कल्याण शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून इंदिरानगर आणि टिटवाळा परिसरात दोन ते तीन जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक लहान मुलांचा चावा या कुत्र्यांनी घेतल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी केडीएमसी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणी आरोपी भरत भगत याला दोन दिवसांची पोलिस कोठडीखोपोलीतील शिवसेना कार्यकर्ते मंगेश काळोखे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते भरत भगत याला कर्जत न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आज भरत भगत याला खोपोली पोलीसांनी अटक केली. शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची 16 डिसेंबर रोजी सकाळी राजकीय वैमनस्यातून हत्या झाली होती. यातील मारेकऱ्यांना यापूर्वीच अटक झाली आहे. या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा भरत भगत यांच्यावर आरोप असून गुन्हा घडल्यापासून तो फरार होता.
कोल्हापूरमध्ये स्मशानभूमीत भानामती; दोघांना ग्रामस्थांनी पकडलेकोल्हापूर जिल्ह्यातील दर्याचे वडगाव येथील स्मशानभूमीत भानामती करण्यासाठी आलेल्या दोघांना ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले. पकडण्यात आलेल्यांमध्ये एका तृतीयपंथी आहे. तर त्यांचे अन्य तीन साथीदार पळून गेले. स्मशानभूमीत गुलाल, टाचणी टोचलेली लिंबू, काही फोटो व अन्य साहित्य ठेवून पूजा सुरू होती. पाणीपुरवठा संस्थेच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशीच हा प्रकार घडल्याने गावात खळबळ उडाली आहे. आज विठ्ठल सहकारी पाणीपुरवठा संस्थेसाठी मतदान होणार आहे.
शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची ताज हॉटेलमध्ये बैठकथोड्याच वेळात शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची महत्त्वाची बैठक मुंबईतील ताज हॉटेलमध्ये होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडणार आहे. बैठकीसाठी ताज हॉटेलमध्ये जोरदार तयारी सुरू असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. बैठकीसाठी तयार करण्यात आलेल्या पोस्टरवर शिवसेनेचे मार्गदर्शक आनंद दिघे, पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो झळकत आहेत.
बारामतीत कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी...; आज प्रदर्शनाचा दुसरा दिवसबारामतीत एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शन सुरू आहे काल या प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती आज रविवारची सुट्टी असल्याने कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती
कल्याणमध्ये हळदी समारंभात विषबाधा; लग्न सोहळा रद्दकल्याणमधील हायप्रोफाईल मोहन प्राईड इमारतीत हळदी समारंभादरम्यान जेवण केल्यानंतर सुमारे ४० ते ५० जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली. पाहुण्यांना अचानक उलट्या, मळमळ सुरू झाल्याने लग्न सोहळा रद्द करण्याची वेळ आली. या घटनेत नव्या नवरी सह तिची आई व बहीण यांनाही विषबाधा झाली असून नवरीला मानसिक धक्का बसला आहे. संबंधित कॅटर्सविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी वधूचे वडील पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत.
जेजुरीत कामगारांचे आंदोलनजेजुरीच्या खंडोबागड पायरी मार्गांवर किर्लोस्कर कामगारांचे ‘भीक मागो’ आंदोलन सुरु झाले आहे. कंपनी–कामगारांचा संघर्ष तीव्र होताना दिसत आहे.
बार्शीचे आमदार दिलीप सोपाल अजित पवारांच्या भेटीलाबार्शीचे आमदार दिलीप सोपाल अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत. बार्शी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सोपल गटाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता.
आरोपींना घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनचा अपघात; एका तरुणाचा मृत्यूAC बीडच्या ज्ञानराधा बॅंकेचे संचालक सुरेश कुटे आणि अर्चना कुटेंना ठेवीदरांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी काल केज न्यायालयात हजर करण्यात आले होते.
अजित पवार यांच्या उपस्थितीत इच्छुक सदस्यांची जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी बैठकपुण्यातील बारामती हॉस्टेल मध्ये बैठक सुरु झाली आहे. अजित पवार यांच्यासह रोहित पवार सुद्धा बैठक आणि मुलाखतीला उपस्थित आहेत.
पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्काभीमा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कल्याणराव पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश....
ऐन जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पंढरपूरच्या पूर्वभागात खिंडार...
कल्याणराव पाटील व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक व यशवंत माने यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश...
मुख्यमंत्र्याना सांगून माझा भाजप प्रवेश थांबवला- शिवाजी सावंतसोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांचा ठरलेला भाजप प्रवेश अनेक दिवसापासून रखडला आहे. दरम्यान प्रवेश रखडण्यामागचं खरं कारण शिवाजीराव सावंतानी सांगितले आहे. माझा भाऊ माजी मंत्री तानाजी सावंतानी यांनी मुख्यमंत्र्याना सांगून माझा भाजप पक्ष प्रवेश थांबवला आहे थेट आरोप केला आहे.
भाऊ शिवाजी शिवाजी सावंत यांच्या आरोपामुळे सावंत कुटूंबातील राजकीय मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंत यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यामध्ये बोलताना भाजप पक्ष प्रवेश का लांबला यावर भाष्य करताना शिवाजी सावंत यांनी माजी मंत्री तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधला. येत्या दोन दिवसात कोणत्या पक्षातून निवडणुक लढवायची याचा निर्णय घेणार असल्याचे सावंतानी म्हटले आहे.
जिल्हा परिषद निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अॅक्टिव्ह मोडमध्येपुण्यातील बारामती हॉस्टेल मध्ये अजित पवारांच्या उपस्थित राष्ट्रवादीची बैठक, भाजप शहर कार्यालयात भाजप ची बैठक
जिल्हा परिषदेच्या इच्छुक सदस्यांच्या अजित पवार, दत्ता भरणे घेत आहेत मुलाखती, तर भाजपकडून महामंत्री राजेश पांडे, आमदार राहुल कुल घेत आहेत मुलाखती
सातारा शहरातील शिवतीर्थावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चाळीस फूट उंच लढवय्या पुतळ्याची उंची वाढवण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. या कामासंदर्भात शिल्पज्ञ अनिल सुतार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शिवतीर्थ परिसराची पाहणी करून चर्चा केली.सातारा नगरपालिका प्रशासकीय व तांत्रिक मंजुरीनंतर १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या मुहूर्तावर भूमिपूजन होणार आहे. या आराखड्यासाठी सुमारे अडीच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. साताऱ्याची आणि संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या या एकमेव लष्करी वेशातील शिवपुतळ्याच्या उंचीवाढीला आता प्रत्यक्ष चालना मिळाल्याची माहिती मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
Pune: पुण्यातील येरवडा परिसरात भरधाव टेम्पो ने उडवल्या अनेक गाड्या, एकाचा मृत्यूपुण्यातील येरवडा परिसरात भरधाव टेम्पो ने उडवल्या अनेक गाड्या
सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद, एकाचा मृत्यू
येरवड्यातील शहदल बाबा रोडवर भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे.
लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यानुसार, टेम्पो क्रमांक एम.एच.12 क्यु.जी. 4894 चा चालक आदम चॉद शेख (वय 62) याने अमली पदार्थांच्या सेवन केलं होत.
भरधाव वेगात वाहन चालवत असताना टेम्पो कंट्रोलच्या बाहेर गेला थेट फुटपाथवर टेम्पो घुसवून रिक्षा, दुचाकी आणि नागरिकांना धडक दिली.
या धडकेत फुटपाथवर बसलेले सुशिल निवृत्ती मोहीते (वय 40) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून लक्ष्मीनगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
मी माझ्या प्रभागापुरता मर्यादित न राहता शहरातील तरुणांचे प्रतिनिधित्व पालिकेत करणार: यश दत्ताकाका सानेक्रीडांगण, वाहतूक कोंडी, वायू प्रदूषण आणि बेरोजगारी असे एक ना अनेक प्रश्न शहरातील तरुणांना भेडसावत आहेत. त्यामुळे शहरातील तरुणांचे हे सगळे प्रश्न मी महापालिकेच्या पहिल्याच सर्व साधारण सभेत मांडून सोडविणार.....m असा दावा पिंपरी चिंचवड महापालिकेत पहिल्यांदाच निवडून गेलेले तसेच अतिशय तरुण असलेले नगरसेवकापैकी एक असलेले यश दत्ता काका साने यांनी केला आहे. यश साने यांचं हे फक्त 25 वर्षाचे असून ते पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रभाग क्रमांक एक मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून गेले आहेत.
Beed: बीडमधील जीएसटी अधिकाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्याला घेतले ताब्यातवरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून जीएसटी अधिकाऱ्याची आत्महत्या वरिष्ठ अधिकाऱ्याला घेतले बीड पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात.
सुसाईड नोट मधून घटनेचे कारण आले समोर
पोलिसांनी वरिष्ठ अधिकारी दिलीप फाटे यांना चौकशीसाठी घेतले ताब्यात
या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल नाही
सचिन जाधवर असे आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव
Buldhana: बुलढाण्यातील खामगांवात भाजपाला मोठ खिंडार अमोल अंधारे सह हजारो कार्यकर्त्यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश...बुलढाणा जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अमोल अंधारे यांच्यासह खामगाव तालुक्यातील हजारो कार्यकऱ्यांनी शिंदेसेनेत केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थित जाहीर प्रवेश केलाय. . या प्रवेशामुळे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या होम टाऊन खामगांवात भाजपाला मोठा झटका बसला आहे.. ..
Kolhapur: समरजीत घाटगे यांनी फेसबुक पेजवरून हटवली तुतारी, लवकरच शरदचंद्र पवार गटाला राम राम करणारसमरजीत घाटगे यांनी फेसबुक पेजवरून हटवली तुतारी
समरजीत घाटगे लवकरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला राम राम करणार
जिल्हा परिषद निवडणुका नंतर समरजीत घाटगे यांचा होणार आहे भाजप प्रवेश
मात्र तत्पूर्वीच फेसबुक पेज वरून हटवली तुतारी
समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून लढवली होती विधानसभा निवडणूक
Pune: पुण्यात दोन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मारहाणपुण्यात दोन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मारहाण
पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील हिंगणे भागात घटना
विजयी रॅली मध्ये कार्यकर्त्यांनी "खुन्नस" दिल्यामुळे घडला मारहाणीचा प्रकार
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण
लाकडी दांडके, बांबू ने कार्यकर्त्यांकडून कार्यकर्त्यांना मारहाण
मारहाणीत पाच ते सहा कार्यकर्ते जखमी
पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून ५ ते ६ जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
Khopoli: खोपोली येथील मंगेश काळोखे हत्याकांड प्रकरणी फरार आरोपी भरत भगतला अटकखोपोली येथील मंगेश काळोखे हत्याकांड प्रकरणी भरत भगत या फरार आरोपीला अटक
नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची 16 डिसेंबर रोजी राजकिय वैमनस्यातुन निघृण हत्या करण्यात आली होती
मुख्य मारेकरऱ्यांना खोपोली पोलिसांनी या अधिक अटक केली आहे
हत्येचा कट रचल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत फरार होते
खोपोली पोलिसांनी भरत भगत याला खालापुर परिसरातून अटक केली
आता राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे हे फरार असून मंगेश काळोखे हत्याकांड प्रकरणी खोपोली पोलिस घारे यांचा शोध घेत आहेत
Nandurbar: नंदुरबारमधील यखोंडामळी परिसरात केबल चोरांचा सुळसुळाट, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान..गेल्या आठ-दहा दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी आणि परिसरातील ग्रामीण भागात कृषी पंपांच्या केबल चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अज्ञात चोरट्यांच्या टोळीने आतापर्यंत सुमारे 50 ते 60 शेतकऱ्यांच्या शेतातील केबल कापून नेल्या असून, यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या चोऱ्यांमुळे सिंचन व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून उभ्या पिकांना पाणी कसे द्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. वेळेवर पाणी न मिळाल्यास पिके जळून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवून या टोळीचा तात्काळ बंदोबस्त करावा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा त्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे व संतापाचे वातावरण आहे.
Satara: साताऱ्यात जिल्हा परिषद पंचायत समिती साठी भाजप कडून इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवातभारतीय जनता पार्टीने सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे.साताऱ्यातील एका हॉटेल मध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडत आहेत.दोन दिवस या मुलाखती पार पडणार आहेत.विशेष म्हणजे मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलाखती पार पडत आहेत.यामध्ये सातारा जावली,पाटण,कराड ,कोरेगाव, महाबळेश्वर,खंडाळा, वाई, फलटण, माण,खटाव तालुक्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडणार आहेत.
खंबाटकी नवीन बोगदा प्रकल्पातून एकेरी वाहतुकीची आठ दिवसासाठी चाचणीसातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटाच्या नवीन बोगद्याचे काम पूर्ण झाले असून याची पुढील आठ दिवस चाचणीला सुरुवात झाली असून जिल्हाधिकारी संतोष पाटील जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोषी आणि महामार्गाचे रिजनल अधिकारी यांच्या उपस्थितीत पुण्याहून साताऱ्याकडे येणाऱ्या वाहतुकीची ही चाचणी सुरू करण्यात आली आहे. खंबाटकी घाटातून वाहन चालकांना वाहतूक कोंडी पासून सुटका मिळणार आहे... हा बोगदा प्रकल्प दुहेरी मार्गाचा असल्यामुळे यामधील दोन स्वतंत्र बोगद्यातून पुण्याला आणि साताऱ्याला एकत्र प्रवास करता येणार आहे.
अहमदपूर-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर पोलीस व्हॅनचा अपघातबीडच्या ज्ञानराधा बॅंकेचे संचालक सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांना केज न्यायालयातून बीड कडे घेऊन जात असलेल्या पोलीस व्हॅन आणि दुचाकीची अहमदपूर-अहिल्यानगर या रस्त्यावरील येळंब घाट परिसरात धडक झाली. पोलीस व्हॅन आऊट साईडने चालत असल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये केज तालुक्यातील वाघे बाभुळगाव येथील दोन तरूण गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हि घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Sangli News: भाजपच्या नगरसेवकांचा आमदार गोपीचंद पडळकरांच्या हस्ते सत्कार.सांगली निवडणुकीत भाजपाकडून निवडून आलेल्या नूतन नगरसेवकांचा भाजप आमदार गोपीचंद पडळकरंकडून सत्कार करण्यात आला आहे.मिरजेच्या प्रभाग क्रमांक सात मधून भाजपाचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत.यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे अल्पसंख्यांक आघाडीचे सचिव फारूख जमादार यांच्या मातोश्री बानू जमादार यांच्यासह पॅनलचा विजय झाला आहे.या विजय उमेदवारांचा आमदार पडळकरांच्या हस्ते मिरजेत सत्कार पार पडला आहे.
Amravati: अमरावती महापालिकेमध्ये महिलाराज, 87 जागेपैकी 45 जागेवर महिला नगरसेवक आल्या निवडूनअमरावती महानगरपालिकेच्या 22 प्रभागातील 87 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत तब्बल 45 महिला नगरसेविका निवडून आल्याआहेत.तर 42 पुरुष नगरसेवक निवडून आल्याने पुरुषां पेक्षा महिलांचे संख्याबळ जास्त झाले आहे. त्यामुळे अमरावती महानगरपालिकेत आता महिलाराज आले आहे. 87 जागांपैकी 44 जागा महिलांसाठी आरक्षित होत्या त्यात अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आठ,अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 1 तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 12 जागा आरक्षित होत्या.परंतु एकूण 45 जागांवर महिला निवडून आल्याने पुरुषांना 42 जागेवर समाधान मानावे लागले....
Amravati: अमरावतीमध्ये मध्ये एकाच वेळी पाच हजार भाविकांनी केले गजानन महाराजांचे पारायण वाचननवीन वर्षानिमित्त पी आर पोटे पाटील एज्युकेशन ग्रुप च्या वतीने श्री संत गजानन महाराजांच्या पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता, यावेळी स्वामी विवेकानंद सभागृहात एकाच वेळी 5 हंजार गजानन भक्तांनी महापारायनाचे वाचन केले, यावेळी शहरातील तरुण-तरुणी वृद्ध यांनी या महा पारायण वाचनामध्ये सहभाग घेतला होता यावेळी माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी पूजन करून या ठिकाणी भेट दिली
टी 20 मालिका खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट टीम रात्री नागपूरात दाखलभारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या पाच सामन्याच्या टी 20 मालिकेतील पहिला सामना नागपूरात खेळला जाणार..
21 जानेवारी रोजी नागपूरच्या जामठा येथील व्हिसीए स्टेडियम वर हा सामना खेळवला जाणार..
या सामन्या करिता वरुण चक्रवती, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, शिवम दुबे रवी बिश्नोई, रिंकू सिंग, ईशान किशन, आणि संजू सॅमसन रात्री नागपुरात पोहचले...
तुमसरमध्ये ओसाड बीएसएनएल सदनिकांना भीषण आगभंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरातील शिवाजीनगर परिसरात गेल्या दीड ते दोन दशकांपासून ओसाड पडलेल्या बीएसएनएल कर्मचाऱ्यांच्या सदनिकांना रात्री भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.या सदनिकांनी अचानक पेट घेतला. मागील १५-२० वर्षांपासून वापराविना असलेल्या या इमारतींच्या परिसरात कचऱ्याचे ढीग आणि मोठी झुडपे वाढली होती. यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाळा दूरवरून दिसत असल्याने आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.
Wardha: वर्ध्यात रन फॉर इनव्हारमेंट 2026 चे आयोजनवर्ध्यात रन फॉर इनव्हारमेंट 2026 चे आयोजन
4500 स्पर्धकांनी नोंदवला सहभाग
पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर अशा दोन वेगवेगळ्या टप्प्यात स्पर्धा
वर्धेचे पालकमंत्री पंकज भोयर, माजी मंत्री रणजीत कांबळे, पोलीस अधीक्षकसह मान्यवरांची उपस्थिती
विजेत्यांसाठी विविध बक्षिस
Nagpur: टी 20 मालिका खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट टीम रात्री नागपूरात दाखल..भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या पाच सामन्याच्या टी 20 मालिकेतील पहिला सामना नागपूरात खेळला जाणार..
21 जानेवारी रोजी नागपूरच्या जामठा येथील व्हिसीए स्टेडियम वर हा सामना खेळवला जाणार..
या सामन्या करिता वरुण चक्रवती, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, शिवम दुबे रवी बिश्नोई, रिंकू सिंग, ईशान किशन, आणि संजू सॅमसन रात्री नागपुरात पोहचले...
Maharashtra Live News Update: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजप सज्ज,ताकतीने लढण्याचा निर्धारधाराशिव जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून,या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून ताकतीने लढवणार असल्याची भूमिका पक्षाने घेतली आहे.नगरपालिका निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशानंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजप कामाला लागले आहे. त्या अनुषंगाने भाजप कार्यालयाकडे इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्यात आले आहेत.पंचायत समितीच्या ११० जागांसाठी सुमारे ३९२ इच्छुकांनी,तर जिल्हा परिषदेच्या ५५ गटांसाठी तब्बल ३२० असे एकूण ७१२ इच्छुकांनी इच्छुक अर्ज भाजपा कार्यालयात दाखल केले आहेत.पक्षाकडे मोठ्या प्रमाणावर इच्छुक असले तरी उमेदवारीचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर पारदर्शक पद्धतीने घेतला जाईल, कोणावरही अन्याय होणार नाही अशी माहिती जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी दिलीय.
सोलपुरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार;महानगर पालिका निवडणुकीत मोठा धक्का बसल्या नंतर सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. अशातच माढ्याचे शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि चार आमदारांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. या भेटी दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवण्यावर चर्चा झाली आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राज के. पुरोहित यांचे निधनभाजप नेते राज के. पुरोहित यांचे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुका बॅलेटवर घ्या - काँग्रेस नेते नानाराज्यात पार पडलेल्या 29 नगरपालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात निवडणूक आयोगाचा गौडबंगाल बाहेर आलं. अनेक ठिकाणी मतदारसंघ मतदारांचे वेळेवर बदलल्याने मतदान करण्याच्या दिवशी धांदल उडाली त्यामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागला. मतदारांच्या बोटाला लावलेली शाही निघाली आणि अनेक ठिकाणी दुबार मतदारही झालं अशा अनेक बाबी या निवडणुकीत समोर आल्या. Vvpat नसल्याने मतदारांना त्यांचं मतदान कुणाला होतंय याची माहिती मिळाली नाही यासह अनेक बाबी या निवडणुकीत समोर आल्याने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या ईव्हीएम मशीनवर न घेता बॅलेट पेपरवरच घ्याव्यात अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे.
असली पिक्चर अभी बाकी है - भाजप बंडखोरअकोला महापालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालीये. अकोला महापालिकेत एकूण 80 जागा आहेत. बहूमतसाठी 41 चा आकडं गाठणं महत्वाचं आहेय. त्यामुळे सत्तेच्या चाब्या दोन अपक्ष आणि शिंदे आणि शरद पवारांच्या प्रत्येकी एका नगरसेवकांच्या हाती आहेय. दोनपैकी एक अपक्ष भाजपचे बंडखोर आशिष पवित्रकार आहेयेत. पवित्रकार यांनी 'साम'शी बोलतांना आपल्यासाठी सर्वच पर्याय खुले असल्याचं म्हटलंय. 'ये तो बस झाँकी है, असली पिक्चर अभी बाकी है' म्हणत पवित्रकार यांनी पुढच्या राजकारणाचे संकेत दिलेयेत. पवित्रकार हे भाजपाचे माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे पुतणे आहेय.
आमदार अब्दुल सत्तार आणि जिल्हाधिकारी सह तीन अधिकाऱ्यांना सिल्लोड न्यायालयाची नोटीस.सन २०२४ च्या सिल्लोड सोयगाव विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना (शिंदे गट) तर्फे उमेदवार असलेले आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रचाराच्या शेवटच्या जाहीर सभेत तालुक्यातील मतदारांना उद्देशून धमकीवजा वक्तव्य केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या भाषणात, जे मतदार त्यांना मतदान करणार नाहीत त्यांची नावे गुप्तपणे चिठ्ठीद्वारे कळविण्याचे आवाहन करत, अशा मतदारांवर “रामबाण उपाय” करण्याची भाषा वापरून गोळ्या देणे, इंजेक्शन देणे, अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी किंवा बायपास शस्त्रक्रियेचा इंतजाम केला जाईल, असे वक्तव्य केल्याचा आरोप आहे.
भंडारा गोंदियाचे खासदार यांनी घेतला कबड्डीचा आनंदभंडारा जिल्ह्यातील भिलेवाडा येथे जलसा निमित्त आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेत भंडारा-गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांना क्रीडा मंडळ यांच्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते, उद्घाटनाच्या वेळी खासदारांना कबड्डीचा मोह आवरलं नाही त्यांनी स्वतः मैदानात उतरून कबड्डीच्या आनंद घेतला आणि खेळाडूंच्या उत्साह वाढवला.
बहादूर सुरक्षा रक्षकाने वाचवले बुडणाऱ्या महिलेचे प्राणघरच्या वादातून खडकवासला धरणात खोल पाण्यात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याऱ्या महिलेचे प्राण येथील धरणाची सुरक्षा व्यवस्था पाहणारे बहादूर सुरक्षा रक्षकाने वाचवले. महिला पाण्यात बुडत असताना क्षणाचाही विलंब न करता हरिदास पुंडलिक वऱ्हाड यांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली व तिला बाहेर काढले. नंतर पोलिसांच्या मदतीने तिला पतीच्या स्वाधीन करण्यात आले. हरिदास यांच्या तत्परतेने प्राण वाचल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
उमरगा तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समीतीसाठी काँग्रेसकडून इच्छुकांची गर्दीधाराशिवच्या उमरगा तालुक्यात जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसकडून इच्छुकांची चांगलीच गर्दी झाली आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने उमरगा तालुक्यातून इच्छुक असणार्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने उमरगा येथील काँग्रेस कार्यालयात घेण्यात आली.या बैठकीत निवडणूक तयारी,पक्ष संघटन बळकटी,बूथनिहाय नियोजन, उमेदवार निवड प्रक्रिया तसेच कार्यकर्त्यांची भूमिका याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त करत निवडणुकीत यश मिळवण्याचा संकल्प करण्यात आलाय.
सोलापूर महापालिकेत भाजपच्या विजयानंतर शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजीसोलापूरच्या राजकारणात नवा अध्याय, व्यक्ती हरली,पार्टी जिंकली‘’ म्हणत आमदार सुभाष देशमुखावर निशाणा?
सोलापूर महापालिकेत जागा वाटपाच्या मुद्यावरून आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख हे नाराज होते
दोघांनीही बंडाची भाषा देखील केली होती मात्र विजयकुमार देशमुख हे नंतर प्रचारात सहभागी देखील झाले
मात्र आमदार सुभाष देशमूख हे मात्र शेवटपर्यंत नाराज राहिले,प्रचारात आणि विजयी जल्लोशात देखील सहभागी झाले नाही
आज शहरात ठिकठिकाणी ‘’सोलापूरच्या राजकारणात नवा अध्याय, व्यक्ती हरली,पार्टी जिंकली‘’ या आशयचे बॅनर लागलेले पाहायला मिळतायत.
वाळू माफियांचा कारनामा,महामार्ग पोलिसांना मनस्तापहिंगोलीत वाळू माफियांनी हौदोस घातला आहे, महसूल प्रशासन व पोलिसांच्या पथकाला पाहून भरधाव वेगात धावणाऱ्या डंपर चालकाने राज्य महामार्गावर डंपर हायड्रोलिक करत वाळू सांडून पळ काढला आहे रस्त्यावर वाळू पसरल्याने अनेक दुचाकी चालकांचे अपघात घडले आहेत दरम्यान राष्ट्रीय महामार्ग पोलिसांनी स्वतः स्थानिक नागरिकांना सोबत घेत रस्त्यावर सांडलेली ही वाळू बाजूला केली आहे हा सगळा गंभीर प्रकार हिंगोली औंढा मार्गावरील बोरजा फाटा येथे घडला आहे या घटनेमुळे जिल्ह्यात वाळू माफिया किती सक्रिय आहेत हे देखील पुढे आले आहे.
थोडक्यात पराभूत झालेले 14 भाजपचे उमेदवारांना योग्य संधी देण्याचा भाजप नेतृत्वाचा विचारनवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये थोडक्यात मतांनी भाजपाचे पराभूत झालेले 14 उमेदवार यांचं योग्य सन्मान भाजपात केला जाईल तसेच त्यांची मन धरणी भाजपचे माजी आमदार संदीप नाईक यांनी केली आहे
त्यामुळे पराभूत झालेल्या उमेदवारांना योग्य ती भाजपात सन्मान दिला जाईल अशी भूमिका संदीप नाईक यांनी व्यक्त केली
शिंदे गटाचे नवी मुंबई महानगरपालिकेत पराभूत झाले उमेदवारांची मनधरणी खासदार नरेश मस्के शिवसेनेकडूननवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेचे शिंदेंचे काही उमेदवार पडले असून तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपयश आले आहे या ठिकाणी खासदार नरेश मस्के पराभूत झालेले उमेदवारांना भेटून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न खासदार नरेश मस्के यांनी केला आहे योग्य वेळेला त्यांचा पुनर्वसन केला जाईल असे शब्द नरेश मस्केनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहे .
दररोज दहा जणांना भटक्या कुत्र्यांचा चावा पहा धक्कादायक आकडेवारीहिंगोली जिल्ह्यांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळाली आहे हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दररोज आठ ते दहा रुग्ण कुत्र्याने चावा घेतल्याने उपचारासाठी दाखल होत असल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे, लहान चिमुकले शाळकरी विद्यार्थिनी आणि जेष्ठ नागरिकांना हे भटके कुत्रे लक्ष करत आहेत दरम्यान हिंगोली पालिका प्रशासन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अपयशी ठरल्याचं सांगत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे तर आता हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनीच या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे विशेष म्हणजे ही भटकी कुत्री जमिनीवर बसलेली असताना अचानक हल्ला करत असल्याचे देखील पुढे आले आहे त्यामुळे रस्त्याने प्रवास करणारे नागरिक जीव मोठे धरून ये जा करत आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गणेश नाईक यांना फोननवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे तसेच नवी मुंबई शहरामध्ये आता भाजपचा महापौर होत आहे त्यामुळे भाजपला नवी मुंबई शहरामध्ये पुन्हा एकदा सत्ता मिळाली आहे या सर्व गोष्टीचा श्रेय राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना जात आहे त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेश नाईक यांचा फोन करून अभिनंदन केला आहे