बाजार भाव
esakal January 18, 2026 06:45 PM

ज्वारीला प्रतिक्विंटल ४ हजार रुपयांचा दर
सोलापूरच्या बाजार समितीत भाजीपाला स्वस्तच; सोयाबीनच्या दारातही सुधारणा
..........
उ. सोलापूर, ता. १७ : चालू आठवड्यात बाजारात ज्वारीच्या दरात चांगली सुधारणा झाली असून ज्वारीचे दर प्रतिक्विंटल ४ हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. सोयाबीनच्या दरानेही ५ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. कोथिंबीर वगळता भाजीपाला विभागातील मंदी मात्र कायम असून भाजीपाला शेकडा पाचशे रुपयांपेक्षा कमी दराने विक्री होत आहेत. कोथिंबिरीच्या दारात मात्र सुधारणा झाली आहे. वांगी टोमॅटो काकडी या फळभाज्यांचे दर स्थिर आहेत.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गेल्या आठवड्यात भाजीपाला विभागात पालक भाजीची आवक घटली मात्र दरात सुधारणा झाली नाही. मेथी या भाजीची आवक प्रति दिवस दहा हजार रुपये पेक्षा जास्त आहे. मागणी अभावी या भाज्या प्रति शेकडा ४०० रुपये दराने विक्री होत आहेत. फळभाज्यांमध्येही मंदीचे वातावरण कायम असून कोबी, फ्लावर यांची आवक वाढली आहे यामुळे दरात किंचित घसरण झाली आहे. वांगी, टोमॅटो, बटाटे या फळभाज्यांचे दरही कमी असून चालू आठवड्यात स्थिर राहिले आहेत. ढोबळी मिरचीच्या दरात मात्र चांगली सुधारणा झाली आहे. भुसार बाजारात मात्र सुधारणा होत असून ज्वारीच्या दरात फार मोठी उसळी आली आहे. मालदांडी वाणाची ज्वारी प्रतिक्विंटल चार हजार रुपयांपेक्षा जास्त दराने विक्री होत आहे. चालू आठवड्यात सोयाबीनच्या दरातील सुधारणा कायम राहिली असून बाजारात दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा जास्त झाले आहेत. बाजारा ऐवजी थेट खरेदी करणाऱ्या केंद्रावर यापेक्षाही जास्त दराने सोयाबीन खरेदी केले जात आहे. फळबाजारात एप्पल बोर व पेरूची आवक सुरू असून दर स्थिर आहेत. द्राक्षाच्या आवकीमध्ये सध्या वाढ होत आहे.

चौकट
शेकडा पालेभाज्यांचे दर कमाल व सरासरी
कोथिंबीर ४००-७००
मेथी ४००-५००
राजगिरा ४००-५००
शेपू ४००-५००
पालक २००–३००
तांदूळसा ४००-५००
अंबाडी ४००-५००
कांदापात ५००–७००
चुका ३००–३५०


फळभाज्यांचे प्रति दहा किलो कमाल व सरासरी दर
बीट १००-१५०
कारले २००-४००
वांगी १५०-३५०
कोबी ६०-८०
ढोबळी मिरची २००-४००
गाजर १३०-२००
गवार ५००-९००
काकडी १५०-३५०
घेवडा १००-१३०
हिरवी मिरची ४००-५००
भेंडी२००-४००
लिंबू १००-१७०
दोडका २५०-५००
टोमॅटो १२०-१८०
बटाटा ९००-१३५०
मुळ्याची शेंग ३००-४००
वाटाणा. २८०-३३०
बिन्स ३००-३३०
तोंडले २५०-३००
शेवग्याची शेंग ५००-६००


फळांचे प्रति दहा किलो दर
सफरचंद ९००-१३००
बोर २५०-३५०
चिकू २००-२५०

पेरू २५०-३००
टरबूज १५०-२२०
मोसंबी २५०-३००
पपई १२०-१५०
अननस ३००-४००
सीताफळ ६००-६००
डाळिंब ९००-२०००
द्राक्ष २००-३२०
संत्रा ४००-१३००
खरबूज २००-३५०
कलिंगड १५०-२००

......
भुसार बाजार, प्रतिक्विंटल दर
गूळ ३५५०- ४०००
तूर ६४१०-७३५०
ज्वारी. ३७५०-४२००
सोयाबीन ४९००-५२००

.........
चौकट
अंड्याच्या दरात मोठी घसरण
थंडीमुळे अंड्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. याचा परिणाम दरावर झाला होता. दर प्रतिशेकडा ७०० रुपयापर्यंत पोहोचले होते. मात्र चालू आठवड्यात अंड्याच्या दरात घसरण झाली असून अंड्याचे दर घाऊक बाजारात प्रति शेकडा ६०० ते ६१० रुपये पर्यंत कमी झाले आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.