पिंपरी, ता.१७ ः पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्यावतीने प्राधिकरण येथे आयोजित ग्रीकोरोमन महाराष्ट्र केसरी व महिला महाराष्ट्र केसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत महिलांमध्ये निर्मिती मुऱ्हे, प्रगती गायकवाड यांची तर पुरुष गटात
साहिल वाघेरे, अजिंक्य माचुत्रे, तन्मय काळभोर, पवन माने आदींची निवड झाली.
राजा शिवछत्रपती कुस्ती संकुल येथे ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन ‘भारत केसरी’ विजय गावडे, पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस संतोष माचुत्रे, उपाध्यक्ष रतन लांडगे, राष्ट्रीय कुस्तीगीर राजेश काळभोर, किशोर नखाते, विजय जाचक आदींच्या उपस्थित झाले. राज्य कुस्तीगीर संघामार्फत आयोजित राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत पिंपरी चिंचवडचा संघ सहभागी होणार आहे. पंच म्हणून विजय कुटे, रूपेश जाधव, रोहिदास आमले, नीलेश मारणे, बाळासाहेब काळजे यांनी काम पाहिले. पप्पू काळभोर यांनी सूत्रसंचालन केले.
निवड झालेले खेळाडू ः
महाराष्ट्र केसरी (फ्री-स्टाईल) - महिला ५९ किलोगट ः निर्मिती मुऱ्हे, महाराष्ट्र केसरी गट ः
प्रगती गायकवाड. महाराष्ट्र केसरी (ग्रीकोरोमन) वरिष्ठ गट ः साहिल वाघेरे (५५ किलो), यश रांजणे (६० किलो), संकेत माने, महेश सलगर (६३ किलो), अजिंक्य माचुत्रे, अर्णव देशमुख (६७ किलो), ओंकार हिंगणे, सिद्धांत दराडे (७२ किलो), सक्षम गोडांबे, जयेश शेलार (७७ किलो), प्रणव सस्ते, अथर्व तांबे (८२ किलो), अमर कैवाडे, कुणाल कस्पटे (८७ किलो), साहिल नखाते, कृष्णा काटे (९७ किलो), तन्मय काळभोर, पवन माने (९७ ते १३० किलो).