अनुभवी विरूद्ध नवखे सामना
esakal January 18, 2026 11:45 PM

अनुभवी विरुद्ध नवखे सामना
वसई-विरार पालिकेत भाजपचे ४० नवे चेहरे
विरार, ता. १८ (बातमीदार)ः वसई-विरार पालिकेच्या निवडणुकीत भाजपचे ४० नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले आहेत, तर बहुजन विकास आघाडीत मात्र तब्बल २९ माजी नगरसेवक पालिकेत दिसणार आहेत. त्यामुळे अनुभवी विरुद्ध नवख्या उमेदवारांमध्ये सामना रंगणार आहे.
वसई-विरार महापालिकेच्या दोन निवडणुकांमध्ये भाजपचा एकच नगरसेवक निवडून आला होता. पण भाजपने यंदा मुसंडी मारली असून, तब्बल ४३ नगरसेवक निवडून आणले आहेत. यामध्ये किशोर पाटील, प्रदीप पवार, चंद्रकांत गोरीवले अशा माजी नगरसेवकांचादेखील समावेश आहे. तीनही पदाधिकारी बहुजन विकास आघाडीतून भाजपमध्ये आलेले आहेत, तर उर्वरित ४० नवनिर्वाचित असल्याने पहिल्यांदाच पालिका सभागृहात जाणार आहेत. भाजपच्या जिल्हाध्यम प्रज्ञा पाटील, मनोज फटील, जिल्हा उपाध्यक्ष नारायण मांजरेकर, महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस अपर्णा पाटील, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अशोक शेळके, वसई रोड मंडळ अध्यक्ष महेश सरवणकर, जयप्रकाश वझे, नीलेश चौधरी अशी भाजप संघटनेतील पदाधिकारी निवडणुकीत विजयी झाले आहेत.
---------------------------------
बविआची माजी नगरसेवकांना संधी
बहुजन विकास आगडीने निवडणूक रिंगणात उतरविलेल्या २७ नगरसेवकांपैकी बविआच्या २६ माजी नगरसेवकांना मतदारांची पसंती दिली आहे.
यामध्ये अजिव पाटील, प्रफुल साने, सुमन दुर्गेश नरेंद्र पाटील, झीनत नाहिदी, सदानंद पाटील, संगीता मेरे प्रशांत राऊत, पंकज पाटील, सचिन देसाई, नीलेश देशमुख, रंजना थालेकर, मार्शल लोपिस, अतुल साळुंखे, रमेश गोरखाना, कल्पेश मानकर, पुष्पा जाधव, पंकन बोरपे, लरिल डायस, प्रकाश रॉड्रिग्ज, सुनील आचोळकर कन्हैया भोईर, ज्योती धोंडेकर प्रवीण शेट्टी, अलका गमज्या आणि आफिक शेख यांचा समावेश आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.