Latest Marathi Live Update : बेदांगा घटनेप्रकरणी ३० जणांना अटक
esakal January 19, 2026 04:45 AM
Bedanga incident: बेदांगा घटनेप्रकरणी ३० जणांना अटक

बेदांगा घटनेप्रकरणी ३० जणांना अटक करण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसचे माजी आमदार आणि जेयूपीचे अध्यक्ष हुमायून कबीर म्हणाले, "माझ्या पक्षाचा असो किंवा दुसऱ्या पक्षाचा, गैरकृत्यात सामील असलेल्या कोणालाही सोडले जाऊ नये... जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले... मी स्वतः तिथे गेलो होतो... कायदा सर्वांसाठी समान आहे... मी पोलिसांना पाठिंबा देतो..."

Mumbai News: पोलीस असल्याचे बतावणी करून तेरा लाखांचा गंडा

पोलीस असल्याचे बतावणी करून तेरा लाखांचा गंडा घातला आहे.

Mumbai Live : थोड्याच वेळात शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची ताज हॉटेलमध्ये बैठक..

थोड्याच वेळात शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची ताज हॉटेलमध्ये बैठक..

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात होणार बैठक.

ताज होटलमध्ये नगरसेवकांच्या बैठकीची तयारी सुरू.

बैठकीसाठी बनवण्यात आलेल्या पोस्टरवर आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदेचा फोटो.

Jalgaon Live : जळगावच्या ७५ नव्या कारभाऱ्यांची 'अग्निपरीक्षा'! अमृत २.० आणि गाळेभाड्याचा तिढा सोडवावा लागणार

महापालिका निवडणुकीची स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन नवनिर्वाचित सदस्यांनी सुटकेचा श्वास सोडला असला तरी त्यांना केवळ नगरसेवकपद मिरवता येणार नाही, तर आपापल्या प्रभागातील नागरी सुविधांबद्दलची कटिबद्धता आणि जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन ठेवून काम करावे लागणार आहे. यात शहरातील उर्वरित प्रमुख रस्त्यांची कामे, वाढीव वस्त्यांमधील नागरी सुविधांसोबतच अमृत योजना टप्पा-२ आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प शंभर टक्के कार्यान्वित करणे ही कामे प्राधान्यक्रमाने अजेंड्यावर घ्यावी लागणार आहेत.

Live: जेजुरीत कामगारांचे भीक मागो आंदोलन

जेजुरीच्या खंडोबागड पायरी मार्गांवर किर्लोस्कर कामगारांचे ‘भीक मागो’ आंदोलन सुरु झाले आहे. कंपनी–कामगारांचा संघर्ष तीव्र होताना दिसत आहे

Live: बार्शीचे आमदार दिलीप सोपाल अजित पवारांच्या भेटीला

बार्शीचे आमदार दिलीप सोपाल अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत. बार्शी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सोपल गटाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता.

Live: पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का

भीमा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कल्याणराव पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश....

ऐन जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पंढरपूरच्या पूर्वभागात खिंडार...

कल्याणराव पाटील व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक व यशवंत माने यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश...

Live: अजित पवार यांच्या उपस्थितीत इच्छुक सदस्यांची जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी बैठक

पुण्यातील बारामती हॉस्टेल मध्ये बैठक सुरु झाली आहे. अजित पवार यांच्यासह रोहित पवार सुद्धा बैठक आणि मुलाखतीला उपस्थित आहेत.

Liveupdate: मुख्यमंत्र्याना सांगून माझा भाजप प्रवेश थांबवला- शिवाजी सावंत

सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांचा भाजप प्रवेश अनेक दिवसांपासून रखडला आहे. या प्रवेशाच्या रखडण्यामागे खरे कारण शिवाजीराव सावंत यांनी स्पष्ट केले आहे. माझा भाऊ माजी मंत्री तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना सांगून माझा भाजप प्रवेश थांबवला आहे, असा थेट आरोप त्यांनी केला आहे. शिवाजी सावंत यांच्या या आरोपामुळे सावंत कुटुंबातील राजकीय मतभेद आता उघड झाले आहेत. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंत यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात बोलताना भाजप प्रवेश का लांबला यावर भाष्य करताना शिवाजी सावंत यांनी माजी मंत्री तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधला. येत्या दोन दिवसांत कोणत्या पक्षातून निवडणूक लढवायची याचा निर्णय घेणार असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.

Live Update: जिल्हा परिषद निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अॅक्टिव्हि मोडमध्ये

पुण्यातील बारामती वसतिगृहात अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक झाली, तर भाजपच्या शहर कार्यालयात भाजपची बैठक झाली. जिल्हा परिषदेच्या इच्छुक सदस्यांच्या मुलाखती अजित पवार आणि दत्ता भरणे घेत आहेत, तर भाजपकडून महामंत्री राजेश पांडे आणि आमदार राहुल कुल मुलाखती घेत आहेत.

Satara Live : शिवतीर्थावरील शिवपुतळा उंचावणार; १९ फेब्रुवारीला शिवजयंतीदिनी भूमिपूजन

राजधानी साताऱ्यातील शिवतीर्थावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ४० फूट उंच लढवय्या पुतळ्याची उंची वाढवण्याच्या कामाला लवकरच प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. या संदर्भात शिल्पकार अनिल सुतार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शिवतीर्थ परिसराची पाहणी करत कामाबाबत सविस्तर चर्चा केली.

सातारा नगरपालिकेकडून प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर भूमिपूजन करण्यात येणार आहे. या उंचीवाढीच्या प्रकल्पासाठी सुमारे अडीच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सातारा आणि संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या, लष्करी वेशातील एकमेव शिवपुतळ्याच्या उंचीवाढीला आता प्रत्यक्ष चालना मिळाल्याची माहिती मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे.

Chh. Sambhajinagar : जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपची आढावा बैठक

छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजपची आढावा बैठक पार पडली. महापालिकेत 57 जागा जिंकल्यानंतर पक्षाने ग्रामीण निवडणुकांकडे लक्ष केंद्रित केले आहे. मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड आणि आमदार संजय केनेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला जिल्हा ते ग्रामस्तरावरील पदाधिकारी हजर होते. 5 फेब्रुवारी रोजी 63 जिल्हा परिषद व 126 पंचायत समिती सदस्य पदांसाठी मतदान होणार आहे.

Pune Live : पुणे येरवड्यात भरधाव टेम्पोचा कहर; अनेक वाहनांना धडक, एकाचा जागीच मृत्यू

पुण्यातील येरवडा परिसरात शहदल बाबा रोडवर भरधाव टेम्पोने भीषण अपघात घडवला. नियंत्रण सुटलेल्या टेम्पोने थेट फुटपाथवर घुसून रिक्षा, दुचाकी आणि नागरिकांना जोरदार धडक दिली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, टेम्पो क्रमांक एम.एच.12 क्यु.जी. 4894 चा चालक आदम चॉद शेख (वय 62) याने अमली पदार्थांचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले आहे. या अपघातात फुटपाथवर बसलेले सुशिल निवृत्ती मोहीते (वय 40) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेत अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आरोपी चालकाला अटक करण्यात आली आहे. लक्ष्मीनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Chh. Sambhajinagar: दोन्ही शिवसेना त्यांच्या अहंकारामुळे संपल्या - माजी उपमहापौर राजू शिंदे

छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chh. Sambhajinagar) शिवसेनेच्या दुर्दशेला शिरसाट आणि खैरे जबाबदार आहेत. दोन्ही शिवसेना त्यांच्या अहंकारामुळे संपल्या असल्याची टीका, माजी उपमहापौर राजू शिंदे (Raju Shinde) यांनी केली.

Harshada Shirsat: संभाजीनगरमध्ये पालकमंत्र्यांच्या मुलीनेही मिरवणुकीत फिरवली तलवार

शिंदे शिवसेनेचे अभिजित जीवनलाल यांनी मिरवणुकीत तलवार फिरवली होती. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाटांनी संभाजीनगरमध्ये विजयी मिरवणुकीत तलवार फिरवली आहे. यामुळे हर्षदा शिरसाट यांच्यावर काही कारवाई होणार का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Indigo Flight: लखनौमध्ये इंडिगो विमानाची इमर्जन्सी लँडिंग

लखनौमध्ये इंडिगो विमानाची इमर्जन्सी लँडिंग

दिल्लीहून उड्डाण घेतलेल्या विमानाला बॉम्बची धमकी आल्याची माहिती

Khopoli Live: खोपोली येथील मंगेश काळोखे हत्याकांड प्रकरणी फरार आरोपी भरत भगतला अटक

खोपोली येथील मंगेश काळोखे हत्याकांड प्रकरणी भरत भगत या फरार आरोपीला अटक

नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची 16 डिसेंबर रोजी राजकिय वैमनस्यातुन निघृण हत्या करण्यात आली होती

मुख्य मारेकरऱ्यांना खोपोली पोलिसांनी या अधिक अटक केली आहे

हत्येचा कट रचल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत फरार होते

खोपोली पोलिसांनी भरत भगत याला खालापुर परिसरातून अटक केली

आता राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे हे फरार असून मंगेश काळोखे हत्याकांड प्रकरणी खोपोली पोलिस घारे यांचा शोध घेत आहेत

Pune Live: पुण्यात राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

पुण्यात दोन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मारहाण

पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील हिंगणे भागात घटना

विजयी रॅली मध्ये कार्यकर्त्यांनी "खुन्नस" दिल्यामुळे घडला मारहाणीचा प्रकार

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

लाकडी दांडके, बांबू ने कार्यकर्त्यांकडून कार्यकर्त्यांना मारहाण

मारहाणीत पाच ते सहा कार्यकर्ते जखमी

पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून ५ ते ६ जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Mumbai Live : पनवेल-वाशी दरम्यान मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल

पनवेल वाशी दरम्यान हार्बर लाईनवर मेगा ब्लॉक घेण्यात आल्याने अनेक लोकल ट्रेन्स रद्द झाल्या. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

Dharashiv Live : परांड्यात दारु उधार न दिल्याने बियरशॉपी चालकाला बेदम मारहाण

धाराशिवमधील परांड्यात चौघांनी बिअर शॉपी चालकाला बेदम मारहाण केली. दारु उधार न दिल्याने चौघांना राग आला यातून मारहाण केल्याचा आरोपी बिअर शॉपीचालकाने केला आहे. याबबात पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.

Abdul Sattar Live : अब्दुल सत्तार यांना न्यायालयाची नोटीस

आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी अब्दुल सत्तार यांना न्यायलयाने नोटीस जारी केली आहे, तर तीन अधिकाऱ्यांना समन्स बजावले.

Nagpur News : टी२० मालिकेसाठी भारतीय संघ नागपुरात दाखल

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या पाच सामन्याच्या टी 20 मालिकेतील पहिला सामना नागपूरात खेळला जाणार. 21 जानेवारी रोजी नागपूरच्या जामठा येथील व्हिसीए स्टेडियम वर हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी वरुण चक्रवती, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, शिवम दुबे रवी बिश्नोई, रिंकू सिंग, ईशान किशन, आणि संजू सॅमसन रात्री नागपुरात पोहचले...

Bhandara News : तुमसरमध्ये BSNL सदनिकांना भीषण आग

भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरातील शिवाजीनगर परिसरात गेल्या दीड ते दोन दशकांपासून ओसाड पडलेल्या बीएसएनएल कर्मचाऱ्यांच्या सदनिकांना रात्री भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.या सदनिकांनी अचानक पेट घेतला.

Pune Live: भाजपच्या विजयी उमेदवारांचा पुण्यात आज सत्कार

पुण्यात भाजपच्या विजयी उमेदवारांचा आज सत्कार होत आहे. निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शहरात उत्साहाचं वातावरण आहे. या सत्कार सोहळ्यातून विजयासाठी योगदान दिलेल्या उमेदवारांचा गौरव केला जात असून आगामी काळातील राजकीय वाटचालीबाबत सकारात्मक संदेश दिला जात आहे.

Sillod Live: मतदारांना धमकी दिल्याचा आरोप प्रकरणात सिल्लोड न्यायालयाची अब्दुल सत्तारांना नोटीस

सिल्लोड विधानसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान मतदारांना धमकी दिल्याच्या आरोपावरून आमदार अब्दुल सत्तार आणि जिल्हाधिकारी यांच्यासह तीन अधिकाऱ्यांना सिल्लोड न्यायालयाकडून नोटीस बजावण्यात येत आहे. निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या जाहीर सभेत मतदान न करणाऱ्या मतदारांची नावे गुप्तपणे कळवण्याचे आवाहन करत त्यांच्यावर कठोर कारवाईसारखी भाषा वापरण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात येत आहे. या प्रकरणाची दखल घेत न्यायालयाने संबंधितांना आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले असून, प्रकरणावर पुढील सुनावणी होणार आहे.

Navi Mumbai Live: मुख्यमंत्री फडणवीसांकडून गणेश नाईक यांचे कौतुक

नवी मुंबई महापालिका निवडणुकीत एकहाती विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री गणेश नाईक यांचे जाहीरपणे कौतुक केले आहे. संघटनात्मक ताकद, स्थानिक नेतृत्व आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे हा निकाल लागल्याचे फडणवीस सांगत आहेत. नवी मुंबईत पक्षाची पकड अधिक भक्कम झाल्याचा संदेश या निकालातून जात असल्याचेही ते नमूद करत आहेत. विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून पुढील राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Kolhapur Live : शिवाजी पेठेत महापालिका निकालानंतर तणाव, राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कोल्हापुरात महापालिका निवडणूक निकालानंतर काल शिवाजी पेठ परिसरात तुफान राडा सुरू आहे. बोंद्रे आणि खराडे गटामध्ये जोरदार दगडफेक होत असून एकमेकांवर मारहाण केली जात आहे. या घटनेत माजी महापौर सई खराडे यांच्यासह काही जण जखमी होत आहेत. दगडफेकीत दोन घरांचे तसेच काही वाहनांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी अजित दळवी, उत्तम तिबिले, पृथ्वीराज सरनाईक, सत्यजित दळवी आणि आदित्य दळवी यांच्यासह अनेक अनोळखी व्यक्तींवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जात आहे. कालच्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून परिसरात तणावाचे वातावरण कायम आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.