ये सना हिने दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. एवढंच नाही तर, स्पेशल OPS या वेब सीरिजमध्ये देखील अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसली. आता सना बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.