
आपण कायम ‘तीन तिघाडा काम बिघाडा’ असं ऐकलं असेल. तीन लोकांनी काम करायला घेतल्यास ते हमखास बिघडतं, असं म्हणतात. ही एक जुनी लोकसमजूत आहे, जी अनेक ठिकाणीआढळते. जिथे तीन ही संख्या अशुभ मानली जाते किंवा जास्त लोकांच्या हस्तक्षेपामुळे काम बिघडते असे मानले जाते. बऱ्याच घरातील मोठी मंडळी शुभ कामासाठी तीन लोकांना एकसाथ न जाण्याचा सल्ला देतात, कारण ठरवलेलं काम होत नाही. तीन ताऱखेला काही खरेदी करु नये असंही काही लोक मानतात. पण, प्रत्यक्षात असं खरंच घडतं का? असं का म्हटलं जातं, त्यामागचं कारण काय? याशिवाय फार पूर्वीपासून तीन आकड्याला अशुभ मानलं जातं. खरंच तीन आकडा अशुभ आहे का? चला जाणून घेऊयात या सर्व प्रश्नांची उत्तरे,
तीन तिघाडा काम बिघाडा खरंच घडतं का?
कोणतेही काम जर तीन लोक मिळून करत असतील तर तिघांमधील विचारांच्या तफावतीमुळे त्यांच्यात वाद होण्याची शक्यता अधिक असते. तीन व्यक्तींमध्ये एक व्यक्ती दोन विरुद्ध मतांचा प्रभाव निर्माण करू शकते, ज्यामुळे गोंधळ वाढतो आणि योग्य निर्णय घेणे कठीण होते. पण जेव्हा दोनच व्यक्ती असतात, तेव्हा त्या लवकर एकमत साधू शकतात. त्यामुळे तीन लोकांनी मिळून कोणतेही काम करू नये असा म्हणतात.
तीन आकडा अशुभ ?
अनेकजण तीन या आकड्याला अशुभ मानतात. पण धार्मिक श्रद्धेनुसार, 3 हा आकडा अशुभ नाही. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं आपण पाहिलं तर तीन ही संख्या अत्यंत शक्तिशाली आहे. असे मानले जाते की 3 ही संख्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींची आहे. त्यामुळे तीन हा आकडा अशुभ मानण्यामागे केवळ गैरसमज आहेत. इतर कोणतेही कारण नाही.
टीप – (सर्व माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ कोणताही दावा करत नाही किंवा कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारत नाही.)
हेही वाचा – Mauni Amavasya : मौनी अमावस्या 17 की 18 जानेवारीला? जाणून तारीख आणि सर्व काही..