क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी धावसंख्येचा यशस्वी बचाव केल्याचा आणि सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआऊटचा रेकॉर्ड नोंदवला गेलाय. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ही घटना घडली असून २३२ वर्षे जुना विक्रम मोडला आहे. पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या प्रेसिडेंट्स ट्रॉफीत पाकिस्तान टीवी संघाने सुई नॉर्दन गॅस विरोधात ४० धावांचा बचाव केला. पीटीवीने हा सामना फक्त २ धावांनी जिंकत विश्वविक्रम केला. याआधी १७९४मध्ये लॉर्ड्सवर ओल्डफिल्ड संघाने एमसीसीविरुद्ध ४१ धावांचा यशस्वी बचाव करत ६ धावांनी विजय मिळवला.
पीटीवीचा डावखुरा फिरकीपटू अली उस्मानने ९ धावात ६ विकेट घेत सुई नॉर्दन गॅसच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. त्यामुळेच सुई नॉर्दर्नच्या संघाला फक्त ३७ धावांत गुंडाळण्यात पीटीवीला यश आलं. यंदाच्या प्रेसिडेंट्स ट्रॉफीत कमी धावांचे आणि लवकर संपणारे सामने हे सामान्य चित्र झालं आहे.
IND U19 VS BAN U19: वैभव सूर्यवंशीने टीपला सूर्या दादासारखा कॅच; बांगलादेशच्या हातून खेचली मॅच, भारताचा रोमहर्षक विजयसुई नॉर्दर्न आणि पीटीवी यांच्यात पहिल्या डावात पीटीवीने १६६ धावा केल्या होत्या. त्यानंतर सुई नॉर्दर्नने २३८ धावा करत ७२ धावांची आघाडी घेतली. खेळपट्ट्या लवकर खराब होत असल्यानं पीटीवीचा दुसरा डाव १११ धावातच आटोपला. त्यानंतर विजयासाठी सुई नॉर्दर्नला ४० धावांची गरज होती.
सुई नॉर्दर्न सहज सामना जिंकेल असं वाटत होतं. पण पीटीवीच्या गोलंदाजांनी कमाल करत विजयाचा घास हिरावून घेतला. सैफुल्ला बंगेशने एकट्यानं १४ धावा केल्या. पण दुसऱ्या बाजूने फलंदाज फक्त मैदानावर हजेरी लावायचं काम करत होते. आघाडीच्या पाच फलंदाजांनी मिळून फक्त १३ धावा केल्या. पीटीवीच्या अली उस्मानने ६ तर अमद बटने ४ विकेट घेत सुई नॉर्दर्नचा अख्खा संघ तंबूत धाडला. या विजयामुळे पीटीवी पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी पोहोचलेय. तर सुई नॉर्दर्नची तिसऱ्या स्थानी घसरण झालीय.